अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 28, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण तिसरें
ययाचेनि बोभाटें । आत्मयाची झोंप लोटे ॥ पूर्ण तन्ही ऋण
न फिटे । जे चेणेंचि नीद कीं ॥ १ ॥ येन्हवीं परादिका चौघी ।
जीव मोक्षाच्या उपेगी । अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ २ ॥
देहासवें हात पाये । जाती मनासवें इंद्रियें ॥ कां सूर्यासवें जाये ।
किरणजाळ ॥ ३ ॥ नातरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती
आधीं ॥ तेविं अविद्येचे संबंघीं । अटती इया ॥ ४ ॥ मृतें लोहें
होती । तें रसरूपें जिती ॥ जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ५ ॥
लवण आंगें विरे । परी स्वादें जळीं उरे । नीद मरोनि जागरें ।
जीइये निदे ॥ ६ ॥ तेवि अविद्येसवें । चौघी वेचिती जीवें ॥
तत्त्वज्ञानाचेनि नांवें । उडतीच इया ॥ ७ ॥
परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणीनें आत्म्याची
झोंप म्हणजे अज्ञान निवृत्त झालें तरी तें संपूर्ण फिटत नाहीं. कारण तो
जागेपणा झोंपेसारखा असतो. १. अविद्येच्या बंधनापासून परादि चार वाणी
मोक्ष प्राप्त करून देण्यास उपयोगी आहेत. पण अविद्येबरोबर आपल्या
स्वरूपाचा त्या नाश करून घेतील तरच त्या मोक्षोपयोगी आहेत. २. देहाचा
नाश झाल्याबरोबर हातपाय जातात. मनाचा लय झाला कीं इंद्रियांचाही
होतो. सूर्याबरोबर जशी किरणें जातात. ३. किंवा झोंप संपतांच स्वप्नाचा
नाश होतो, त्याप्रमाणें अविद्येच्या नाशानें परादि चारही वाणींचा नाश
होतो. ४. जळूनहि लोह भस्मरूपानें जिवंत असतें. लांकूड जळून गेलें
तरी निखारा शिल्लक असतो. ५. स्थूलरूपानें पाण्यांत विरघळलेलें मीठ
स्वादरूपानें असतेंच; झोंप संपली तरी जागृतिरूपानें ती झोंप जिवंत
राहते. ६. चारी वाणी स्थूलरूपानें अविद्येबरोबर नाहींशा झाल्या तरी
तत्त्वज्ञानाच्या रूपानें उत्पन्न होतात. ७.