भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
निवडक पदे 93
(सावकाश, सावकाश, सावकाश, हरी माझ्या घरी आले. मोठ्या, मोठ्या, मोठ्या
भावनोत्कटतेने मी त्यांचे स्वागत केले. केले, केले, केले, याने माझ्यावर कांहीतरी वशीकरण
केले घेतले, घेतले, घेतले यांनी माझे मन चोरून घेतले (झोपेतुन) जागी झाले, जागी झाले, जागी
झाले, हरिचें मुखदर्शन करायला मी जागी झाले. (अज्ञानांतुन मी उठले) पळाली, पळाली,
पळाली माझी संसाराची उपाधी पळाली. (आनंदाने) फुलले, फुलले, फुलले मी हरीमुख पाहुन
फुलले. विसरले, विसरले, विसरले मी घरचे व्यवहार विसरले. मिळाली मिळाली, मिळाली
मला मोठी पदवी मिळाली. भेटला, भेटला, भेटला नरसिंह महेताचा स्वामी भेटला.)
सांभळ शाहयर सुरता धरीने आज अनोपम मीठो रे
(ऐक सखी, प्रेममय होऊन आज आनुपम गोड (कृष्ण आला आहे.)
जे दीठो ते जोवा सरखो अमृत- पे अति मीठो रे- १
दृष्टे ने आवे, नियम जगावे वाणी- रहित विचारो रे
सत्य अनंत ज जेहेने कहिये ते नवधायी न्यारो रे- २
नवधामां तो नहि नखेडो दशधामां देखाशे रे
अचव्यो रस छे एहेनी पासे ते प्रेमी जनने पाशेरे- ३
अद्वैल ब्रम्ह- अनोपम लीला असंख जुगनो एहेवो रे
जोग - जगन- जपतप मुनी दुर्लभ, माने तेहेवो मेवो रे- ४
ज्यो- लगी, ज्यम छे, त्यमनो त्यम छे वधे घटे नही वहालो रे
आवे न जायें, जाय न आवे, नही भरयो नही ठाले रे- ५
पूर्णानंद पोते पुरषोत्तम, परम गत छे एहेनी रे
ए पद क्षर - अक्षरनी पर तमे ज्यो ज्यो चितमां चेती रे- ६
हुं- तुं मटशे, दुग्धा टळशे, निरषे थाशो निर्खी रे
भले मळ्यो नरसिंग्यो-या स्वामी, हुं हैडांना हरखी रे - ७
(जो दिसला तो पहाण्यासारखा- अमृतापेक्षांही अत्यंत गोड आहे. प्रत्यक्ष नजरेला दिसत
नाही, परंतु वाणी शिवाय (आंतल्या गंभीरतेने) विचार करतां करतां मुक्तीची इच्छा उत्पन्न करतो.
सत्य, अनंत, असे ज्याला म्हणतात तो नवधा भक्ती पेक्षां वेगळी आहे (नवधा भंक्तीने मिळणारा
नाही) नवधा भक्तीने ज्याचा निवाड (शोध) होत नाही. तो दहाव्या भक्तीत दिसतो. न चाखलेला
रस या दहाव्या भक्तीमधे आहे. प्रेमी जनानांच त्याचा रसास्वाद तो (कृष्ण) देतो. उद्वैत ब्रम्हाची
अनुपम लीला, असंख्य युगे अशीच चालू आहे. योग, जग, जप, तप, मुनी यांना दुर्लभ मानावा
तसा दिसतो.
जिथे आहे, जसा आहे, तसाच्या तसा आहे हा प्रिय वाढत नाही, कमी होत नाही, येत नाही,
94 नरसी मेहता
जात नाही जात नाही, येत नाही, भरत नाही, रिकामा होत नाही. स्वतः पूर्णानंद पुरुषोत्तम आहे.
हा परमपद आहे क्षर- अक्षराच्या पलिकडे याचे स्थान (पद) आहे, अन्ये जो जो तुम्ही मनात
विचार कराल, तों तों, तुम्हाला समजेल. मी- तू पण नाहिसे होईल. जंजाळ टळेल यांचे दर्शन
घेऊन तुं निर्भय होशील नरसिंहांचे स्वामी (श्रीकृष्ण) भेटल्यामुळे फार छान झाले. मी मर्नात
फार आनंदून गेले)
१) पारकी हुंशे महत्ता करे प्राणियां, पुण्य पारखी सर्व वात खोटी
के तो तो कर्षण करी कोदरां वावियां, क्यांथी जमे तुं दालरोटी ?
