दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 216, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७ वा. ] देहातीत. १८१
१०. देहातीत.
श्रीगणेशाय नमः ॥ मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें अ-
सत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पहातां ॥ १ ॥ सत्य कळावया-
कारणें । बोलिलों नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥
असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें ।
जेथील तेथें ॥ ३ ॥ वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चय करिती ।
तरी न ये आत्मप्रचीती । सत्यस्वरूप ॥ ४ ॥ सत्य असोन आच्छादलें ।
मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥
ऐशी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार
घेतां ॥ ६ ॥ मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि १ आपण । तेणें बा-
णली खूण । परमार्थाची ॥ ७ ॥ तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं
मिळालें । निजरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८ ॥ प्रारब्धीं टाकिला देहो ।
बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवरें २ ॥ ९ ॥
ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यात्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्य-
भूमी ॥ १० ॥ साधुदर्शनें पावन तीर्थे । पुरती त्यांचे मनोरथ । साधु न
येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्राचें ॥ ११ ॥ ३ पुण्य नदीचें जें तीर । तेथें
पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तो नित्यमुक्त ॥ १२ ॥
उत्तरायण हें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु
तो निःसंदेही ॥ १३ ॥ शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवाँ ४ मरण ।
अंतीं राहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४ ॥ इतुकें नलगे योगियासि । तो
जितांचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यांसी । दीधली तेणें ॥ १५ ॥
देहाचा अंत बरा आला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला ।
अज्ञान जन ॥ १६ ॥ जनाचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें
कल्पून घात । करिती स्वयें ॥ १७ ॥ जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ
आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें
॥ १८ ॥ जरी केलें ईश्वरभजन । तरी होइजे पावन । जैसें ५ व्हेव्हारितां धान्य ।
राशी माथां लाभे ॥ १९ ॥ दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उग-
१. आत्म्यास. २. शरीर. ३. पुण्यकर. ४. दिवसां. ५. व्यापार केला असतां.