सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 134, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 134

सार्थ श्रीचांगदेव पासष्टी १३३
घेवों पाहें तुझें दर्शन । तंव रूपा येवों पाहे मन । तेथें दर्शना
होय अवजतन । ऐसें गमीं लागे ॥४३॥ कांहीं करी बोले
कल्पी । कां न करी न बोले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं ।
न घेति उमसू ॥ ४४ ॥ चांगया ! तुझेनि नांवे । करणें न
करणें न व्हावें । हें काय म्हणो परी न धरवे । मीपण हैं ॥४५॥
लवण पाण्याचा थावो । माजी रिघोनि गेलें पाहो । तंव तेंचि
नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥४६॥ तैसें तुज आत्मयातें
पाहीं । देखो गेलिया मीचि नाहीं । तेथें तूं कैचा काई । कल्पावया
जोगा ॥४७॥ जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जोंवि
मुके । तेंवि तूतें देखोनि मी ठाकें । कांहीं नहोनि ॥ ४८ ॥
कारण तुझें दर्शन घ्यावें अशी इच्छा करतांच माझें मन आत्माकार
व्हायला वेळ लागत नाहीं आणि मग त्या स्थितींत दर्शनाची कृतीच होणें
नाहीं असें वाटतें. ४३ चांगदेवा ! तूं एखादी चांगली कृति केलीस, बोललास,
कल्पना केलीस, किंवा असें नाहीं जरी केलेंस (कर्म किंवा कर्माचा अभाव)
तरी हे दोन्ही कांहीं तुझ्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं उत्पन्न होतच
नाहींत. ४४. करणें किंवा न करणें हा व्यवहार चांगदेवा ! स्वरूपाच्या
ठायीं होत नाहीं. आत्मत्वाचा उपदेश तुला करतांना, माझ्या आत्म्याजवळ
असलेला उपाधीचा मीपणासुद्धां नाहींसा होत आहे. ४५. चांगदेवा !
पाण्याची खोली समजून घेण्यासाठीं मिठाच्या खड्यानें पाण्यात बुडी मारली
तर तेथें मीठ कांहीं मिठाच्या रूपांत शिल्लक राहत नाहीं. मग त्या पाण्याची
खोली मोजायची रे कोणी ? ४६. तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार
करूं लागलों कीं माझा औपाधिक मीपणा नाहींसा होतो; मग मीपणाच्या
कल्पनेनें येणाऱ्या तूंपणाची कल्पना तरी करतां येण्याजोगी आहे काय ?
४७. एखादा माणूस झोप येतांना ती कशी येते, निद्रा हा कसला पदार्थ
आहे हें जाणून घेण्याची इच्छा करतो; पण निद्रा कोणत्याहि पदार्थाच्या
रूपानें त्याच्यापुढें आली नाहीं म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या
भूमिकेसहि मुकतो, त्याप्रमाणें ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीहि
प्रमुख द्रष्टाच होऊन जातो. ४८.