छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
इस ग्रन्थ के बारे में
यह पुस्तक हिन्दवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज (1630–1680) के जीवन का परिचय देती है। सूची में इसे के. ए. केळूसकर की कृति का हिन्दी रूप बताया गया है, किन्तु स्कैन के आरम्भिक पृष्ठ दिखाते हैं कि यह मराठी में लिखी डॉ. प्र. न. देशपांडे की पुस्तक 'छत्रपती शिवाजी महाराज' है। इसे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई ने 15 अगस्त 2002 को प्रथम आवृत्ति के रूप में प्रकाशित किया।
पुस्तक में शहाजीराजे और जिजाबाई की पृष्ठभूमि से आरम्भ करके शिवाजी का जन्म और बचपन, स्वराज्य की प्रतिज्ञा, तोरणा दुर्ग की विजय, जावळी, प्रतापगढ़ में अफ़ज़ल ख़ान का वध, शाइस्ता ख़ान की पराजय, सूरत पर आक्रमण, पुरन्दर की सन्धि, आगरा से निकल भागना, तानाजी द्वारा सिंहगढ़ की विजय, राज्याभिषेक और दक्षिण दिग्विजय जैसे प्रसंग संक्षेप में आते हैं।
मंडल के निवेदन में कहा गया है कि शिवाजी महाराज जैसे लोकोत्तर व्यक्तित्व को समझने का कोई भी प्रयास पूरा नहीं होता, और यह पुस्तक सामान्य पाठकों के लिए उनके जीवन का सुलभ परिचय देने के उद्देश्य से है। मराठी पाठ के 127 पृष्ठ यहाँ उपलब्ध हैं।
उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी
दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता. इ. स. १२९५
मध्ये दिल्लीचा सुलातान जलालउद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने
दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव
करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व
विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालउद्दीन
याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकाविली. खिलजीच्या स्वारीमुळे
दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इ. स. १३१७ मध्ये मुबारक खिलजी
याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच
उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर काही
वर्षांतच म्हणजे इ. स. १३२४ मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तघलक
घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. महंमद तघलकाच्या काळात दक्षिणेतील
मथुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला. परंतु तघलकांचे वर्चस्व
दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही.
इ.स. १३४७ मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र
राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट
होता. एकसंधी बहमनी राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकून राहिले. याकाळात
दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने (इ.स. १३३६ ते १५६५) बहामनीशी झुंज
देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकवून धरली परंतु महाराष्ट्रात
मात्र बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते. प्राचीन
वैभव कोसळून गेले होते. चैतन्य आटून गेले होते. बहामनींची राजकीय पकड
फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते.
अशा परिस्थितीत इ.स. १४९० च्या सुमारास एकसंधी बहमनी राज्याला तडा
गेला आणि त्याची पाच शकले झाली. पाच स्वतंत्र शाही राजवटी प्रस्थापित
झाल्या. निजामशाही (अहमदनगर), आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही
(गोवळकोंडा), बरीदशाही (बिदर) आणि इमादशाही (वऱ्हाड). दक्षिणेत
एकसंधी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारूकी घराण्याची स्वतंत्र
राजवट होती. ही राजवट इ.स. १६०१ पर्यंत म्हणजे मुगलांचा दक्षिण भारतात
प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली.
बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या
त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते. ह्या संघर्षात इमादशाही हे राज्य
नष्ट होऊन गेले. दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असतानाच
उत्तर भारतामध्ये इ.स. १५२६ मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा
म्हणजे लोदी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर
२ छत्रपती शिवाजी महाराज
प्रस्थापित केली, दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच सुमारास
पोर्तुगीजांनी इ.स. १५१० मध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली, पोर्तुगीजांनंतर
पुढे डच्च, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्याकडून परवाने मिळवून भारताच्या
किनारपट्टीवर ठिकठिकाणी वखारी घातल्या. आणि काही बंदरांवर घट्ट पकड
निर्माण केली. अशाप्रकारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल व पोर्तुगीज
या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण
करण्याचा प्रयत्न करू लागल्या.
इ. स. १५६५ मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली.
दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालीकोटच्या लढाईत
विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव
प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील
आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी
आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार
करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या
अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट
केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे
आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इ.स. १६३६
मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या
मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात
महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास
आदिलशाही आणि कुतूबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने
प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढ्य राजसत्ता महाराष्ट्रामध्ये
अस्तित्वात होत्या.
