सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमकारः केशवं प्रतिगच्छति ॥ १ ॥
या कारणें सर्व देवांसी । नमस्करावें अत्यादरेंसीं । अधिष्ठान मानितां दे-
वांसी । परम सौख्य वाटे ॥ १२ ॥ नाना देवांचीं अधिष्ठानें । सत्पात्र स-
द्गुरूचीं स्थानें । या कारणें नमस्कार करणें । उभयमार्गीं ॥ १३ ॥ न-
मस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे ।
सत्पात्रासी ॥ १४ ॥ नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्षमिती ।
नमस्कारें मोडलीं जडती । समाधानें ॥ १५ ॥ सीसापरता नाहीं दंड ।
ऐसें बोलती उदंड । या कारणें अखंड । देवभक्त वंदावे ॥ १६ ॥ नम-
स्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे । नमस्कारें गुरुदेव वोळे ।
साधकावरी ॥ १७ ॥ विशेषें करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर ।
आणि मुख्य परमेश्वर । कृपा करी ॥ १८ ॥ नमस्कारें पतित पावन । न-
मस्कारें संतांसि शरण । नमस्कारें जन्ममरण । दूरी दूरावे ॥ १९ ॥ परम
अन्याय करून आला । आणि साष्टांग नमस्कार घातला । तरी तो अ-
न्याय क्षमा केला । पाहिजे श्रेष्ठों ॥ २० ॥ या कारणें नमस्कारापरतें ।
आणिक नाहीं अनुसरंतें । नमस्कारें प्राणियांतें । सद्बुद्धि लागे ॥ २१ ॥
नमस्कारासि वेंचावें नलगे । नमस्कारासि कष्टावें नलगे । नमस्कारासि
कांहींच नलगे । उपकरणसामुग्री ॥ २२ ॥ नमस्करा ऐसें नाहीं सोपें । न-
मस्कार करावा अनन्यरूपें । नाना साधनीं साक्षेपें । कासया शिणावें
॥ २३ ॥ साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।
सुगम पंथें नेऊन घाली । जेथलि तेथें ॥ २४ ॥ या कारणें नमस्कार श्रेष्ठ ।
नमस्कारें वोळती वरिष्ठ । येथें सांगितली स्पष्ट । सहावी भक्ती ॥ २५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके वंदनभक्तिनिरूपणं नाम
षष्ठः समासः ॥ ६ ॥


७. दास्यभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । सहावे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १ ॥ सातवें भजन दास्य जाणावें ।


टिपा:
१. देव व गुरु यांस. २. मस्तकापेक्षां. ३. ग्राह्य. ४. परिश्रमानें.

२. दशक ६-१०: देव-शोधन, चतुर्दश-ब्रह्म, माया-निरीक्षण एवं सिद्ध-लक्षण

पडिलें कार्य तितुकें करावें । सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २ ॥ दे-
वाचें वैभव सांभाळावें । न्यूनपूर्ण पडूंचि न द्यावें । चढतें वाढतें वाढवावें ।
पूजन देवाचें ॥ ३ ॥ भंगलीं देवालयें करावीं । मोडलीं सरोवेरें बांधावीं ।
सोपे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये ॥ ४ ॥ नाना रचना जीर्ण ज-
र्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार । पडिलें कार्य तें सत्वर । चालवीत जावें
॥ ५ ॥ गज रथ तुरंगें सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें । मंचक डो-
ल्हारे विमानें । नूतनचि करावीं ॥ ६ ॥ मेघडंबरें छत्रे चामरें । सूर्यपानें
निशाणें अपारें । नित्य नूतन अत्यादरें । सांभाळीत जावीं ॥ ७ ॥ नाना
प्रकारचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें । बहुविध सुवर्णासनें । यत्नें करीत
जावीं ॥ ८॥ सुर्वनें पेठ्या कोठ्या मांडुसां । राजकोहळी घागरी बहुवसा । सं-
पूर्ण द्रव्यांश ऐसा । अति यत्नें करावा ॥९॥ भुयारीं तळघरें आणि विवरें । नाना
स्थळें गुप्तद्वारें । अनर्घ्य वस्तूंचीं भांडारें । यत्नें करीत जावीं ॥१०॥ अलंकार
भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें । नाना धातु सुवर्णपात्रे । यत्नें क-
रीत जावीं ॥ ११ ॥ पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांची बनै ।
पावतीं करावी जीवनें । तयां वृक्षांसी ॥ १२ ॥ नाना पशूंचिया शाळा ।
नाना पक्षी चित्रशाळा । नाना वाद्ये नाटकशाळा । गुणी गायक बहु-
साल ॥ १३ ॥ स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामुग्रीगृहें धर्मशाळा । निद्रि-
स्ताकारणें पडशाळा । विशाल स्थानें ॥ १४ ॥ नाना परिमळद्रव्यांचीं स्थ-
ळें । नाना खायफळांची स्थळें । नाना रसांची नाना स्थळें । यत्नें करीत
जावीं ॥ १५ ॥ नाना वस्तूंचीं नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें । दे-
वाचें वैभव वचनें । किती म्हणोनि सांगावें ॥ १६ ॥ सर्वांठायीं अतिसादर ।
आणि दास्यत्वासहि तत्पर । कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७ ॥
जयंत्या पर्व्वे महोत्सव । असंभाव्य चालवावें वैभव । जें देखतांचि स्वर्गी-
चे देव । संतुष्ट होती ॥ १८ ॥ ऐसें वैभव चालवावें । आणि नीच दास्य-
त्वहि करावें । पडिले प्रसंगी सावध असावें । सर्वकाळ ॥ १९ ॥ जें जें
कांहीं पाहिजे । तें तें तत्काळची दिजे । अत्यंत आवडीं किजे । सकळ सेवा

१. कमजास्त, गैरसोय. २. तलाव. ३. घोडे. ४. चौरंग. ५. वाहनें. ६.
मंदिरे. ७. मोठ्या पेट्या. ८. अमोल. ९. फुलांचे ताटवे. १०. पाणी.

