दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 253, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२१८ श्रीदासबोध. [ दशक
ब्रह्मीं ॥ ४ ॥ निष्प्रपंच म्हणिजे काय । निष्कलंक म्हणिजे काय । निरु-
पाधी म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ५ ॥ निष्प्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं ।
निष्कलंक म्हणिजे कलंक नाहीं । निरुपाधि म्हणिजे उपाधि¹ नाहीं । पर-
ब्रह्मीं ॥ ६ ॥ निरुपम म्हणिजे काय । निरालंब म्हणिजे काय । निरपेक्ष
म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ७ ॥ निरुपम म्हणिजे उपमा नाहीं ।
निरालंब म्हणिजे अवलंब² नाहीं । निरपेक्ष म्हणिजे अपेक्षा नाहीं । पर-
ब्रह्मासी ॥ ८ ॥ निरंजन म्हणिजे काय । निरंतर म्हणिजे काय । निर्गुण
म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ९ ॥ निरंजन म्हणिजे अंजन³चि नाहीं ।
निरंतर म्हणिजे अंतर नाहीं । निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥
१० ॥ निःसंग म्हणिजे काय । निर्मळ म्हणिजे काय । निश्चळ म्हणिजे
काय । मज निरूपावें ॥ ११ ॥ निःसंग म्हणिजे संगाचि नाहीं । निर्मळ
म्हणिजे मळचि नाहीं । निश्चळ म्हणिजे चळ नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥
निःशब्द म्हणिजे काय । निर्दोष म्हणिजे काय । निवृत्ति म्हणिजे काय ।
मज निरूपावें ॥ १३ ॥ निःशब्द म्हणिजे शब्दचि नाहीं । निर्दोष म्हणिजे
दोषचि नाहीं । निवृत्ति म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥ नि-
ष्काम म्हणिजे काय । निर्लेप म्हणिजे काय । निष्कर्म म्हणिजे काय । मज
निरूपावें ॥ १५ ॥ निष्काम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे ले-
पचि नाहीं । निष्कर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६ ॥ अनाम
म्हणिजे काय । अजन्मा म्हणिजे काय । अप्रत्यक्ष म्हणिजे काय । मज नि-
रूपावें ॥ १७ ॥ अनाम म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि
नाहीं । अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥ अगणित म्हण जे
काय । अकर्तव्य म्हणिजे काय । अक्षय म्हणिजे काय । मज निरूपावें ॥
१९ ॥ अगणित म्हणिजे गणित नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्य नाहीं ।
अक्षय म्हणिजे क्षय नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥ अरूप म्हणिजे काय ।
अलक्ष्य म्हणिजे काय । अनंत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २१ ॥ अरूप
म्हणिजे रूपचि नाहीं । अलक्ष्य म्हणिजे लक्ष्य⁴चि नाहीं । अनंत म्हणिजे
अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥ अपार म्हणिजे काय । अढळ म्हणिजे
१. संबंध. २. आधार. ३. मळ. ४. लक्षांत आणण्याजोगें.