सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 96, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 96

प्रकरण सातवें ९५
दोरा सर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा ॥ द्रष्टा दृश्या
तैसा । द्रष्टा साचु ॥ २१८ ॥ दर्पणें आणि मुखें । मुख दिसे
हें न चुके ॥ परी मुखी मुख सत्कें । दर्पणीं नाहीं ॥ २१९ ॥
तैसें द्रष्टा दृश्या दोहो । साच कीं देखता ठावो ॥ म्हणौनी
दृश्य तें वावो । देखिलें जरी ॥ २२० ॥ वावो कीर होये ।
तन्हीं दिसत तंव आहे ॥ येणें बोलें होये । आथी ऐसें ॥२२१॥
तरी आन आनातें । देखोनि होय देखतें ॥ तरी मानु येतें ।
देखिलें ऐसें ॥ २२२ ॥ येथें देखोनि कां न देखोनी । ऐक्य का
नाना होऊनि ॥ परी हा येणें वांचूनी । देखणें असें ॥ २२३ ॥
दोरीला जरी आपण सर्प मानला तरी मुळांत जशी खरोखर दोरी
असते, त्याप्रमाणें जगत् आणि परमात्मा यामध्यें खरा परमात्मा आहे. २१८.
आरशांत प्रतिबिंबामुळे 'पडमुख' दिसतें. तें अगदीं मुखाबरहुकूम हें तर
खरेंच. पण पडमुख हे खोटें आणि पाहणाराचें मुख हें खरें, २१९.
त्याप्रमाणें द्रष्टा आणि दिसणारें आणि दृश्य या दोन्हींमध्यें द्रष्टा हाच खरा
अधिष्ठान आहे, आणि दिसणारें व त्याच्यापासून झालेलें जग मिथ्या होय.
२२०. दृश्य निश्चयेंकरून मिथ्या आहे, पण दिसते तर खरें; म्हणूनच दृश्य
आहे असें माना. २२१. दोन मिथ्या पदार्थांत एकाने दुसऱ्यास पाहिलें
म्हणून पहिला पाहाणारा द्रष्टा झाला व त्या दृश्यामुळे त्याला द्रष्टत्व आलें
म्हणजे मूळचें नव्हते हे म्हणणें ओघानेंच प्राप्त आहे. २२२. अशा स्थितीला
पाहो वा न पाहो, एक असो किंवा भिन्न असो, पण परमार्थतः हाच एक
आहे, ह्याच्यावांचून दुसरें कांहींच नसल्यामुळे पाहणें घडेल काय ? २२३.