सामाजिक परिस्थिती
एकसंधी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात (इ.स.१३४७ ते १४९०)
दक्षिणेतील, विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते. क्षात्रवृत्तीच्या
मराठ्यांना बहमनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही. फारसी
भाषा ही राजदरबारी भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरू झाला.
फारसीबरोबर दखनी, हिंदी व उर्दू भाषेचे महत्त्व वाढले. शिक्षणव्यवस्था
नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला या समाजामध्ये 'अज्ञान वाढले.
अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट
होत्या. चातुर्वर्ण्य, जाती, उपजाती यांचे प्राबल्य सर्व समाजावर होते. जातीयव्यवस्थेमुळे
शिवपूर्वकाल ३
हिंदु समाज एकसंघी राहू शकला नाही. हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य
समजण्यात येऊ लागले. परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला.
स्पृश्य जातीकडून अस्पृश्य जातीवर अन्याय होत असे. त्यामुळे अस्पृश्यांचे
जीवन अधिकच केविलवाणे झाले होते. जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे
हिंदु धर्मियांचे संघटन होऊ शकले नाही. शस्त्र आणि शास्त्र यापासून बहुजन
समाज वंचित राहिला. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते.
बालविवाह, विषमविवाह, सतीची चाल, विधवांना उपेक्षित स्थान, निरक्षरता,
पुरुषजातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते. बहमनी
राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही. परंपरागत गावकीचे
अधिकार पाटील-कुलकर्णी आणि देशमुख-देशपांडे यांच्याकडे अबाधित राहिले
होते. वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते, त्यांच्या अधिकारात
कोणताही बदल झाला नव्हता. बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात
कसलाही हस्तक्षेप केला नाही. महसूल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे
ठेवणे त्यांना सोईचे वाटले. प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे
मात्र विश्वासातील मुसलमानाकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी
घेतली. लष्करामध्य स्थानिक हिंदूंना कसलेही स्थान नव्हते. एवढेच नव्हे तर
दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले
नाही. तुर्कस्थान,अरबस्थान, इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये
स्थान मिळू लागले आणि त्यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक
मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला.
बहमनी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातील समाज जीवनावर घट्ट पकड असतांनाही,
वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज
संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. संत भानुदास, दामाजी,
कान्होपात्रा, सेना न्हावी यांसारख्या संतांनी ज्ञानेश्वर नामदेवापासून चालत
आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली. वारकरी संप्रदायाचे
कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे समाजजीवनात स्थैर्य कायम राहिले.
एकसंघी बहमनी राजवटीत सूफी पंथाचे अनेक साधु दक्षिण भारतात स्थायिक
झाले. राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. परंतु हा
प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला.
शाही राजवटीतील महाराष्ट्र
मागे सांगितल्याप्रमाणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस एकसंघी बहमनी
४ छत्रपती शिवाजी महाराज
साम्राज्याची शकले होऊन पाच शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे
बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची
इमादशाही आणि अहमदनगरची निजामशाही. यापैकी दोन शाही राजवटी
स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. उरलेल्या तीन राजवटी पैकी
एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी
तुर्कस्थानमधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. शेवटच्या
दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते. आणि स्थानिक जनतेला
त्यांचेविषयी आपुलकी वाटत होती. या पाचही राजवटीत आपापसात संघर्ष
करीत राहिल्या आणि अशा या संघर्षमय काळात सोळाव्या शतकाच्या अखेरीस
बलाढ्य मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला. तेव्हा आपापसात लढणाऱ्या शाही
राजवटींना आणखी एका बलाढ्य शत्रूशी लढा देणे क्रमप्राप्त झाले. आपापले
सामर्थ्य वाढविण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदूंची मदत घेण्यास
सुरुवात केली. त्यातूनच महाराष्ट्रात मराठ्यांचा उदय झाला. शाही राज्यकर्त्यांच्या
लष्करातही मराठ्यांना स्थान प्राप्त झाले. इ.स. १६२६ मध्ये आदिलशहाने
बिदरची बरीदशाही खालसा केली. त्यापूर्वीच इ. स. १५७४ मध्ये मुर्तजा
निजामशाह याने वऱ्हाडची इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्यास
जोडला होता. अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही,
निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या.
मुघलांशी या राजवटींचे संघर्ष चालू होते. मराठ्यांच्या उदय आणि उत्कर्ष
होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली.
मराठ्यांचा उदय
बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राजवटीत काही
प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहेच. मात्र सोळाव्या
शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदूंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले
दिसून येते. ‘बुरहाने मासीर’ या समकालीन ग्रंथावरून दलपतराय, कान्हु नरसी,
साबाजी इत्यादी हिंदु व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकारपदे भूषविली होती
असे दिसून येते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश
केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी स्थानिक हिंदूंना
लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात
केली. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले.
गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते. आदिलशाही
शिवपूर्वकाल ५
प्रमाणे निजामशाहीही मराठ्यांना लष्करात प्रवेशतर मिळालाच, पण त्याचबरोबर
अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना
शाही राजवटीत मर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा
उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाही मध्ये
चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर
इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाही मध्ये जाधवराव आणि
भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो.
अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे
वऱ्हाडातील सिंदखेड या गावचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे
संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव
हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची
पत्नी आणि शिवाजीची आई होय.
निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले
घराणे. या घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या
शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार
पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे
असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी
बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील
पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स.१४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट
होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष 'राणा' ऐवजी 'राजा' ही पदवी धारण
करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गावचे पाटील
होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे
विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी
गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची
जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही
व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम
थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे निजामशहाने त्याला
ही जहागिरी दिली असावी. बाबाजी हा चार-पाच गावाचा मोकदम आणि दोन
गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच
चांगली होती. बाबाजीची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले.
इ.स.१५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी
यांनी मोठा पराक्रम गाजविला. बुऱ्हाण निजामशहाने या दोन्हीही भावांना दीड
६ छत्रपती शिवाजी महाराज
दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी
किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला.
या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा-पंधरा वर्षांचे होते. इ.स. १५९१
ते १५९५ या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त
संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत
पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुऱ्हाण निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत
वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला.
बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष
सुरू झाले. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा
निर्माण झाल्या. मूर्तजा निजामशहाला मलिकअंबरचे वर्चस्व तापदायक होईल
असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली
आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक
चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून
इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करून होता. मिआन राजूच्या सैन्याने
इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला
गेला. त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच-सहा वर्षांचा
होता. मालोजीच्या मागे विठोजीने १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला.
त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली.
मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते.
तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी
बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही.
□□□
शिवपूर्वकाल ७
२. शहाजीची कामगिरी
ज्यावेळी जहागिरीची जबाबदारी आली त्यावेळी शहाजी केवळ १२ वर्षांचा
होता. आपल्या कर्तबगारीवर शहाजीने मलिक अंबरचा विश्वास संपादन केला
आणि काही वर्षांतच तो मातब्बर सरदार झाला. त्याचे वडील मालोजी व
चुलते विठोजी हे दोघेही पराक्रमी होते. वेरूळच्या
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंपर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून
अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण
करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले.
राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतरही मलिक अंबरने धीर
सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंड्याच्या
किल्ल्यात सुरक्षित ठेऊन दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक
अंबरने
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करें१. शिवजन्म, बालपन व रोहिडेश्वर स्वराज्य प्रतिज्ञा
ऑक्टोबर १६२४ मध्ये मोठा रणसंग्राम होऊन मालिकअंबरने आदिलशाही
व मुघली फौजांना पराभव केला. या लढाईत मालिकअंबरप्रमाणे शहाजीनेही
मोठा पराक्रम गाजविला. शहाजीचा भाऊ शरीफजी यानेही या लढाईत मोठा
पराक्रम गाजविला. या लढाईत त्याला वीरमरण आले. भातवडीच्या लढाईत
मुघल आणि आदिलशहा या दोघांनाही माघार घ्यावी लागली.
भातवडीच्या अपूर्व यशानंतर निजामशाहीला उर्जितावस्था येण्यास काहीच
हरकत नव्हती. परंतु
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंजाधवारांविषयी संशय व तिरस्कार वाटू लागला. त्यातूनच २५ जुलै १६२९
रोजी लखुजी जाधवराव, त्याची २ मुले अचलोजी व रघोजी आणि नातू
बसवंत यांच्यावर निजामशहाने मारेकरी घातले आणि भर दरबारात हत्याकांड
घडून आले. हा भीषण प्रकार पाहिल्यानंतर शहाजीला निजामशाहीचा वीट
आला आणि त्याने निजामशाही सोडून मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शहाजीचा
मनोदय ओळखून बादशहा शहाजहानने शहाजीस पंचहजारी देऊ केली. त्याचा
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंकी, “शहाजीने निजामशहाचा एक नातलग हाती धरून त्याला निजामशाहीतील
एका बळकट गडावर नेऊन ठेवले आणि स्वातंत्र्य पुकारले.” यावरून असे
स्पष्ट दिसते की नाममात्र बादशहा गादीवर बसवून शहाजीला स्वतंत्र राज्य
निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा असावी.
