सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 12, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 12

प्रमाणे निजामशाहीही मराठ्यांना लष्करात प्रवेशतर मिळालाच, पण त्याचबरोबर
अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना
शाही राजवटीत मर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा
उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाही मध्ये
चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर
इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाही मध्ये जाधवराव आणि
भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो.
अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे
वऱ्हाडातील सिंदखेड या गावचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे
संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव
हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची
पत्नी आणि शिवाजीची आई होय.
निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले
घराणे. या घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या
शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार
पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे
असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी
बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील
पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स.१४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट
होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष 'राणा' ऐवजी 'राजा' ही पदवी धारण
करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गावचे पाटील
होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे
विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी
गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची
जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही
व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम
थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे निजामशहाने त्याला
ही जहागिरी दिली असावी. बाबाजी हा चार-पाच गावाचा मोकदम आणि दोन
गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच
चांगली होती. बाबाजीची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले.
इ.स.१५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी
यांनी मोठा पराक्रम गाजविला. बुऱ्हाण निजामशहाने या दोन्हीही भावांना दीड
६ छत्रपती शिवाजी महाराज