अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 35, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें३४ सार्थ अमृतानुभव
तें वेळीं पुनिवा भरे । ना आवसा सरे ॥ तें चंद्रचि उरे ।
सतरावी जैसी ॥ १५॥ कां तेजांतरें नाटोपे । कोणें तमें न शिंपे
॥ ते उपमेचे जाउपे । सूर्यचि होय ॥ १६ ॥ म्हणोनि ज्ञानें
उजळें । कां अज्ञानें रुळे ॥ तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानपात्र जे
॥ १७ ॥ परी ज्ञानपात्रें निखळें । तेंचि कीं तया कळे ॥
काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवी ॥ १८ ॥ आकाश आपणपया
रिघे । काइ आगी आपणया लागे । आपुला माथा वळघे । आपण
कोण्ही ॥ १९ ॥ दिठी आपणया देखे । स्वाद आपणया चाखे ॥
नादु आपुलें आइकें । नादपण ॥ २० ॥ सूर्य सूर्यासी
विवळे । कां फळ आपणया फळे । परिमळु परिमळे । घेत
असे ॥ २१ ॥
चंद्राचें मूळ रूप पौर्णिमेला वाढत नाहीं किंवा अमावस्येला कमी
होत नाहीं. ती सतरावी कलाच. १५. जो अन्य प्रकाशानें आटोपत
नाहीं किंवा झांकला जात नाहीं. अशीं उपमा ज्या मुलाला देतां येईल;
तो सूर्य निश्चित म्हणावा. १६. विषयासक्त ज्ञानानें म्हणजेच अज्ञानानें
झाकाळत नाहीं किंवा परमात्म्यासंबंधींच्या परोक्ष ज्ञानानें जळत नाहीं
असें ब्रह्मज्ञान हें शुद्ध द्वैतातीत आहे. १७. एवढें मात्र खरें कीं जें शुद्ध
ज्ञान आहे, तें ज्ञान आपणा स्वतःस जाणूं शकेलच ! अरे ! बुबुळ हें
स्वतः आपल्यास पाहूं शकेल काय ? १८. आभाळ आपणांतच शिरूं
शकेल काय ? अग्नि स्वतःला पोळूं शकेल काय ? स्वतःच्या आपल्या
डोक्यावर कोणी चढूं शकेल काय ? १९. दृष्टि स्वतःला पाहूं शकेल
काय ? स्वाद आपला स्वाद आपण चाखूं शकेल काय ? आवाज स्वतःला ऐकूं
शकेल काय ? २०. सूर्य आपल्याला प्रकाशित करूं शकेल काय ? फल
आपल्यालाच फल देईल काय ? वास आपलाच वास घेऊं शकेल ? २१.