९२ श्रीदासबोध. [ दशक

॥ २० ॥ चरणक्षालनें स्नानें आचमनें । गंधाक्षतें वसनें भूषणें । आसनें
जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१ ॥ शयनाकारणें उत्तम स्थ-
ळें । जळें ठेवावीं सुशीतळें । तांबूल गायनें रसाळें । रागरंगें करावी ॥ २२ ॥
परिमळद्रव्यें आणि फुलें । नाना सुगंधिक तैलें । खाद्य फळें बहुमालें । स-
न्निधाचि असावीं ॥ २३ ॥ सडे संमार्जनें करावी । उदकपात्रे उदकें भरावीं ।
वसनें प्रक्षाळून आणावीं । उत्तमोत्तम ॥ २४ ॥ सकळांचें करावें परिपत्यें ।
आलियाचें करावें आतिथ्यें । ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ति ॥ २५ ॥
वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं । अंतरें निवती सकळांचीं ।
ऐसें वदावें ॥ २६ ॥ ऐसी हे सातवी भक्ती । निरूपिली यथामती । प्रत्यक्ष
न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७ ॥ ऐसें दास्य करावें देवाचें ।
येणेंचि प्रकारें सद्गुरूचें । प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करीत जावें
॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके दास्यभक्तिनिरू-
पणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. सख्यभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । सातवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १ ॥ देवासी परम सख्य करावें ।
प्रेमप्रीतीनें बांधावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २ ॥ देवास
जयाची अत्यंत प्रीति । आपण वर्तावें तेणेंचि रीतीं । येणेंकरितां भगवंतीं ।
सख्य घडे नेमस्त ॥ ३ ॥ भक्ती भाव आणि भजन । निरूपण आणि
कथा कीर्तन । प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४ ॥ आपण तैसेंचि
वर्तावें । आपणासि तेंच आवडावें । मनासारिखें होतांचि स्वभावें । सख्य
घडे नेमस्त ॥ ५ ॥ देवाच्या सख्यत्वाकारणें । आपुलें सौख्य सोडून देणें ।
अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचायें ॥ ६ ॥ सांडून आपली संसार-
व्यथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्या-
च सांगाव्या ॥ ७ ॥ देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें शेवटीं । प्राण तोहि वेंचाय ॥ ८ ॥ आपुलें अवघेंचि जावें ।


१. पाय धुणें. २. वस्त्रें. ३. सोय. ४. आदरसत्कार..

४ था. ] 'सख्यभक्ति. ९३
परी देवासि सख्य राहावें । ऐसी प्रीति जीवें भावें । भगवंतीं लागावी
॥ ९ ॥ देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावें निर्वाण^१ । प्रेम-
प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १० ॥ ऐसें परम सख्य धरितां । देवास
लागे भक्ताची चिंता । पांडव लाक्षाजोहरीं^२ जळतां । विवरद्वारें काढिले
॥ ११ ॥ देव सख्यत्वें राहे आपणापासीं । हें तों वर्म आपणाचपासीं । आ-
पण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येतीं पैडसादें^३ ॥ १२ ॥ आपण असतां अनन्य-
भावें । देव तात्काळचि पावे । आपण त्रास घेतां जीवें । देवही त्रासे ॥ १३ ॥
॥ श्लोकार्ध ॥ :ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम् ॥ टीका ॥ जैसें
जयाचें भजन । तैसाच देवहि आपण । म्हणोनि हें अवघेंच जाण । आप-
णाचिपासीं ॥ १४ ॥ आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे ।
तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५ ॥ मेघ चातकावरी घोळे-
ना । तरी चातक पाटलेना । चंद्र वेळेसि उगवेना । तरी चकोर अनन्य^४
॥ १६ ॥ ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व^५ । भगवंतावरील ममत्व^६ ।
सांडूं नये कीं ॥ १७ ॥ सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत । विद्या
लक्ष्मी^७ धन वित्त । सकळहि परमात्मा ॥ १८ ॥ देवावेगळें कोणी नाहीं ।
ऐसें बोलती सर्वही । परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९ ॥ म्ह-
णोनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंच करावें । अंतरीं सदृढ धरावें । परमे-
श्वरासी ॥ २० ॥ आपुलिया मनोरथाकारणें^८ । देवावरी क्रोधासि येणें ।
ऐसीं नव्हत कीं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१ ॥ देवाचें जें मनोगत । तेंच
आपुलें हित निश्चित । इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥ २२ ॥ देवाचे
इच्छेनें वर्तावें । देव करिल तें मानावें । मग सहजचि भावें । कृपाळु देव
॥ २३ ॥ पाहतां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायसी । माता वधी बाळ-
कासी । विपत्तिकार्ळी^९ ॥ २४ ॥ देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना
ऐकिला । शरणागतांसि देव झाला । वज्रपंजरूं^१० ॥ २५ ॥ देव भक्तांचा
कैवारी । देव पतितांसि तारी । देव होय सहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥
१. शेवट, नाश. २. लाक्षागृहांत, लाखेच्या घरांत. ३. प्रतिध्वनि. ४. एकनिष्ठ.
५. धीर. ६. प्रेम. ७. ऐश्वर्य. ८. मनोरथ साधण्यासाठीं. ९. संकटाचे वेळीं.
१०. वज्रासारखा बळकट आसरा.

९४ श्रीदासबोध. [ दशक
देव अनाथांचा कै¹पक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धाविन्नला अंतर²साक्षी
गजेंद्राकारणें ॥ २७ ॥ देव कृपेचा सागर । देव करुणेचा जल³धर । देवासि
भक्तांचा विसर । पडणार नाहीं ॥ २८ ॥ देव प्रीति राखो जाणे । देवासि
करावें सो⁴जणें । जीवलगें अवघीं पिसुनें । कामा न येती ॥ २९ ॥ सख्य
देवाचें तुटेना । प्रीति देवाची विटेना । देव कदा पालटेना । शरणागतांसी
॥ ३० ॥ म्हणोनि सख्य देवासि करावें । हितगुज तयास सांगावें । आठवे
भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१॥ जैसा देव तैसा गुरु । शास्त्र बोलिला
हा विचार । म्हणोनि सख्यत्वाचा निधा⁶रु । सद्गुरूसि असावा ॥ ३२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके सख्यभक्तिनिरूपणं नाम
अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. आत्मनिवेदन.
श्रीगणेशाय नमः ॥ मार्गे जाहलें निरूपण । आठवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । नववी भक्ती ॥ १ ॥ नवम निवेदन जाणावें ।
आत्मनिवेदन करावें । तेंही सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करूनी ॥२॥ ऐका
निवेदनाचें लक्षण । देवासि वाहावें आपण । करावें तत्वविवरण । म्हणिजे
कळे ॥३॥ मी भक्त ऐसें म्हणावें । आणि वि⁵भक्तिपणें भजावें । हें अवघेंचि
जाणावें । विलक्षण ॥४॥ लक्षण असोनि विलक्षण । ज्ञान असोनि अज्ञान ।
भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥५॥ भक्त म्हणजे विभक्त नव्हे । आणि
विभक्त म्हणजे भक्त नव्हे । विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६ ॥
तस्मात् विचार करावा । देव कोण तो ओळखावा । आपला आपण
शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७ ॥ मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां
तत्व⁷झाडा । विचार पाहतां उघडा । आपण नाहीं ॥ ८ ॥ तत्वें तत्व जेव्हां
सरे । तेव्हां आपण कैंचा उरे । आ⁸त्मनिवेदन तेणें प्रकारें । सहजचि झालें
॥ ९ ॥ तत्त्वरूप सकळ भासे । विवेक पाहतां निरसे । प्र९कृति निरसे आत्मा
१. कैवारी. २. मनोभाव जाणणारा. ३. मेघ. ४. मैत्री. ५. देव आपणांहून
भिन्न आहे, अशा भावनेनें. ६. मनाशीं. ७. पंचतत्त्वें वेगळीं काढून पाहणें. ८.
आपण नाहीं, सर्व ईश्वरच आहे, अशी भावना. ९. माया.

