अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 37, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें३६ सार्थ अमृतानुभव
की निदेचेनि आलेपणें । निदेलें तें जाय प्राणें ॥ तरी नीद
भली हें कोणें । कोणासी पा ॥ २९ ॥ घडु घडपणें भासे । तद्भंगें
भंगु आभासे ॥ सर्वथा नाहीं तें नसे । कोण्हे म्हणावें ॥ ३० ॥
म्हणोनी कांहीं नाहीं पण । देखता नाहीं आपण ॥ नोहोनी
असणेंनवीण । असणें जे ॥ ३१ ॥ परि आणिका कां आपण्या ।
न पुरे विखो होआवया ॥ म्हणोनी न असावया । कारण कीं
॥ ३२ ॥ जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाही निमाला । आठवु तया ॥ ३३ ॥ परी जीवें नाहीं
नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ॥ हें बोलणें न साहे । असेनाहींचें
॥ ३४ ॥
निद्रित पुरुष जर मेला तर ‘झोंप चांगली लागली होती’ हें ज्ञान
कोणास होणार ? २९. घट आहे म्हणून घटपणाचें ज्ञान होतें व तो
फुटला तर त्याच्या अभावाचें ज्ञान होतें. पण मुळींच घट नसेल तर
‘नाहीं’ असें म्हणावें तरी कोणी? ३०. ज्ञानरूप आत्मा नाहींपणा व
आहेपणा हीं दोनहि पाहात नाहीं, यावरून आत्मज्ञान ‘आहे-नाहींपणा-
वांचून’ आहेपणानेंच असतें. ३१. दुसऱ्याला किंवा योग्य आपल्याला
विषय होण्याला शुद्ध परमात्मा नाहीं; यावरून तो मुळींच नसावा असें
म्हणावयास कारण घडतें. ३२. एखादा माणूस जंगलांत निजला आहे;
त्याकडे लोक बघत नाहींत, त्या माणसाला स्वतःचेंही स्मरण नसलें तरी
३३. त्यावरून तो माणूस जिवंत नसतो असें नाहीं. परमात्म्याचें शुद्ध
स्वरूप याप्रकारचें ‘असणें’ आहे; येथें आहे-नाहींचें बोलणें लागू पडत
नाहीं. ३४.