छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 20, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंआहे की, 'कर्नाटकातील हे छोटे मोठे राजे माझ्या ऐवजी शहाजीलाच मोठे
मानतात अशी खंत आदिलशहाला वाटत होती.'
शिवाजीने स्वराज्य कार्य सुरू केल्यावर त्याला प्रतिबंध करण्यासाठी
आदिलशहाने जुलै १६४८ मध्ये शहाजीला कैद केले. शिवाजीकडून सिंहगडचा
किल्ला परत मिळाल्यावर शहाजीची सुटका करण्यात आली. यावेळी त्याने
आपल्याबरोबर असलेल्या कान्होजी जेधे या देशमुखास शिवाजीच्या सहकार्यासाठी
जावे असे सांगितले. सुटका झाल्यानंतर शहाजी पुन्हा कर्नाटकात येऊन
आदिलशहाच्या वतीने कारभार पाहू लागला. जरी आदिलशहाला शहाजीचा
वारंवार संशय येत असला तरी तो शहाजीला वचकून होता. शिवाजी महाराजांचे
स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न चालू असतांना शहाजीची त्याला आतून मदत होत
होती का? असा एक प्रश्न इतिहासात निर्माण होतो. जरी शिवाजीला प्रत्यक्ष
मदत शहाजीने केल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नसला तरी शिवाजीच्या कार्यात
त्याने कधीही अडथळे आणले नाहीत ही गोष्ट लक्षणीय मानली पाहिजे.
इ. स. १६६१ मध्ये दक्षिणेतील हिंदू नायकांना एकत्रित करून उठाव करण्याचा
प्रयत्न शहाजीने केला असावा हे डच कागदपत्रांवरून सिद्ध होते. या कटाच्या
संशयावरून आदिलशहाने शहाजीस पुन्हा कैद केले होते. पण जुलै १६६३
मध्ये त्याची परत सुटका केली. त्यानंतर केवळ ५-६ महिन्यातच कर्नाटकातील
होद्देगिरी याठिकाणी शिकारीला जात असतांना घोड्यावरून पडून २३ जानेवारी
१६६४ रोजी शहाजीच्या मृत्यू झाला.
शहाजीच्या कार्याचे मूल्यमापन अनेक इतिहासकारांनी केले आहे. इतिहासाचार्य
राजवाडे यांनी तर स्वराज्य स्थापनेची मूळ कल्पना व योजना शहाजीचीच
होती असा निष्कर्ष काढला. बहुतेक इतिहासकार शहाजीचे कार्य शिवाजीला
पुरक ठरले असा निष्कर्ष काढतात. राजवाडे म्हणतात, "शिवाजीचा पूर्वावतार
जो शहाजी त्याच्या कर्तबगारीवर शहाजीचा पश्चादवतार जो शिवाजी त्याने
आपल्या कर्तबगारीची इमारत उठविली.” (राधा माधव विलास चंपू, पृष्ठ ३६.)
शहाजीच्या चरित्राचे साक्षेपी अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते
ती म्हणजे शहाजी हा स्वतंत्र बाण्याचा आणि स्वाभिमानी वृत्तीचा पुरुष होता.
इतिहासाचार्य राजवाडे लिहितात, 'मूळ धन्याचे मांडलिकत्व पत्करिता पत्करिता
ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारही असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास
पात्र होता. कर्नाटकांतील स्वराज्य स्थापनेतील हे गौणत्व शहाजी जाणून होता.
करतां, मिंधेपणाचा गंध हि ज्या स्थापनेत आढळून येणार नाही, असे स्वराज्य
दादाजी कोंडदेव, जिजाबाई व शिवाजी यांच्या द्वारा शहाजीने चौथ्यानदा
१४ छत्रपती शिवाजी महाराज