४ था.] आत्मनिवेदन. ९५
असे । आपण कैंचा ॥ १० ॥ एक मुख्य परमेश्वर । दुसरी प्रकृति जग-
दाकार । तिसरा कैंचा आपण चोर । आणिला मध्यें ॥ ११ ॥ ऐसें हें सह-
जचि असतां । नाथिलें¹चि लागे देहअहंता । परंतु विचारें पाहतां ।
कांहींच नाहीं ॥ १२ ॥ पाहतां तत्वविवंचना² । पिंडीं³ ब्रह्मांडरचना । विश्वा-
कारें व्यक्ति⁴ नाना । तत्त्वें⁵ विस्तारलीं ॥ १३ ॥ तत्वें साक्षित्त्वें⁶ वोसरती ।
साक्षित्त्व निरसे आत्मप्रतीती⁷ । आत्मा असे आदि अंतीं । आपण कैंचा
॥ १४ ॥ आत्मा एक स्वानंदघन⁸ । आणि अहंआत्मां⁹ हें वचन । तरी मग
आपण कैंचा भिन्न । उरला तेथें ॥ १५॥ सोहं हंसा हें उत्तर । याचें पहावें
अर्थांतर । पाहतां आत्मयाचा विचार । आपण कैंचा तेथें ॥ १६ ॥ आत्मा
निर्गुणं¹⁰ निरंजनं¹¹ । तयासि असावें अनन्यं¹² । अनन्य म्हणजे नाहीं आन ।
आपण कैंचा तेथें ॥१७॥ आत्मा म्हणजे तो अद्वैतं¹³ । जेथें नाहीं द्वैताद्वैत ।
तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ॥ १८ ॥ आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण । तेथें
नाहीं गुणागुणं¹४ । निखलें¹⁵ निर्गुणीं आपण । कोण कैंचा ॥ १९ ॥ त्वंपदं¹⁶
तत्पदं¹⁶ असिपदं । निरसूनि सकळ भेदाभेद । वस्तु ठायींच अभेद । आपण कैंचा
॥२०॥ निरसितां जीव शिव उपाधी । जीवशिवाचि कैंचे आधीं । स्वरूपीं
होतां दृढबुद्धी । आपण कैंचा ॥ २१ ॥ आपण मिथ्या साच देव । देव भक्त
अनन्य¹⁷भाव । या वचनाचा अभिप्राय । अनुभवी जाणती ॥२२॥ या नांव
आत्मनिवेदन । ज्ञानियांचें समाधान । नववे भक्तीचें लक्षण । निरूपिलें
२३॥ पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्ये जगदीश । नवविधा भक्ती-
मध्यें विशेष । भक्ति नववी ॥२४॥ नववी भक्ति आत्मनिवेदन । न होतां न
चुके जन्ममरण । हें वचन सत्य प्रमाण । अन्यथा नव्हे ॥ २५ ॥ ऐसी हे
१. नाहीं तोच. २. तत्त्वांचा विचार. ३. शरीर. ४. आकार. ५. आकाशादि
पांच तत्त्वें. ६. मी तत्त्वांचा साक्षी आहें अर्थात् मी त्यांहून भिन्न आहें, या वि-
चारानें. ७. आत्मसाक्षात्कार झाल्यावर. ८. आनंदाने पूर्ण भरलेला. ९. मीच
आत्मा आहें. १०. गुणधर्भरहित. ११. मलरहित. १२. मी त्याहून अन्य नाहीं
अशा रीतीनें. १३. दुसरें म्हणून नाहींच असा; केवळ एकच. १४. गुणदोष.
१५. शुद्ध. १६. 'तत्त्वमसि' (तें तूं आहेस.) या महावाक्यांतील हीं तीन पदें.
१७. एकरूप.

९१ श्रीदासबोधः [ दशक
नवविधा भक्ती । केलिया पाविजे सायुज्यमुक्ती । सायुज्यमुक्तीस कल्पांतीं
चळण नाहीं ॥ २६ ॥ तिन्ही मुक्तींस आहे चळण । सायुज्यमुक्ती अचळ
जाण । त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायुज्यमुक्ती चलेना ॥ २७ ॥ अवधिया
चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती । त्यांमध्यें तीन नासती¹ । चौथी ते
अविनाश ॥ २८ ॥ पहिली मुक्ति ते सलोकता² । दुसरी ते समीपता³ ।
तिसरी ते स्वरूपता⁴ । चौथी सायुज्यता⁵ मुक्ती ॥२९॥ ऐसिया चारि मुक्ती ।
भगवद्भजनें प्राणी पाविजेती । हें निरूपण प्रांजळ श्रोतीं । सावध पुढें
परिसावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके आत्म-
निवेदननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. मुक्तिचतुष्टय.
श्रीगणेशाय नमः ॥ मूळ ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूप अहंकार । तो
पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं⁶ बोलिला ॥ १ ॥ तो अहंकार वायुरूप ।
तयावरी तेजाचें स्वरूप । तया तेजाच्या आधारें आपें⁷ । आवरणोदक दाटलें
॥ २ ॥ तया आवरणोदकाच्या आधारें । धरा⁸ धरिली फणिवरें⁹ । वरती
छप्पन्नकोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३ ॥ इयेवरी परिघ¹⁰ सप्त सागर । मध्यें
मेरु महा थोर । अष्ट दिक्पाळ परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४ ॥ तो
सुवर्णाचा महामेरू । पृथ्वी तयाचा आधारू । चौऱ्यांशीं सहस्र विस्तारू ।
रुंदी तयाची ॥ ५ ॥ उंच तरी मर्यादावेगळा । भूमीमध्यें सहस्र सोळा ।
तया भोंवता वेष्टित पौळा¹¹ । लोकालोक पर्वतांचा ॥ ६ ॥ तया ऐलीकडे
हिमाचल । जेथें पांडव गळाले सकळ । धर्म आणि तमालनीळ¹² । पुढें गेले
॥ ७ ॥ तेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले महा अही¹³ । शीतसुखें¹⁴
सुखावले तेही । पर्वतरूप भासती ॥ ८ ॥ तया ऐलीकडे शेवटीं जाण ।
बद्रिकाश्रम बद्रिनारायण । तेथें महातापसी निर्वाणें¹⁵ । देहत्यागार्थ जाती
१. नाश. २. देवलोकीं राहणें. ३. देवासंनिध राहणें. ४. देवाप्रमाणें आपलें
सामर्थ्य होणें. ५. देवाशीं मिळून जाणें. ६. द. ८, स. ४ व ५ पहा. ७. पाणी.
८. पृथ्वी. ९. शेषानें. १०. घेर. ११. वेढा. १२. श्रीकृष्ण. १३. सर्प. १४. थंड
हवेच्या सुखानें. १५. शेवटीं.