२) कें तो दान करी आप्युं अजा तणुं, क्यांथी दूहे तुं तो घेर झाटो
कें तो क्याथिर सोनारने आपिषुं क्यां थी पेहेरे तु तो कन कटोटी ?
३) उपुण्यथी रिध्दि, पुणथी सिध्दी छे, पुण्यथी पेहेरशो ढगलो डोटी
भणे नरसैं यो तु पुण्य कर प्राणिया पुण्यथी पामशे पदवी मोटी
(परक्यांच्या आशेने (परकी भरवशाचा) मोठेपणा दाखवतोस मानवा, पुण्याशिवाय सर्व
खोटे आहे. शेती करून तुं तर कोदरा (तांदुळाची एक जात) पेरलास- आतां डाळ आणि पोळी
तूं खाणार कुठुन ? केव्हां तरी तुं बकरीचें दान केलेस आतां घर झाडून तु (दूध) दुहणार कुठून ?
तुं तर सोनाराला कथील दिलेस, आता तुं सोन्याचे पदक, घालणार कुठून ? रिध्दि, सिध्दी
पुण्याने प्राप्त होतात. पुण्याने धोतर अंगरखा घालशील. नरसिंह म्हणतात, हे प्राण्या, पुण्य कर.
पुण्यानेच मोठ्या पदवीला प्राप्त करशील)
बाला रे वरनी पालखी, जोतां वनितानें थाय उलासं
नाही धोईने पोढिया रे, तिलक कीधां भाल.
वरना जानैया शोभी रहयो रे माथे नाख्यां छे अबीर गुलाल- १
लीला ते वांसणी पालखीरे तेहेना उचयकनारा चार
माथे ते बांध्या पोतियां रे, मोढे, राम- नाम पोकार- २
चोरी ते बांधी चोकमां रे, छाणां ते लाव्या सगाया
गोलपापडी देखे कुतरारे ते तो मनमां घणुं मलकाय- ३
बालावरने आगल चाले लाकडां रे पाछड चाले लाहया,
जमाई तो चाल्या सासरे, एहेना सासुने हरख न माय- ४
तोरणे तनखां उडीयां रे, मांडवे लागी लार
उठ रे सासु शंखणी रे, तारो जमाई आव्यो बहार- ५
पंधरसे पेहरामणी रे, मराणुं नामनुं गाम
लालबाईनी दीकरी रे, चिता कुंवरी एनु नाम- ६
निवडक पदे 95
जमाई तो रहया सासरें, जानैया आव्या घेर
टको पैसो सर्वे खाई गया रे, विवाह कीधो छे रूडी पेर-७
बार घडा, बार कोडियो रे उपर पैसो मेहेलो रोक
जैने कोहो एहेना बापने रे, हवे ताणीने मेहेलो पोक- ८
जीवन जमडा लेडू गया रे, देहीनो कीधो ए हाल
नरसियोनो स्वामी मल्यो रे, ते तो उतरिया भवपार- ९
(बालीकेच्या पतीची पालखी पाहून वनितेला (मृत्यु- देवता) आनंद वाटला. स्वच्छ आंघोळ
घालून त्याला झोपवला आणि कपाळावर टिळा लावला. वराकडची व-हाडी माणसें सुंदर
दिसत आहेत, त्यानी डोक्याला अबीर गुलाल लावला आहे. हिरव्या बांबुची पालखी आहे
आणि तिला चौघांनी उचलली आहे. डोक्याला रुमाल बांधले आहेत, मुखाने राम नाम
उच्चारीत आहेत. चौकांत मंडप घातला आहे. जाळण्यासाठी गोव-या आणल्या आहेत. गोल
पापड्या पाहून कुत्र्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. नव-या मुलापुढे
96 नरसी मेहता
दीकरा तो जुजवा थया रे, वहुओ दे छे गाळ
दीकरीओने जमाई लेई गया, हवे घडपणना शारे हाल ? - ५
नव नाडो जुजवी पडी ने आवी पोंहोचो काळ
बैरा छोकरो फटफट करे रे, नहाना बाळक दे छे गाळ - ६
अंतकाळे वळी आनिया रे दीकरा पथारिया द्वार
पांसळीएथी वासळी रे पछे छोडिने आपी बाहार - ७
एहेवुं सांभळी प्रभु भजो रे, संभारजो जुगवास
पर - उपकार कीधे पामशो रे, गुण गाय नरसीयो दास - ८
(सदा सर्वकाळ यौवन राहील, असे वाटत होते- हे म्हातारपण कोणी पाठवले. उंबरठा
(आता) डोंगर वाटतो आहे. गावदरीचें मैदान परदेशासारखें झाले आहे (१) पाण्याचा गुंड,
‘गंगा नदी’ झाला आहे आणि अंगावरचे केस सफेद झाले आहेत. नको होते, आणि हे कुठून
आले रे, तुझी वाट पाहिली नव्हती. घरांत अप्रतिष्ठा व्हायला लागली. याची खाट, कोप-यांत
हलवा (असे घरांत बोलुं लागले) (२) लहान पणी लाडू आवडतात, म्हातारपणीं शेव आवडते.
