अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 95, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें९४ सार्थ अमृतानुभव
तैसें दृश्य करूनियां । तें द्रष्ट्यातें द्रष्टा ॥ दाऊनि धाडिलें
वायां । दाविलेपणही ॥ २१२ ॥ जें दृश्य दृष्टाचि आहे । मा
दावणें कां साहे ॥ न दविजे तरी नोहे । तया तो कांहीं ॥ २१३ ॥
आरिसा पा न पाहे । तरी मुखचि वायां जाये ॥ तेणेंवीण आहे ।
आपणपें कीं ॥ २१४ ॥ तैसें आत्मयातें आत्मया । न दावीचि
पैं माया ॥ तरी आत्मा वावो कीं वायां । तेंचि तें कीं ना ॥ २१५॥
म्हणौनी आपणपें द्रष्टा । न करितां असे पैठा ॥ आतां जालाचि
दिठा । कां करावा ॥ २१६ ॥ नाना मागुतें दाविलें । तरी पुन-
रुक्त तेंचि झालें ॥ येणेंही बोलें गेलें । दावणें वृथा ॥ २१७ ॥
त्याप्रमाणें हें विश्वरूप दृश्य साकार करून द्रष्ट्याचा द्रष्टेपणा दाखवणें
भाग पाडले व नंतर ते दृश्यहि निरर्थक ठरविलें. २१२. हें दृश्य हाचि
द्रष्ट्याचा एक भाग आहे. मग तें दाखविणें कसें शक्य आहे ? आणि दृश्य
न दाखविलें तर मग तो द्रष्टा नाहीं असें म्हणतां येईल काय ? २१३.
आरशामध्यें आपलें मुख आपण पाहिलें नाहीं म्हणजे तें वायां गेलें असें
होतें काय ? आरसा नसला तरी मुख असतेंच ना ! २१४. त्याप्रमाणें ही
माया आत्म्याला आत्मा दाखवूं शकत नाहीं. मग आत्मा झूठ कीं माया ?
तीच कीं नाहीं, २१५. म्हणून परमात्म्यानें आपल्या ठिकाणीं द्रष्टेपण
येऊं न देतां, मूळच्या ठिकाणींच तो बसला आहे. तो तसा दिसला तरी
मायेनें त्याला द्रष्टा कां करावें ? २१६. किंवा तेंच तें पुन्हा पुन्हा दाखविलें
तर त्याची पुनरुक्ति झाली असें होतें. तेंच तें बोललेलें जसें व्यर्थ जातें तसें
वरचेवर सांगितलेले दृश्यत्व आणि द्रष्टेपण निरुपाधिक टरतें. २१७.