दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 252, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें९ वा. ] आशंका. २१७
विलें । तयास शून्यत्व ऐसें बोलिलें । वस्तुप¹क्षीं अभिन्न झालें । पाहिजे
आधीं ॥ ७२ ॥ वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहणें । निश्चयेंसि भि-
न्नपणें । शून्यत्व लाभे ॥ ७३ ॥ या कारणें शून्यत्व कांहीं । परब्रम्ह होणार
नाहीं । वस्तुस्वरूप होऊनि पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥ आपण वस्तु सि-
द्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये । साधु सांगती उपाय । तूं चि आत्मा
॥ ७५ ॥ मन मी ऐसें नों²थिलें । संतीं नाहीं निरूपिलें । मानावें कोणा-
च्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥ संतवचनीं ठेवितां भाव । तोचि शुद्ध
स्वानुभव । मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥ जयाचा घ्या-
वा अनुभव । तोचि आपण निरवय³व । आपुला घेती अनुभव । विश्व-
जन ॥ ७८ ॥ लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि झाले । मग ते
भाग्य पुरुषीं भोगिले । सावकाश ॥ ७९ ॥ तैसें देहबुद्धि सोडितां । साध-
कास झालें तत्वतां । अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥ आपण
वस्तु मुळीं एक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जा-
हला ॥८१॥ आत्मज्ञान निरूपिलें । यथामतीनें बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा
केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टम-
दशके शून्यत्वनिरसननिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ६४३.
दशक नववा.
१. आशंका.
श्रीगणेशाय नमः ॥ निराकार म्हणिजे काय । निराधार म्हणिजे काय ।
निर्विकल्प ह्मणिजे काय । मज निरूपावें ॥ १ ॥ निराकार म्हणिजे आकार
नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं । निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं ।
परब्रह्मीं ॥२॥ निरामय म्हणिजे काय । निराभास म्हणिजे काय । निरवय-
व म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ३ ॥ निरामय म्हणिजे आम⁴य नाहीं ।
निराभास म्हणिजे भासचि नाहीं । निरवयव म्हण्जे अवयव नाहीं । पर-
१. ब्रह्माचिंतनानें. २. नसलेलें. ३. अवयवरहित. ४. दुःख.