४ था. ] मुक्तिचतुष्टय. ९७
॥ ९ ॥ तया ऐलीकडे बद्रीकेदार । पाहून येती लहान थोर । ऐसा हा
अवघा विस्तार । मेरु पर्वताचा ॥ १० ॥ तया मेरु पर्वता पाठारीं । तीन
शृंगें विषेम¹ थोरी । परिवारें राहिले तयावरी । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११ ॥
ब्रह्मशृंग तो पर्वताचा । विष्णुशृंग तो मार्गैजांचा² । शिवशृंग तो स्फटिकाचा।
कैलास नाम त्याचें ॥ १२ ॥ वैकुंठ नाम विष्णुशृंगाचें । सत्यलोक नाम
ब्रह्मशृंगाचें । अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें ॥ १३ ॥ तेथें गण गंधर्व
लोकपाळ । तेहेतीस कोटी देव सकळ । चौदा लोक सुवर्णाचळ³ । वेष्टित
राहिले ॥ १४ ॥ तेथें कामधेनूंचीं खिल्लारें । कल्पतरूंचीं वनें अपारें । अमृ-
ताचीं सरोवरें । ठायीं ठायीं उचंबळती ॥ १५ ॥ तेथें उदंड चिंतामणी⁴ ।
हिरे परिसांचिया खाणी । तेथें सुवर्णमय धरणी । लखलखायमान ॥ १६ ॥
परम रमणीय फांकती कळा⁵ । नवरत्नांचिया पाषाणशिळा । तेथें अखंड हर्ष-
वेळा । आनंदमय ॥ १७ ॥ तेथें अमृताचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य
सुमनें । अष्टनायका गंधर्व गायनें । निरंतर ॥ १८ ॥ तेथें तारुण्य वोस-
रेंना । रोग व्याधीहि असेना । वृद्धपण आणि मरण येईना । कदाकाळीं ॥
१९ ॥ तेथें एकाहूनि एक सुंदर । एकाहूनि एक चतुर । धीर उदार आणि
शूर । मर्यादेवेगळे⁶ ॥ २० ॥ तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें । विद्युल्लतेसारिखीं
स्वरूपें । तेथें यश कीर्ति प्रतापें । सीमा सारिली ॥ २१ ॥ ऐसें तें स्वर्गभुवन ।
सकळ देवांचें वसतिस्थान । तया स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें
॥ २२ ॥ येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें त्या देवलोकीं राहावें । सलो-
कता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३ ॥ लोकीं राहावें ते सलोकता ।
समीप असावें ते समीपता । स्वरूपींच व्हावें सरूपता । तिसरी मुक्ती ॥
२४ ॥ देवस्वरूप जाहला देही⁷ । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूप-
तेंचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५ ॥ सुकृत⁸ आहे तें भोगिती । सुकृत
सरतां लोटून देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६ ॥ म्हणोनि
तिन्ही मुक्ती नाशवंत । सायुज्यमुक्ती ते शाश्वत । तीही निरूपिली साव-
चित्त । ऐक आतां ॥ २७ ॥ ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतांसहित जळेल
१. ओळीनें नव्हेंत अशीं. २. पाच्येचा. ३. मेरु. ४. चिंतितलेलें देणारा मणी.
५. तेज. ६. अमर्याद. ७. मनुष्य. ८. पुण्य.

९८ श्रीदासबोध. [ दशक
क्षिती १ । तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ती कैंच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां
निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ । सायुज्यमुक्ति ते केवळ ।
जाणिजे ऐसी ॥ २९ ॥ निर्गुणीं अनन्य २ असतां । तेणें होय सायुज्यता ।
सायुज्यता म्हणजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥ सगुण भक्ति ते चळे ।
निर्गुण भक्ती ते न चळे । हें अवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलिया ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके मुक्तिचतुष्टयनिरूपणं नाम
दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९६.
दशक पांचवा.
१. गुरुनिश्चय.
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मया-
रामा । अनिर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १ ॥ जें वेदांसि
सांकडें ३ । जें शब्दासि कोंडडें ४ । तें सच्छिष्यासि रोकडें । अलभ्य लाभे ॥
२ ॥ जें योगियांचें निज वर्म ५ । जें शंकराचें निजधाम । जें विश्रांतीचें निज-
विश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३ ॥ तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणाचि
होइजे अंगें । दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना ६ सर्वथा ॥ ४ ॥ आतां
स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें । सांगिजती तेणेंप्रमाणें ।
मुमुक्षें शरण जावें ॥ ५ ॥ गुरु तो सकळांसि ब्राह्मण । जरी तो जाहला
क्रियाहीन ७ । तरी तयासि शरण । अनन्यभावें असावें ॥ ६ ॥ अहो या
ब्राह्मणांकारणें । अवतार घेतला नारायणें । विष्णूनें श्रीवत्स मिरवणे । तेथें
इतर ते किती ॥ ७ ॥ ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्राचे ब्राह्मण । धातु-
पाषाणीं देवपण । ब्राह्मणाचेनि मंत्रें ॥ ८ ॥ मुंजीबंधनाविरहित । तो
शूद्रचि निर्भ्रांत । द्विजन्मा म्हणोनि सतत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९ ॥
सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्र-
माण ८ । अप्रिय भगवंता ॥ १० ॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं
१. पृथ्वी. २. एकनिष्ठ. ३. जाणण्यास कठीण. ४. अवघड. ५. गुह्य गोष्ट.
६. मळानें मळत नाहीं. ७. आचारभ्रष्ट. ८. प्रमाण नव्हे.

सकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्राह्मण
वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्यें-
करोनि ॥ १२ ॥ ब्राह्मणपूजनें शुद्धवृत्ति । होऊनि जडे भगवंतीं । ब्राह्मण-
तीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३ ॥ लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण ।
अन्य यातीस पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण । येरां चाड नाहीं
॥ १४ ॥ असो ब्राह्मणास सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती । जरी
ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५ ॥ अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी
तो नेऊनि काय करावा । ब्राह्मणासन्निध पू जावा । हैं तौं घडेना कीं ॥ १६ ॥ जें
जें जनावेगळें केलें । तें तें वेदें अव्हेरिलें । म्हणोनि तयास नाम ठेविलें । पांखाड
मत ॥ १७ ॥ असो जो हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विश्वास । ब्राह्मणभजनें
बहुतांस । पावन केलें ॥ १८ ॥ ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ
सद्गुरु करावा । ऐसें म्हणाल तर निजठेवा । सद्गुरूविण नाहीं ॥ १९ ॥ स्व-
धर्मकर्मीं पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरूविण । ब्रह्मज्ञान नसतां क्षीण ।
जन्ममृत्यु चुकेना ॥ २० ॥ सद्गुरूविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
अज्ञान प्राणी प्रवाही । वाहातचि गेले ॥ २१ ॥ ज्ञानविरहित जें जें केलें ।
तें तें जन्मासि मूळ झालें । म्हणोनि सद्गुरूचीं पाउलें । सदृढ धरावीं ॥ २२॥
जयास वाटे देव व्हावा । तेणें सत्संग धरावा । सत्संगेंवीण देवाधिदेवा ।
पाविजेत नाहीं ॥ २३ ॥ नाना साधनें बापुडीं । सद्गुरूविण करिती वेडीं ।
गुरुकृपेविण कुडकुर्डीं । व्यर्थचि होती ॥ २४ ॥ कार्तिकस्नानें माघस्नानें ।
व्रतें उद्यापनें दानें । गोरांजनें धूम्रपानें । साधीती पंचाग्नी ॥ २५ ॥ हरि-
कथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण । सर्व तीर्थे परम कठिण । क-
रिती प्राणी ॥ २६ ॥ झळफळीत देवतार्चनें । स्नान संध्या दर्भासनें । टिळे
माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७ ॥ अर्घ्यपात्रें संपुट गोकर्णे । मंत्र-
यंत्रांचीं ताम्रपर्णै । नानाप्रकारीं उपकरणें । साहित्यशोभा ॥ २८ ॥ घंटा
१. इतरांची गरज. २. महारमांग. ३. स्वरूपाची प्राप्ति. ४. निरुपयोगी.
५. ईश्वरप्राप्तीसाठीं स्वतःला जाळून घेणें. ६. झाडाला टांगून घेऊन खालीं केलेला
धूर पिणें. ७. सभोवार चार अग्नी पेटवून मस्तकावर सूर्याचें ऊन घेणें. ८. तांब्याचे
पत्र्यावर कांहीं रेखाकृति काढून मंत्र साधणें. ९. पूजेच्या सामुग्रीचा थाट.

