छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 24, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंउल्लेखावरून शिवाजी साक्षर होता हे स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये
शहाजीच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेवाने चिरंजीवास म्हणजे शिवाजीस शहाणे
केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवाजीच्या साक्षरतेची खात्री
पटविण्यास पुरेसा आहे.
बारा मावळांवर प्रभुत्व
इ. स. १६४०-४१ मध्ये शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या बोलावण्यावरून
बंगलोरला गेले होते. तेथेच निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी शिवाजीचा
विवाह झाला. त्यानंतर इ.स. १६४२ मध्ये जिजाबाई व शिवाजी पुण्यास
परतले. वर सांगितल्याप्रमाणे त्यांचेबरोबर शामराज निळकंठ, सोनोपंत डबीर
वगैरे मंडळी तैनातीसाठी होते. पुण्यास आल्यानंतर शिवाजीच्या कर्तृत्वाला प्रारंभ
झाला. या सुमारास शिवाजीचे वय केवळ १२ वर्षांचे होते. दादोजी कोंडदेवच्या
अनुभवाचा लाभ घेऊन या १२ वर्षांच्या मुलाने पुण्याच्या परिसरातील १२
मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले. सभासदाने असे म्हटले आहे की
‘पुण्यास येताच शिवाजीने १२ मावळे जिंकले’. वास्तविक पाहता हा १२
मावळांचा प्रदेश शहाजीच्या मूळ जहागिरीमध्ये नव्हता. शहाजी महाराजांच्या
जहागिरीत इंदापूर, पुणे, सुपे व चाकण एवढे चार परागणे होते. हा मुलूख
म्हणजे आजचे इंदापूर, भीमथडी, दौंड, पुरंदर, हवेली हे तालुके आणि भीमेच्या
दक्षिणेकडील खेड तालुक्याचा पूर्वभाग यातला मुलूख. शहाजीच्या जहागिरीच्या
मावळत्या बाजूस डोंगराळ प्रदेश होता. आजचे मुळशी, वेल्हे आणि भोर
हे पुणे जिल्ह्यातील तालुके व वाई हा सातारा जिल्ह्यातील प्रदेश शहाजीच्या
मूळच्या जहागिरीत नव्हते. परंतु दादोजी कोंडदेवच्या सुभेदारीमध्ये होते. हा
प्रदेश मावळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. त्यातील बारा मावळे म्हणजे अंदर
मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, पौड खोरे, मुठे खोरे,
मुसे खोरे, गुंजण मावळे, कानद खोरे, वेळवंड खोरे, हिरडस मावळ व रोहिड
खोरे. दादोजी कोंडदेव सुभेदार या नात्याने मावळ प्रदेशाची व्यवस्था पहात
असत. दादोजीने शेतकऱ्यांना अभयदान दिले. लावणी-संचणीची उत्कृष्ट
व्यवस्था केली. चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मावळ भागातील देशमुखाशी
ममतेने वागून त्यांना आपलेसे केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या देशमुखांना
कडक शासने केली. अशाप्रकारे मावळ प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था
प्रस्थापित करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्याचे कार्य दादोजी
कोंडदेवने केले. या काळात बाल शिवाजी दादोजी बरोबर मावळच्या दुर्गम
१८ छत्रपती शिवाजी महाराज