सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 36, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 36

प्रकरण चौथें ३५
तैसें आपणया आपण । जाणतें नव्हे जाण ॥ म्हणोनि ज्ञानपणें-
वीण । ज्ञानमात्र जें ॥ २२ ॥ आणि ज्ञान ऐशी सोये । ज्ञानपणचि
जरी साहे ॥ तरी अज्ञान हें नोहे । ज्ञानपणोंचि ॥ २३ ॥ जैसें
तेज जें आहे । तें अंधारें कीर नव्हे ॥ मा तेज तरी होये । तेजासी
काई ॥ २४ ॥ तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया
होणें ॥ आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ २५ ॥ तरी
कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ॥ तरी नाहीं हें प्रथा ।
कवणासी पां ॥ २६ ॥ शून्यसिद्धांतबोधु । कोणी सत्ता होय
सिद्धु ॥ नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥ २७ ॥ माल्ह-
वितां दिवे । माल्हवितें जरी माल्हवे ॥ तरी दीपु नाहीं हें फावे ।
कवणासी पा ॥ २८ ॥
म्हणजेच स्वरूपभूत ज्ञान आपलें आपल्याला जाणणें शक्य नाहीं.
त्याप्रमाणें स्वरूपभूत ज्ञान जाणणेंपणावांचून केवळ ज्ञानमात्रच आहे.
२२. ज्ञानरूप परमात्म्यावर ज्ञानाचा अधिकार चालेल तर परमात्मरूपच
ज्ञान अज्ञान होणार नाहीं का ? २३. जे तेज आहे, तें अंधार तर नाहींच !
मग तेजाला, ‘तें तेज आहे,’ असें तरी कसें म्हणावें ? २४. या म्हण-
ण्यानेंच तो मिथ्या म्हणजे शून्य आहे. हें सहजच सिद्ध होतें. कारण
ज्ञानरूपानें असणें किंवा नसणें हे दोन्ही धर्म ज्या परमात्म्याच्या ठिकाणीं
नाहींत. २५. अशी स्थिति असेल तर ‘सर्वथा कांहीं नाहीं’ असें ज्ञान
कोणास होतें ? २६. कांहीं हा शून्यवाद्यांचा सिद्धांत आहे. त्याचें ज्ञान
कोणाच्या सत्तेवर होतें ? शून्यत्व हा वस्तूवर आरोप आहे. २७. दिवा
मालवणारा जर दिवा मालवल्यावर नाहींसा झाला तर ‘दिवा नाहीं’ हें
कोणास कळणार ? २८.