स्वतंत्र झाल्यावर आणि आपली बाजू बळकट झाल्यावर महत्त्वाकांक्षी
शहाजीची नजर दौलताबाद किल्ल्याकडे वळली. कारण हा किल्ला ताब्यात
आला तर शहाजीचा
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंवतीने रणदुल्लाखानाने मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा
पराभव झाला. अशाप्रकारे कुतूबशहा व आदिलशहा यांना नामोहरम करून
शहाजहानने आपला मोहरा शहाजीकडे वळविला. ६ मे १६३६ रोजी शहाजहान
व आदिलशहा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तह झाला. हा तह दक्षिणेतील
राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या तहातील २ कलमे महत्त्वाची असून
एका कलमाप्रमाणे आदिलशहा हा शहाजहानचा मांडलीक झाला.
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंआहे की, 'कर्नाटकातील हे छोटे मोठे राजे माझ्या ऐवजी शहाजीलाच मोठे
मानतात अशी खंत आदिलशहाला वाटत होती.'
शिवाजीने स्वराज्य कार्य सुरू केल्यावर त्याला प्रतिबंध करण्यासाठी
आदिलशहाने जुलै १६४८ मध्ये शहाजीला कैद केले. शिवाजीकडून सिंहगडचा
किल्ला परत मिळाल्यावर शहाजीची सुटका करण्यात आली. यावेळी त्याने
आपल्याबरोबर असलेल्या कान्होजी जेधे या देशमुखास शिवाजीच्या सहकार्यासाठी
जावे असे सांगितले. सुटका झाल्यानंतर शहाजी पुन्हा कर्नाटकात
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंस्थापिण्याचा उद्योग बंगळूराहून पुणे प्रांती करविला. निजामशाही
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करें३. शिवरायाचा उदय
शिवाजीचा जन्म
फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या
दिवशी - शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला. जेधे शकावलीत
म्हटल्याप्रमाणे 'शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुण वद्य तृतीया शुक्रवार
नक्षत्र हस्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवशी शिवाजी
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंवाटून देण्यात आला. शहाजीने आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि तो
कर्नाटकात निघून गेला. पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी शहाजीने दादोजी
कोंडदेव याची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण
हे परगणे मोडत होते. शहाजी जरी कर्नाटकात गेला तरी जिजाबाई व
बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून
अशी माहिती मिळते की इ.स. १६४१च्या सुमारास शिवाजी आणि जिजाबाई
बंगलोरला शहाजीकडे
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंउल्लेखावरून शिवाजी साक्षर होता हे स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये
शहाजीच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेवाने चिरंजीवास म्हणजे शिवाजीस शहाणे
केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवाजीच्या साक्षरतेची खात्री
पटविण्यास पुरेसा आहे.
बारा मावळांवर प्रभुत्व
इ. स. १६४०-४१ मध्ये शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या बोलावण्यावरून
बंगलोरला गेले होते. तेथेच निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी शिवाजीचा
विवाह झाला. त्यानंतर इ.स. १६४२
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंडोंगराळ प्रदेशात फिरत होता. या परिसराची अचूक माहिती या काळातच
शिवाजीला झालीय.
स्वराज्य कार्यास प्रारंभ
१७ एप्रिल १६४५ रोजी शिवाजीने दादोजी नरसप्रभू देशपांडे यास
लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात
फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द
आलेला आहे. परंतु राजवाड्यासारखे इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करेंपाठवून शहाजीला कैद केले. आणि त्यानंतर अफजलखानाने शहाजीला पायात
बेड्या घालून विजापूरला आणले. शहाजीला पकडल्यानंतर आदिलशहाने
शिवाजीविरुद्ध फत्तेखान या सरदारास पाठविले. शिवाजी पुरंदरच्या किल्ल्यावर
असल्याचे समजताच फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला. पण शिवाजीच्या
मावळ्यांनी असा प्रखर प्रतिकार केला की फत्तेखानाला पळून
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करें४. स्वराज्याचा विस्तार
जावळीचे चंद्रराव मोरे
जावळीच्या प्रदेशावर सरदार मोरे यांचा अंमल होता. या मोरे घराण्यातील
पुरुषांना चंद्रराव हा पिढीजात किताब होता. शिवाजीने स्वराज्यकार्यास प्रारंभ
केला, त्या सुमारास जावळीवर दौलतराव मोरे (चंद्रराव) यांचा अंमल होता.
या दौलतरावच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न निर्माण झाला.
इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ
पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।
खाता बनाएँ या साइन इन करें