१०० श्रीदासबोध. [ दशक
घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणि स्तुती । आसनें मुद्रा ध्यानें करिती ।
प्रदक्षिणा नमस्कार ॥ २९ ॥ पंचायतनपूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें ला-
खोली । फळें नारिकेलें भरलीं । संपूर्ण सांग पूजा ॥ ३० ॥ उपोषणें निष्ठा
नेम । परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती वर्म १ । चुकले प्राणी ॥३१॥
यज्ञादिक कर्मे केलीं । हृदयीं फळाशा कल्पिली । आपुले इच्छेनें घेतली ।
सूति जन्माची ॥ ३२ ॥ करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा
अभ्यास । ऋद्धिसिद्धी सावकाश । वोळल्या जरी ॥ ३३ ॥ तरी सद्गुरु-
कृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित । यमपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥
॥ ३४ ॥ जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती २ । गुरुकृपेविण
अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५ ॥ ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ति-
भाव आणि भजन । सकळही फोल ब्रह्मज्ञान । जंव तें प्राप्त नाहीं ॥३६॥
सद्गुरुकृपा न जोडे । आणि भलतीकडे वावँडे ३ । जैसें आंधळें चांचरूनि पडे ।
गौरीं ४ आणि गडदरीं ५ ॥ ३७ ॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस नि-
र्धान ६ । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान-। प्रकाश होय ॥ ३८ ॥ सद्गुरुविण जन्म
निष्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥
॥ ३९ सद्गुरूचेनि अभयकरें । प्रकट होईजे ईश्वरें । जन्मदुःखें अपारें । ना-
सोनि जाती ॥ ४० ॥ मागां झाले थोर थोर । संत महंत मुनीश्वर । तयां
सहि ज्ञानविचार । सद्गुरूचेनि ॥ ४१ ॥ श्रीराम कृष्णादि करूनी । अति-
तत्पर गुरुभजनीं । सिद्धसाधु आणि सज्जनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२ ॥
सकळ सृष्टीचे चालक । हरिहरब्रह्मादिक । तेहि

५ वा. ] सद्गुरुलक्षण. १०१
२. सद्गुरुलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणजेती ।
परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १ ॥ सैभामोहन भुरके चेटके । सौवरी
मंत्रकौटाळे अनेके । नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २ ॥
सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ५ । दृष्टिबंधन ६ लाँगवेग ।
अभिलाषाचा ॥ ३ ॥ ८ साहित्य संगीत रागज्ञान । गीत नृत्य तानमान ।
नाना वाद्यें शिकविती जन । तेहि एक गुरु ॥ ४ ॥ विद्या शिकविती पंचा-
क्षरी । तोडे ९ तोटगे १० नानापरी । कां पोट भरे जयावरी । ते विद्या शिक-
विती ॥ ५ ॥ जे यातीचा जो व्यापार । शिकविती भरावया उदर । तेहि
गुरु परी साचार । सद्गुरु नव्हेती ॥ ६ ॥ आपुली माता आणि पिता । तेहि
गुरुचि तत्वतां । परी पैलदार पावविता । तो सद्गुरु वेगळाची ॥ ७ ॥ गा-
यत्री

१०२ श्रीदासबोध. [ दशक
भरी । उदारवचनें ॥ १७ ॥ वेदशास्त्र महानुभाव । पहातां एकचि अनुभव ।
तोचि एक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८ ॥ संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आ-
दरें प्रतिपाळी । वेदविरहित टवाळी । करूं चि नेणे ॥ १९ ॥ जें जें मन अं-
गीकारी । तें तें स्वयें मुक्त करी । तो गुरु नव्हे भिकारी । झेंडे आला
॥ २० ॥ शिष्यांसि न लाविती साधन । न करविती इंद्रियदमन । ऐसे गुरु
अडक्याचे तीन । मिळाले तरी टाकावे ॥ २१॥ जो कोणी ज्ञान बोधी । समूळ
३अविद्या छेदी । इंद्रियदमन प्रतिपादी । तोचि सद्गुरु जाणावा ॥ २२॥ एक
द्रव्याचे विकिले । एक शिष्याचे आँखिले । ऐसे दुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥
जें जें रुचे शिष्याचे मनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी ।
पडिली गळां ॥ २४ ॥ जो गुरु भीडसारू । तो अधमाहूनि अधम थोरू ।
चोरटा मैंद पामरु । द्रव्यभोंदू ॥ २५ ॥ जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें
बोहरी । आणि शेखीं भीड करी । घात घेणार ॥ २६ ॥ तैसा सद्गुरु नसावा ।
जेणें अंतर पडे देवा । भीड करूनियां गोंवी । घाली बंधनाचा ॥ २७ ॥
जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणि स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान ।
दाखवी डोळां ॥ २८ ॥ देखणीं दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें ।
इतुकेंच ज्ञान तीं पामरें । अंतरलीं भगवंता ॥ २९ ॥ बाणे तिहींची खूण ।
तोचि गुरु सुलक्षण । तेथेंच रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षीं ॥ ३० ॥
अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषयीं लोलंगतां । ऐसिया गुरूचेनि
सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१ ॥ जैसा निरूपणसमय । तैसेंचि मनहि
करी वायें । कृतबुद्धीचा निश्चय । जाहलाचि नाहीं ॥ ३२ ॥ निरूपणीं
सामर्थ्यसिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी । नाना चमत्कारें बुद्धी ।
डळमळूं लागे ॥ ३३ ॥ पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त । जयांस साह्य भगवंत ।
आणि सामर्थ्यहि अद्भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४ ॥ ऐसें तयांचें सामर्थ्य ।
आमुचें ज्ञान नुसतें व्यर्थ । ऐसा सामर्थ्यांचा स्वार्थ । हृदयीं वसे ॥ ३५ ॥
निःशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते खोटे । शब्द-
१. सत्पुरुष. २. काकुळतीस. ३. अज्ञान. ४. अंकित. ५. घातका. ६. राख-
रांगोळी. ७. फांस. ८. शास्त्र, सद्गुरु व आपण स्वतः यांची. ९. अनुभव. १०.
आसक्ति. ११. व्यर्थ. १२. बरोबरी. १३. हांव.

