सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 121, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 121

८६ श्रीदासबोध. [ दशक
सेवनें । उमजों लागे ॥ ९ ॥ वेदश्रुतिगर्भे वेदांते १ । सिद्धभावगर्भे सिद्धांते २ ।
अनुभव अनिर्वाच्य धादांते ३ । सत्य वस्तू ४ ॥ १० ॥ बहुधा अनुभवाचीं अंगें ।
सकळ कळती संतसंगें । चौथे भक्तीचे प्रसंगें । गौप्य तें प्रगटे ॥ ११ ॥
प्रकट असोनि नसे । गौप्य असोनि भासे । भासा अभासाहूनि अैनारिसे ५ ।
गुरुगम्य ६ मार्ग ॥ १२ ॥ मार्ग होय परी अंतरिक्ष । येथें सर्वहि पूर्वपक्ष । पाहूं
जातां अलक्षं ७ । लक्षवेना ॥ १३ ॥ लक्षें जयासि लक्षावें । ध्यानें जयासि ध्यावें ।
तैसें तेंचि आपण व्हावें । त्रिविर्धा प्रचीती ८ ॥ १४ ॥ असो हीं अनुभवाचीं
द्वारें । सकळ कळती सारासारविचारें । सत्संगेंकरूनि सत्योत्तरें । प्रत्ययासि
येती ॥ १५ ॥ सत्य पाहतां नाहीं असत्य । असत्य पाहतां नाहीं सत्य । सत्यअस-
त्यांचें कृत्य ॥ पाहणारापासीं ९ ॥ १६ ॥ पौहणार पौहणें जया लागलें । तें
तद्रूपत्वें प्राप्त जाहलें । तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७ ॥
नाना समाधानें पाहतां । बाणती सद्गुरु करितां । सद्गुरूविण सर्वथा । स-
न्मार्ग नसे ॥ १८ ॥ प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेप विद्याभ्यास ।
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९ ॥ जें अभ्यासें अभ्या-
सितां न ये । जें साधनें असाध्य होय । तें सद्गुरूविण काय । उमजों जाणे
॥ २० ॥ या कारणें ज्ञानमार्ग । कळाया धरावा सत्संग । सत्संगेंविण प्रसं-
ग । बोलोंचि नये ॥ २१ ॥ सेवावे सद्गुरूचे चरण । या नांव पादसेवन ।
चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरूपिलें ॥ २२ ॥ देव ब्राह्मण महानुभाव ।
सत्पात्रें भजनाचा ठाव । ऐसिये ठायीं सद्भाव । सदृढ धरावा ॥ २३ ॥ हें
प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें । परंतु सद्गुरुपाद सेवनें । या
नांव पादसेवन ॥ २४ ॥ पादसेवन चौथी भक्ती । पावन कारितसे त्रिज-
गती । जयेकरितां सायुज्यमुक्ती । साधकांसि होय ॥ २५ ॥ म्हणोनि
येराहूनि थोर । चौथे भक्तीचा निर्धार । जयेकरितां पैलपार । बहुत
१. शास्त्रांतील विचार. २. सिद्ध पुरुषांचा अनुभव. ३. गुरूचा अनुभव. ४.
स्वतःचा अनुभव. ५. वेगळे. ६. गुरुकृपेनेंच साध्य. ७. अचिंत्य ब्रह्म. ८. शास्त्राचा,
गुरूचा व स्वतःचा अनुभव. ९. पहाणारा व पहाणें हा भेदभाव ज्यावर अधिष्ठित
आहे तें ब्रह्म सर्वत्र एकरूप आहे असें कळलें तर. १० महात्मे.