सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 29, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 29

२८ सार्थ अमृतानुभव
हा तत्त्वज्ञानदिवा । मरोनी इहीं लावावा ॥ तरी हाही शीण-
लेवा । बोधरूपेंचि ॥ ८ ॥ येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपा
दावी ॥ दोन्ही दिठी नांदवी । नदी जैशी ॥ ९ ॥ जिति अविद्या
ऐशी । अन्यथा बोधातें गिवशी ॥ तेचि यथाबोधेंशीं । निमाली
उठी ॥ १० ॥ परी जिती ना मेली । अविद्या हे जाकळी ॥
बंधमोक्षी घाली । बांधोनियां ॥ ११ ॥ मोक्षचि बंधु होये । तरी
मोक्ष शब्द कां साहे । अज्ञाना घरीं त्राये । वाउगी यांची ॥ १२ ॥
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बालपणें ॥ येरा तो नाहीं
मा कोर्णे । मृत्यु मानावा ॥ १३ ॥ घटाचें नाहींपण । फुटलेयाची
नागवण ॥ मानितसे ते जाण । म्हणो ये कीं ॥ १४ ॥
या चार वाणींनीं स्वतः मरून तत्त्वज्ञानाचा दिवा लावावा हे ठीक, पण
शुद्ध बोधाच्या दृष्टीनें हीहि कटकटच आहे. स्वप्नप्राप्ति, झोंप आल्यावर
होते व ती गेली कीं, पुरुषाला स्वस्वरूप म्हणजे जागृति आणते. एक झोंपच
स्वप्न व जागृति या दोन्ही दशा दाखविते. ९. 'मी मनुष्य आहें' इ.
अन्यथाबोधाची प्राप्ति जिवंत अविद्या करून देते आणि तिचा स्थूल-
रूपानें नाश झाला कीं, 'मी ब्रह्मरूप आहें' असा यथार्थ बोध होतो.
१०. जिवंत अगर मेलेली अविद्या बंधन करितेच. मेलेली अविद्या
जीवाला मोक्षांत अडकवून टाकते. जीवाला बंधांत जखडून टाकते. ११.
मोक्ष म्हणजेहि बंधनच असेल तर त्या मोक्षाला तरी कांहीं अर्थ आहे का ?
अरे, ह्याचा बडेजाव काय तो अज्ञानाच्या घरीं. म्हणजे असेल. १२.
बागुलबुवाच्या मृत्यूनें बालकास आनंद व्हावा हें ठीक, इतरांना तो
बागुलबुवा नसतोच, मग त्याचा मृत्यु कोणीं मानावा ? १३. नसलेला घट
फुटल्यावर 'फार नुकसान झालें' असें म्हणणाऱ्या अज्ञानी लोकांना
बंधमोक्ष खरे आहेत, असें खुशाल म्हणूं द्या. १४.

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक) · पृष्ठ 29, कुल 138 में से · SarvaKosh