अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
DevanagariHindipublished138 पृष्ठ
पृष्ठ 135, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंपृष्ठ 135
१३४ सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
आंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं । परी मी आहें हें
कांहीं । नवचेंचि जैवि ॥ ४९ ॥ तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें
तूंपण मीपणेंसीं । उखतें पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ ५० ॥
डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें । आणि तेणेंचि तो
देखे । न डंडळितां ॥ ५१ ॥ तैसी उयजतां गोष्टी । न फुटतां
दृष्टी । मी तूंवीण भेटी । माझी तुझी ॥ ५२ ॥ आतां मी तूं या
उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळूं
॥ ५३ ॥ रुचतियाचेनि मिसें । रुचितें जेविजे जैसें । कां दर्पण
व्याजें दिसे । देखतें जैवि ॥ ५४ ॥ तैसीं अप्रमेयें प्रमेयें भरलीं ।
मौनाचीं अक्षरें भलीं । रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ ५५ ॥
दाट अंधारात बसलें कीं, तेथें सूर्याचा प्रकाश मिळायच दूर राहतें!, पण
स्वतःचेहि भान नाहींसें होतें. ४९. त्याप्रमाणें तुझ्या स्वरूपाचा विचार
करतांना माझा, मीपणा व तुझा तूपणा दोन्ही नाहींसें होऊन फक्त एक
आत्मतत्त्व काय तें शिल्लक उरतें. ५०. बोटानें डोळा दाबला कीं, त्याच्या
जोरावर आपल्याला चित्रविचित्र पदार्थ दृष्टीसमोर भासूं लागतात, पण हें
दाखविणारा डोळा मात्र अनेकरूप होत नाहीं. आणि अनेकत्वाचा प्रकाश
दाखविल्याखेरीज मात्र तो राहत नाहीं. ५१. त्याप्रमाणें आत्मैक्यामध्यें
अभेदपणा प्राप्त होऊन तुझा माझा अभेद मात्र मी-तूपणावांचून सिद्धच
आहे. ५२. मीं व तूं या उपाधीस बाजूला करून आत्म्याच्या एकत्वानें
मी जशी भेट घेतली (उपभोगली) व तिचा ऊहापोह केला, इतका वेळ
ज्या स्थितींचा अनुवाद केला तशाच रीतीनें तूंहि स्वतःसिद्ध भेटीचा
अनुभव घ्यावास. ५३. अन्न सेवन करणाऱ्याला पदार्थांचा स्वाद आवडला
तर त्यांतील रस जेवणाऱ्याच्या रुचीला जेववूं लागतो म्हणजे रुचीचा
उपयोग रुची हीच घेते किंवा पाहणाराच आरशाच्या मिषानें स्वतःस
बघतो. ५४. अप्रमेय परमात्मा विषद करणारा आणि प्रमेयाचें साधन असा
जो शब्द त्याला गिळून टाकणारीं अक्षरें गुंफून तुझ्या-माझ्यांतील
ऐक्याचा हा संवाद लिहिला आहे. ५५.