५ वा. ] सद्गुरुलक्षण. १०३
ज्ञाते कामिक ॥ ३६ ॥ बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं ।
कामना इच्छितांच मेलीं । यापुढीं मूर्ख ॥ ३७ ॥ निःशेष कामनारहित ।
ऐसा तो विरळा संत । अवघियांवेगळें मत । अक्षय ज्याचें ॥ ३८ ॥
अक्षय ठेवा सकळांचा । तरी पांगि फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्वराचा ।
चुकोनि जातो ॥ ३९ ॥ सिद्धि आणि सामर्थ्य जाहलें । सामर्थ्यं देहास
महत्व आलें । पुढें बेचोंड बळकाविलें । देहबुद्धीचें ॥ ४० ॥ सांडूनि अक्षय
सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणिक नाहीं
॥ ४१ ॥ ईश्वराविण जे कामना । तेणें गुणें नाना यातना । पावती ³होती
पतना । वरपंडे प्राणी ॥ ४२ ॥ होतां शरीराचा अंत । सामर्थ्यहि निघोन
जात । शेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३ ॥ म्हणोनि निष्कामना-
विचारु । दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भवाचा
॥ ४४ ॥ मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचें
समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५ ॥ याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदा-
सीन केवळ । विशेष आचारें निर्मळ । स्वधर्माविषयीं ॥ ४६ ॥ याहिवरी
अध्यात्मश्रवण । हरिकथानिरूपण । जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥
जेथें सारासार विचार । तेथें होय जगदुद्धार । नवविध भक्तीचा आधार ।
बहुत जनांसी ॥ ४८ ॥ म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठिलें साधन ।
हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं ओळखावें ॥ ४९ ॥ अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य
निष्ठेचें भजन । तेथें बहुत भक्तजन । विश्रांति पावती ॥ ५० ॥ नाहीं
उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्माविणें अनाचार । भ्रष्ट
होती ॥ ५१ ॥ म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्म कर्म आणि
साधन । कथानिरूपण श्रवण मनन । नीति न्याय मर्यादा ॥ ५२ ॥ यां-
मध्यें एक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे । म्हणोनि सर्वहि विलसे ।
सद्गुरूपार्सी ॥ ५३ ॥ जो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता ।
नाना साधनें समर्था । सद्गुरूपार्सी ॥५४॥ साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे६ । तो
मागुता सर्वैचि भ्रष्टे । या कारणें दूरदृष्टे । महानुभाव ॥५५॥ आचार उपा-
१. क्षोभ. २. जुंबाड. ३. प्राप्त होतात. ४. स्वरूपाची जागृति राहणें. ५.
चित्तशुद्धि करणारीं कर्मे सोडल्यांवर. ६. स्थापितो. ७. दूरवर नजर पोचविणारे.

१०४ श्रीदासबोध. [ दशक
सना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती । जळो तयांची महंती । कोणं पुसे
॥ ५६ ॥ कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाभैसे¹ झाला ठाव । तो कानकों-
डा समुदाय । प्रपंचीं हासती ॥ ५७ ॥ नीच यातीचा गुरु । तोही कानकोंडा²
विचारु । ब्रह्मसभेसि जैसा चोरु । तैसा दडे ॥ ५८ ॥ ब्रह्मसभे देखतां । तया-
चें तीर्थ न ये घेतां । अथवा प्रसाद सेवूं जातां । प्रायश्चित्त पडे ॥ ५९ ॥
तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली । गुरुभक्ति ते सट-
वैली³ । एकाएकीं ॥ ६० गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्त्वतां ।
येथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१ ॥ ऐसीं सांकडीं दोहींकडे ।
तेथें प्रस्तावों⁴ घडे । नीच यातीस सद्गुरुत्व न घडे । या कारणें ॥ ६२ ॥ त-
थापि आवडी घेतलीं जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें । बहुत जनांस भ्रष्ट-
वावें । हें दूषणचि कीं ॥ ६३ ॥ आतां असो हा विचारु । स्वयातीचा पा-
हिजे गुरु । नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्तें⁵ घडे ॥ ६४ ॥ जे जे कांहीं उत्तम
गुण । तें तें सद्गुरूचें लक्षण । तथापि सांगों वोळखण । होय जेणें ॥ ६५ ॥
एक गुरु एक मंत्रगुरु । एक यंत्रगुरु एक तंत्रगुरु । एक दस्तादगुरु एक
राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६ ॥ एक कुळगुरु एक मानिला गुरु । एक वि-
द्यागुरु एक कुविद्यागुरु । एक असद्गुरु एक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७ ॥
एक मातागुरु एक पितागुरु । एक राजगुरु एक देवगुरु । एक बोलिजे
जगद्गुरु । सकळ कळा ॥ ६८ ॥ ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणिक
गुरु । ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९ ॥ एक स्वप्नगुरु⁶ एक दीक्षागुरु ।
एक म्हणती प्रतिमागुरु । एक म्हणती स्वयें गुरु । आपुला आपण ॥ ७० ॥
जे जे यातींचा जो व्यापार । ते ते यातीचे तितुके गुरु । याचा पाहतां
विचारु । उदंड आहे ॥ ७१ ॥ असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु ।
परि मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२ ॥ नाना सद्धिचे गुण ।
त्याहिवरी कृपाळूपण । सद्गुरूचें हें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके सद्गुरुलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥


१. बहकण्यास. २. तोंड लपविणारा. ३. सटवाईची बाधा होऊन झिजूं
लागली. ४. पश्चात्ताप. ५. खचित. ६. स्वप्नांत येऊन उपदेश देणारा.

