अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 94, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें ९३
मुख दिसो कां दर्पणीं । परी असणे कीं तये मुखपणीं ॥ तरी
जाली तें वायाणी । प्रतीती कीं ॥ २०५ ॥ देखतांचि आपण-
यातें । आलिये निदेचेनि हातें ॥ तया स्वप्ना ऐसें येथें । निहा-
ळितां ॥ २०६ ॥ निद्रिस्त सुखासनीं । वाहिजे अनुवाहणी ॥
तो साचे काय तेसणी । दशा पावे ॥ २०७ ॥ कीं सिसेवीण
एकएके । दाविली राज्य करिती रंकें ॥ तैशीं तियें स तुकें ।
आर्थीं काई ॥ २०८ ॥ ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा
जिये ठाईं ॥ तैसा चि स्वप्नीं कांहीं । न दाविजेचि कीं ॥ २०९॥
तान्हेलिया मृगतृष्णा । न भेटलिया सिणु जेसणा ॥ मा भेटलिया
कोणा । काय भेटले ॥ २१० ॥ कीं साउलियेचेनि व्याजें ।
मेळविलें जेणें दुजें ॥ तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ २११ ॥
मुख आरशांत दिसलें तर दिसो; पण वास्तविक तें आपल्या मुखाची
होणारी प्रतीती मिथ्या ठरली. २०५. झोपेंतील स्वप्नांत आपण आपणास जसें
पाहतों तसें हें पाहणें आहे. २०६. आरामशीर पर्यंकावर प्रत्यक्ष निजलेल्या
माणसाला स्वप्नांत ती इतरांकडून उचलून नेले असें झोपणारा पाहत असला
तरी प्रत्यक्षांत तसे घडलेलें दिसतें काय ? २०७. अनेक गरिबांचें 'आपण
राज्य करावें' असे मनोरथ असतात, त्यांना स्वप्नांत 'आपले मस्तक नसलेल्या
शरीरानें राज्य करत आहे,' असें दिसलें तर प्रत्यक्षांत तसें कधीं झालें
काय ? २०८. स्वप्नांत कांहींहि पाहिलें तरी प्रत्यक्ष निद्रावस्थेंत तो
जशाच्या तसाच असतो. आणि निद्रा नसते तेव्हांहि तो जशाच्या तसाच
असतो. २०९. तृषाक्रांत स्वापदाला मृगजळ दिसल्यानें धांवण्याचे फक्त
श्रम घडतात. पण समजा, त्याला मृगजळ भेटलें, तरी पाणी पितां
येईल काय ? २१०. एखाद्यानें आपल्या पडछायेला सोबती म्हणून जवळ
केलें तर त्याचें तें कृत्य वांझेच्या कृत्याप्रमाणें फोल ठरतें. २११.