रोज रोज रबडी हवी असते, अशी म्हातारपणाची जबरदस्त सवय आहे (३) पहाटे माझा प्राण
अन्ना शिवाय व्याकुळ होतो आहे, आणि घरची माणसे म्हणतात ‘हा मरत नाही तुला (गप्प)
बसायला काय होते आहे?’ (४) (काय हरकत आहे) मुलगे वेगळे झाले, सुना शिव्या देतात.
मुलींना जावयी घेऊन गेले, आतां म्हातारपणी काय स्थिती होणार ? (५) नऊ नाड्या सुटत
चालल्या, अंतकाळ येऊन पोचला. बायका मुलें तिरस्कार करताहेत. आणि बालके शिव्या
देताहेत. अंतकाळी, मुलगा येऊन दारांत हजर झाला (६) फासळ्यां असणारें हे शरीर बांबुंवर
(तिरडीवर) आणि नंतर ते बाहेर सोडून देतात (जाळून, पुरून नष्ट करतात) (७) हे ऐकून (तरी)
ईश्वराचें भजन करा. युगाचे आपले अस्तित्व स्मरण करा. दुस-यांवर उपकार करून तुम्हाला
मिळेल. नरसिंह, (ईश्वराचा) दास गुण गातो (ईश्वराचे).
जुवानीने दाहाडे रे हरिने जाण्या नही रे
मोह्युं परदारा साथे मन्,
कांईक तो मोहयो रे कामिनीनां कल्पमोरे
कोई एक जोडवा धायो वन- १
पचीस ने पचास रे परपंचमो गयो रे
दोहिला आव्या साठ वरसना दंन
सित्तेरने सूधी रे कोई समझयो नहीं रे
पछे चाल्यो साधन करवा मन- २
निवडक पदे ९७
आंखडिये न सुझे रे गळे बहु नासिका रे
बोले ते तो संभळाय नहि करण
माया तो न मुके रे, तूटे नहि तृष्णा रे
ओळखायो नहि अशरण शरण- ३
हाथमां लाकडी रे, चरण चाले नहि रे
तूटीने शिथील थयुं रे अंग
मुख मोहे दंत रे एके दिसे नही रे
तोय पापियुं उदर मागे अन्न- ४
भाग्य जेहेनुं भलुं रे, आ अवसर ने ओळख्यो रे
ते तो प्राणी कहेवाय हरिना जन
नरसैयाना स्वामीने रे सुखमां संभारजो रे
जो होय पेला भवनु पुन्य- ५
(तारुण्याच्या दिवसांत हरीला ओळखले नाही. परस्त्रीचा मनाला मोह पडला. कामिनीच्या
सहवासांत कांहीजन मोहून गेले. कांही वानप्रस्थ्याच्या मागे धावले. पंचवीस आणि पन्नास तर
प्रपंचात गेले, साठीच्या घरांत तर नातवंडे झाली. सत्तरी पर्यंत तर कांही समजलेच नाही, नंतर
चालला साधन करायला मनाने.(२) डोळ्यांनी पहाणे होत नाही,नाक फार गळतें आहे. कोणी
बोलले तर कानाना ऐकायला येत नही. तरीपण माया सुटत नाही, आसक्ती तुटत नाही.
निराधाराचा आधार ओळखला नाही (३) हातांत काठी आहे. पाय चालुं शकत नाहीत, अंग
अंग शिथील झाले आहे. तोंडात एक दात दिसत नाही, तरीही पापी पोट अन्न मागत आहे.
(४) ज्याने हा जीवनातला प्रसंग ओळखला त्याचे नशिब उत्तम आहे आणि तोच ईश्वराचा
लाडका आहे. मागच्या जन्माचे पुण्य असेल तोच नरसिंहाच्या स्वामीला, सुखाच्या परिस्थितीत
स्मरत राहील (५)