अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 27, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें२६ सार्थ अमृतानुभव
म्हणोनि बोध्य बोधोनी । घेपे प्रमाणें साधूनि ॥ ऐसा नव्हे
भरवसेनी । गोसावी हा ॥ ७८ ॥ ऐसें करणायावीण । स्वयंभचि
जें निवृत्तिपण ॥ तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ ७९ ॥ आतां
ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरुप्रणामे येणें ॥ फेडिलीं वाचाऋणें । चौही
वाचांचीं ॥ ८० ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते श्रीगुरुस्तवन-
कथनंनाम द्वितीयप्रकरणं संपूर्णम्
उपदेशानें हा समजावून घेतां यावा किंवा प्रत्यक्ष प्रमाणांनीं प्राप्त
व्हावा अशा प्रकारचा विश्वास येथें धरतां येत नाहीं. तो इंद्रियांना अगोचर
आहे. ७८. अकृत्रिम स्वयंसिद्ध असें याचें निवृत्तिस्वरूप आहे. त्यांच्या
चरणांना मीं वंदन केलें. ७९. श्रीज्ञानेश्वर म्हणतात कीं, श्रीगुरूंना वंदन
केलें आणि चहूं वाचांचीं ऋणें फेडिलीं. ८०.
याप्रमाणें श्रीसिद्धानुवादरूपीं श्रीमत् अमृतानुभव ग्रंथांतील श्रीगुरुस्तवन
नांवाचें दुसरें प्रकरण समाप्त झालें. ॥
प्रकरण दुसरें समाप्त
—x—