१ वा.] सच्छिष्यलक्षण. १०५
३. सच्छिष्यलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां सद्गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण ।
आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १ ॥ सद्गुरूविण सच्छिष्य ।
तो वायां जाय निःशेष । कां सच्छिष्येंविण विशेष । सद्गुरू शिणे ॥ २ ॥ उत्तम
भूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडेंखाद । कां तें उत्तम बीज परी
संबंध । खडकेसि पडिला ॥ ३ ॥ तैसा सच्छिष्य तो सत्पात्र । परी गुरु सांगे
मंत्रतंत्र । तेथें अरैल ना परैल । कांहींच नाहीं ॥ ४ ॥ अथवा गुरु पूर्ण कृपा
करी । परी शिष्य अनधिकारी । भाग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५ ॥
तैसें एकाविण एक । होतसे निरर्थक । परलोकींचें जें सार्थक । तें दूरि
दुरावे ॥ ६ ॥ म्हणोनि सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथें न लागती सायास । त्या
उभयतांचा हव्यास । पुरे एकसरां ॥ ७ ॥ सुभूमि आणि उत्तम कण ।
उगवेना पर्जन्येंविण । तैसें अध्यात्मनिरूपण । नसतां होय ॥ ८ ॥ शेत
पेरिलें आणि उगवलें । परंतु निगेविण गेलें । साधनेंविण तैसें झालें ।
साधकासी ॥ ९ ॥ जोंवरी पीक आपणासि भोगे । तोंवरी अवघेंचि करणें
लागे । पीक आलियाहि उगें । राहूंच नये ॥ १० ॥ तैसें आत्मज्ञान झालें ।
तरी साधन पाहिजे केलें । एक वेळ उदंड जेविलें । तरी सामुग्री पाहिजे
॥ ११ ॥ म्हणोनि साधन अभ्यास आणि सद्गुरु । सच्छिष्य आणि सच्छास्त्र-
विचारु । सत्कर्म आणि सद्वासना पारु । पाववी भवाचा ॥ १२ ॥ सद्गुपा-
सना आणि सत्कर्म । सच्छिष्य सत्क्रिया आणि स्वधर्म । सत्संग आणि
नित्यनेम । निरंतर ॥ १३ ॥ ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान
निवेळें । नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदायीं ॥ १४ ॥ येथें शर्ब्द
नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्गुरूपार्शी । सद्गुरु पालटी अवगुणांसी ।
नाना यत्नेंकरूनी ॥ १५ ॥ सद्गुरूचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें
असद्गुरु न पालटे । कां जे थोरपण तुटे । म्हणोनियां ॥ १६ ॥ या कारणें
सद्गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे । नाहीं तरी होइजे । पाषांडीं वर-
पेंडे ॥ १७ ॥ येथें सद्गुरूचें कारण । येर सर्व निष्कारण । तथापि सांगतों
१. किड्यांनीं खाल्लेलें. २. इहलोक. ३. परलोक. ४. पाहिजे. ५. परिपक्व
होतें. ६. बोल, दोष. ७. लाभतो. ८. स्वैराचारास. ९. प्राप्त.

१०६ 'श्रीदासबोध. [ दशक

वोळखण । सच्छिष्याची ॥ १८ ॥ मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं
विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९ ॥ शिष्य
पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ । शिष्य पाहिजे केवळ ।
विरक्त अनुतापी ॥ २० ॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे शुचि-
ष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त¹ । सर्व प्रकार्रीं ॥ २१ ॥ शिष्य पाहिजे साक्षे-
पी² विशेष । शिष्य पाहिजे परमदक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष्य³ । लक्षी⁴ ऐसा
॥ २२ ॥ शिष्य पाहिजे अतिधीर । शिष्य पाहिजे अति उदार । शिष्य
पाहिजे अतितत्पर । परमार्थविषयीं ॥ २३ ॥ शिष्य पाहिजे परोपकारी ।
शिष्य पाहिजे निर्मत्सरी । शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४ ॥
शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे
अगाध । उत्तम गुणांचा ॥ २५ ॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत⁵ । शिष्य पाहिजे
प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिमंत । मर्यादांचा ॥ २६ ॥ शिष्य पाहिजे
युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे सतत । विचार घेता
॥ २७ ॥ शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढव्रताचा⁶ । शिष्य
पाहिजे उत्तम कुळींचा । पुण्यशीळ ॥ २८ ॥ शिष्य असावा सात्विक ।
शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९ ॥
शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कार्याक्लेशी⁷ । शिष्य असावा पर-
मार्थासी । वाढवूं जाणे ॥ ३० ॥ शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा
जगन्मित्र । शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१ ॥ शिष्य असावा
सद्दिद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा । शिष्य असावा अंतरींचा । परम
शुद्ध ॥ ३२ ॥ शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी । शिष्य
असावा संसारदुःखी । संतसंदेहीं ॥ ३३ ॥ जो संसारदुःखें दुखवला । जो
त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी झाला । परमार्थासी ॥ ३४ ॥ बहुत
दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे । संसारदुःखाचेनि गुणें ।
वैराग्य उपजे ॥ ३५ ॥ जयास संसाराचा त्रास । तयासीच उपजे विश्वास ।
विश्वासबळें दृढ कांस । धरिली सद्गुरुची ॥३६॥ अविश्वासें कांस सोडिली ।


१. नियमितपणें वागणारा. २. उद्योगी. ३. लक्षांत घेण्यास कठीण, ब्रह्म. ४.
लक्षांत घेई. ५. बुद्धिमान्. ६. निश्चयी. ७. देहकष्ट सहन करणारा.

ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं । नाना जलचरीं तोडिलीं । मध्येंच सुखदुःखें
॥ ३७ ॥ या कारणें दृढ विश्वास । तोचि जाणावा सच्छिष्य । मोक्षाधिकारी
विशेष । अग्रगण्य ॥ ३८ ॥ जो सद्गुरुवचनें निवाला । तो सायुज्यतेचा आं-
खिला । संसारपांगें पांगिला । न वचे कदा ॥ ३९ ॥ सद्गुरूहुनि देव मोठा ।
जयास वाटे तो शिष्य करंटा । सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें
॥ ४० ॥ सद्गुरुस्वरूप तें संतें । आणि देवास मांडे कल्पांत । तेथें कैचें उ-
रेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१ ॥ म्हणोनि सद्गुरुसामर्थ्य अधिक । जेथें
अर्टती ब्रह्मादिक । अल्पबुद्धि मानव रंक । तयास हें कळेना ॥ ४२ ॥
गुरुदेवां बराबरी । करी तो शिष्य दुराचारी । भ्रांति बैसली अभ्यंतरीं ।
सिद्धांत नेणवे ॥ ४३ ॥ देव मनुष्यीं भाविला । मंत्रीं देवपणासि आणिला ।
सद्गुरु तो नवचे कलिपला । ईश्वराचेनी ॥ ४४ ॥ म्हणोनि सद्गुरु पूर्णपणें ।
देवाहूनि अधिक कोटिगुणें । जयास वर्णितां भांडणें । वेदशास्त्रां लागलीं
॥ ४५ ॥ असो सद्गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे । देवसामर्थ्य तें केवढें ।
मायाजनित ॥ ४६ ॥ असो सद्गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तया-
पाशीं । ज्ञानबळें वैभवासी । तृणतुल्य केलें ॥ ४७ ॥ सद्गुरुकृपेचेनि बळें ।
अपरोक्ष ज्ञानाचेनि उसाळें । मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न ये ॥४८॥
ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव । तेणें गुणें देवराव । स्व-
येंच होती ॥ ४९ ॥ अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध झालें । पुढें
सद्गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५० ॥ लागतां सद्गुरुवचनपंथें ।
झालें ब्रह्मांड पालथें । तरी जयांच्या शुद्ध भावार्थे । पालट न धरिजे ॥५१॥
शरण सद्गुरुसि गेले । ते सच्छिष्य ऐसे निवडले । क्रियापालटें झाले ।
पावन ईश्वरीं ॥५२॥ ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वांटेकरी । येर मायिक
वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३ ॥ वाटे विषयाचें सुख । परमार्थ संपादनें
लौकिक । देखोदेखीं पढतमूर्ख । शरण गेले ॥ ५४ ॥ झाली विषयीं वृत्ति
अनावर । दृढ धरिला संसार । परमार्थचर्चेचा विचार । मलिन जाहला
॥ ५५ ॥ मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा । भारवाही


१. सुखदुःखरूपी जलचरांनीं. २. सेवक. ३. संसारांतील दैन्यानें. ४. दीन
केला. ५. नित्य. ६. मंदावतात. ७. कल्पिला. ८. अनुभवाचें.

