सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 120, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 120

४ था. ] पादसेवनभक्ति. ८५
मध्यें कोणी एक । म्हणतां होतसे सार्थक । नामस्मरणें पुण्यश्लोक¹ । होईजे
स्वयें ॥ २० ॥ कांहींच न करून प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट
चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१ ॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें
पुण्यशरीर । नाना दोषांचे गिरिवर² । रामनामें नासती ॥ २२ ॥ अगाध
महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हालाहलापासून सुटला ।
प्रत्यक्ष चंद्रमौळी³ ॥ २३ ॥ चहूं वर्णांस नामाधिकार । नामीं नाहीं लहा-
न थोर । जड मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥ म्हणोनि नाम अखंड
स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरे भक्तीचें स्वभावें । लक्षण ऐसें
॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके नामस्मरणनिरूपणं
नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
———
४. पादसेवनभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां जाहलें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण ।
आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १ ॥ पादसेवन तेंचि जाणावें ।
काया वाचा मनोभावें । सद्गुरूपाय सेवावे । सद्गतीकारणें ॥ २ ॥ या नांव
पादसेवन । सद्गुरुपदीं अनन्यशरण । निरसाया जन्ममरण । यातायाती
॥ ३ ॥ सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाय नाहीं । या कारणें लवलाहीं ।
सद्गुरुपाद सेवावे ॥ ४ ॥ सद्वस्तु⁴ दाखवी सद्गुरु । सकळ सारासार विचारू ।
परब्रह्माचा निर्धारू । अंतरीं बाणे ॥ ५ ॥ ॥ जें वस्तु दृष्टी दिसेना । आणि
मनासही भासेना । संगत्यागांविण येईना । अनुभवासी ॥ ६ ॥ अनुभव
घेतां संगत्याग नसे । संगत्यागाविण अनुभव न दिसे । हें अनुभवासियासीच
भासे । येरां गाथागोवी ॥ ७ ॥ संगत्याग⁵ आणि निवेदन⁶ । विदेहस्थिति
अलिप्तपण । सहजस्थिति उन्मनीं⁷ विज्ञानं⁸ । हे सप्तहि एकरूपी ॥ ८ ॥ यां
हीं वेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें । हें सकळहि पाद-
———
१. ज्याची कीर्ति गाणें पुण्यकारक आहे असा पुरुष. २. मोठमोठे पर्वत. ३.
ज्याचे मस्तकीं चंद्र आहे तो, शिव. ४. ब्रह्म. ५. विषयासक्तीचा त्याग. ६.
आत्मनिवेदन (द. ४, स. ९ पहा.). ७. समाधिस्थ योग्याची एक अवस्था.
८. ब्रह्मज्ञानाचा अनुभव.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 120, कुल 467 में से · SarvaKosh