सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 188, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 188

ळाया कारण । केलेंच करावें निरूपण । तेथील जे कां निजखूण । ते मज
अनुभवावी ॥ ४७ ॥ अजन्मा तो सांग कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न ।
येथें कैसें निरूपण । बोलिलें आहे ॥ ४८ ॥ जाणोनि शिष्याचा आदर ।
स्वामी देती प्रत्युत्तर । तेंचि आतां अतितत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९॥
ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंचि जाण । तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न ।
तोहि आतां सांगतों ॥ ५० ॥ स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा
संसार । तेथें तुवां सारासार । विचार केला ॥ ५१ ॥ रिघोनि सद्गुरूंसि श-
रण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी ऊनखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२॥
याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव । निवांत विश्रांतीचा ठाव ।
ते तूं जाण जागृती ॥ ५३ ॥ ज्ञानगोष्टीचा गलबला । सरोन अर्थ प्रगटला ।
याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४ ॥ तुज वाटे हे जागृती ।
मज झाली अनुभवप्राप्ती । या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥
अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला । हााहि स्वप्नींचा
चेइला । नाहींस बापा ॥ ५६ ॥ जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी
अजन्मा तो मी । जागेपणें स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७ ॥ स्वप्नीं वाटे
जागेपण । तैसी अनुभवाची खूण । आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप
॥ ५८ ॥ जागृति या पलीकडे । तें सांगणें केवीं घडे । जेथें धारणाचि मोडे ।
विवेकाची ॥ ५९ ॥ म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये असें जाण ।
निःशब्दांची ऐसी खूण । ओळखावी ॥ ६० ॥ ऐसें आहे समाधान । बोल-
तांच न ये जाण । इतुकेन बाणली खूण । निःशब्दाची ॥ ६१ ॥ इति श्रीदा-
सबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके अनिर्वाच्यनिरूपणं नाम दशमः
समासः ॥१० ॥
१. अनुभव. २. जागृत झाला. ३. स्वप्नात जसें जागृत आहोंसें वाटतें,
त्याप्रमाणें तुला अनुभव आला असें वाटतें; पण खऱ्या जागृताला, मी स्वप्नांत
नाहीं, जागा आहे, असें स्मरण असण्याचें कारण नाहीं, त्याप्रमाणें खऱ्या अनुभ-
वाचे वेळीं 'अनुभव आला' हें स्फुरण राहाणें शक्य नाहीं. ४. स्थिति. ५. जेथें
शब्दांचें कार्य नाहीं अशा ब्रह्माची.