१०८ श्रीदासबोध. [ दशक
कुटुंबाचा । काबाडी जाहला ॥ ५६ ॥ मानिला प्रपंचीं आनंद । केला
परमार्थीं विनोद । आंत मूढ मतिमंद । लोधला¹ कर्मीं ॥ ५७ ॥ सूकर
पूजिलें विलेपनें । जैसा मर्दिला चंदनें । तैसा विषयी ब्रह्मज्ञानें । विवेकें
बोधिला ॥ ५८ ॥ रासभें² उकरडां लोळे । तयास परिमळसोहळे । उलूक³
अंधारीं पळे । तया केवीं हंसपंगती ॥ ५९ ॥ तैसा विषयदरीचा बरांडी⁴ ।
घाली अधःपैतनीं उडी । तयास भगवंतीं आवडी । सत्संग कैंचा ॥ ६० ॥
वरती करून दांताळी । श्वानपुत्र हाडें चघळी । तैसा विषयी तळमळी ।
विषयसुखाकारणें ॥ ६१ ॥ तया श्वानमुखीं परमान्नं । मर्कटासि सिंहासन ।
तैसें विषयासक्तास ज्ञान । जिरेल कैचें ॥ ६२ ॥ रासभें राखतां जन्म गेला ।
तो पंडितांमध्यें प्रतिष्ठािला । न वचे तैसा अभक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३ ॥
मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षूनियां विष्टेचा
गोळा । हंस म्हणवी ॥ ६४ ॥ तेसे सज्जनाचे संगतीं । विषयी सजन म्हण-
विती । विषय अमेध्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५ ॥ कांखे घेऊनियां
दारा । म्हणे मज संन्यासी करा । तैसा विषयी सैरावैरा । ज्ञान बडबडी
॥ ६६ ॥ असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख । नरकीं प्राणी
बरक । भोगिती स्वइच्छेनें ॥ ६७ ॥ वेश्येची करील सेवा । तो कैसा भली
म्हणावा । तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवीं ॥ ६८ ॥ तैसे वि-
षयी बापुडे । तयांस ज्ञान कोणीकडे । वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे
जाहले ॥ ६९ ॥ ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमध्यें कनिष्ठ । हीन अवि-
वेकी आणि दुष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७० ॥ ऐसे जे कां पापरूप । दीर्घ-
दोषी पापी वज्रलेप । तयांस प्रायश्चित्त अनुताप । उद्भवतां आहे ॥ ७१ ॥
तिहीं पुनः शरण जावें । सद्गुरूंसि संतोषावें । कृपादृष्टि जाहलिया
व्हावें । पुन्हा शुद्ध ॥ ७२ ॥ स्वामिद्रोह जयास घडे । तो यावच्चंद्रसूर्य
नरकीं पडे । तपास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचूनी ॥ ७३ ॥
स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें । तेणें गुणें उपतिष्ठिलें ।
नाहींच ज्ञान ॥ ७४ ॥ भाव आणिला जायाचाँ । मंत्र घेतला गुरूचा ।
१. लुब्ध झाला. २ गाढव. ३. बुबड. ४. आशाळभूत. ५. नरकांत. ६. दूध.
७. अपवित्र. ८. ब्रह्मानंद. ९. प्राप्त झालें. १०. उसना.

५ वा.] सच्छिष्यलक्षण. १०५
शिष्य झाला दों दिवसांचा । मंत्राकारणें ॥ ७५ ॥ ऐसे केले गुरु उदंड ।
शब्द शिकला पाषांड । झाला तोंडाळ तेंरमुंड । महा पाषांडी ॥ ७६ ॥
घडी एक रडे आणि पडे । घडी एक वैराग्य चढे । घडी एक अहं-
भाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७ ॥ घडी एक विश्वास धरी । सर्वैचि घडी एक
गुरगुरी । ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८ ॥ काम क्रोध मद मत्सर ।
लोभ मोह नाना विकार । अभिमान कापट्य विकार । हृदयीं नांदती
॥ ७९ ॥ अहंकार आणि देहपांगें² । अनाचार आणि विषयसंग । संसार
प्रपंच उद्वेग । अंतरीं वसे ॥ ८० ॥ दीर्घदोषी कृतघ्न पापी । कृत्रिम कु-
तर्की विकल्पी । भक्त अभावी शीघ्रकोपी । निष्ठुरपणें घातकी ॥ ८१ ॥
हृदयशून्य³ आणि आळसी । अविवेकी आणि अविश्वासी । अधीर अ-
विचार संदेहासी । दृढ धर्त्ता⁴ ॥ ८२ ॥ आशा ममता कल्पना । कुबुद्धि
दुर्बुद्धि दुर्वासना । अल्पबुद्धि विषयकामना । हृदयीं वसे ॥ ८३ ॥ ई-
षणे⁵ असूया⁶ तिरस्कारें । निंदेसि प्रवर्ते आदरें । देहाभिमानी हुंबरे⁷ । जा-
णतपणें ॥ ८४ ॥ क्षुधा तृषा आवरेना । निद्रा सहसा धरवेना । कुटुंब-
चिंता वोसरेना । भ्रांति पडिली ॥ ८५ ॥ शाब्दिक बोले उदंड वाचा ।
लेश नाहीं वैराग्याचा । अनुताप धारिष्ट साधनांचा । मार्ग न धरी ॥ ८६ ॥
भक्ति विरक्ति ना शांती । सद्वृत्ति लीनता न नांदती । कृपा दया ना तृप्ती ।
सद्बुद्धि असेचि ना ॥ ८७ ॥ काया क्लेशी शरीरहानि । धर्माविषयीं परम-
कृपण । क्रिया पालटेना कठिन । हृदय जयाचें ॥ ८८ ॥ आर्जव⁸ नाहीं ज-
नांसी । जो अप्रिय सज्जनांसी । जयाचे जीवीं अहर्निशीं । परन्यूंन⁹ वसे
॥ ८९ ॥ सदा सर्वकाळ लटिका । बोले मायिकें लांपणिका¹⁰ । क्रिया विचार
पाहतां एका । वचनीं सत्य नाहीं ॥ ९० ॥ परपीडेविषयीं तत्पर । जैसा
विंचू आणि विखार । तैसा कुशब्दें जिव्हार¹² । भेदी सकळांचें ॥ ९१ ॥
आपुले झांकी अवगुण । पुढिलांसि बोले कठिन । मिथ्या गुण दोषांविण ।
दोष लावी ॥ ९२ ॥ स्वयें पापात्मा अंतरीं । पुढिलांची कणेव¹³ न करीं ।
१. मधेंच तोंड घालणारा. २. देहाचा लोभ. ३. प्रेमशून्य. ४. धारण कर-
णारा. ५. वासना. ६. मत्सर. ७. चढून जातो. ८. सरळपणा. ९. दुसऱ्याचें उणें.
१०. कपटाची. ११. वाणी. १२. अंतःकरण. १३. दया.