भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 95, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ेंनिवडक पदे 93
(सावकाश, सावकाश, सावकाश, हरी माझ्या घरी आले. मोठ्या, मोठ्या, मोठ्या
भावनोत्कटतेने मी त्यांचे स्वागत केले. केले, केले, केले, याने माझ्यावर कांहीतरी वशीकरण
केले घेतले, घेतले, घेतले यांनी माझे मन चोरून घेतले (झोपेतुन) जागी झाले, जागी झाले, जागी
झाले, हरिचें मुखदर्शन करायला मी जागी झाले. (अज्ञानांतुन मी उठले) पळाली, पळाली,
पळाली माझी संसाराची उपाधी पळाली. (आनंदाने) फुलले, फुलले, फुलले मी हरीमुख पाहुन
फुलले. विसरले, विसरले, विसरले मी घरचे व्यवहार विसरले. मिळाली मिळाली, मिळाली
मला मोठी पदवी मिळाली. भेटला, भेटला, भेटला नरसिंह महेताचा स्वामी भेटला.)
सांभळ शाहयर सुरता धरीने आज अनोपम मीठो रे
(ऐक सखी, प्रेममय होऊन आज आनुपम गोड (कृष्ण आला आहे.)
जे दीठो ते जोवा सरखो अमृत- पे अति मीठो रे- १
दृष्टे ने आवे, नियम जगावे वाणी- रहित विचारो रे
सत्य अनंत ज जेहेने कहिये ते नवधायी न्यारो रे- २
नवधामां तो नहि नखेडो दशधामां देखाशे रे
अचव्यो रस छे एहेनी पासे ते प्रेमी जनने पाशेरे- ३
अद्वैल ब्रम्ह- अनोपम लीला असंख जुगनो एहेवो रे
जोग - जगन- जपतप मुनी दुर्लभ, माने तेहेवो मेवो रे- ४
ज्यो- लगी, ज्यम छे, त्यमनो त्यम छे वधे घटे नही वहालो रे
आवे न जायें, जाय न आवे, नही भरयो नही ठाले रे- ५
पूर्णानंद पोते पुरषोत्तम, परम गत छे एहेनी रे
ए पद क्षर - अक्षरनी पर तमे ज्यो ज्यो चितमां चेती रे- ६
हुं- तुं मटशे, दुग्धा टळशे, निरषे थाशो निर्खी रे
भले मळ्यो नरसिंग्यो-या स्वामी, हुं हैडांना हरखी रे - ७
(जो दिसला तो पहाण्यासारखा- अमृतापेक्षांही अत्यंत गोड आहे. प्रत्यक्ष नजरेला दिसत
नाही, परंतु वाणी शिवाय (आंतल्या गंभीरतेने) विचार करतां करतां मुक्तीची इच्छा उत्पन्न करतो.
सत्य, अनंत, असे ज्याला म्हणतात तो नवधा भक्ती पेक्षां वेगळी आहे (नवधा भंक्तीने मिळणारा
नाही) नवधा भक्तीने ज्याचा निवाड (शोध) होत नाही. तो दहाव्या भक्तीत दिसतो. न चाखलेला
रस या दहाव्या भक्तीमधे आहे. प्रेमी जनानांच त्याचा रसास्वाद तो (कृष्ण) देतो. उद्वैत ब्रम्हाची
अनुपम लीला, असंख्य युगे अशीच चालू आहे. योग, जग, जप, तप, मुनी यांना दुर्लभ मानावा
तसा दिसतो.
जिथे आहे, जसा आहे, तसाच्या तसा आहे हा प्रिय वाढत नाही, कमी होत नाही, येत नाही,