अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 101, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें१०० सार्थ अमृतानुभव
येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये । अनुभव न लाहे ।
आंगीं मिरौ ॥ २५२ ॥ म्हणौनि ययातें येणें । येपरीचें पाहणें ।
पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ २५३ ॥ किंबहुना ऐसें
आत्मेन आत्मा प्रकाशे । न चेतुचि चेऊ बैसे । तयासी तो
॥ २५४ ॥ स्वयें दर्शनाचिया सवा । अवघीयाचि जातसे
फावा । परी निजात्मभवा । न मोडतांची ॥ २५५ ॥ न पाहतां
आरिसा असो पाहे । तरी तेंचि पाहणें होये । आणि पाहणेन
तरी ते जाये । न पाहणें पाहणें ॥ २५६ ॥ भलतैसा फाके ।
परी येकपणा न मुके । नाना संकोच तरी असिके । हाचि
आथी ॥ २५७ ॥ सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा ॥
मा प्रकाशाची कथा । आइकता कां ॥ २५८ ॥
बोलण्याचा परिणाम नाहीं, जगण्याचा शिरकाव नाहीं, आणि अनु-
भवाची प्रतिष्ठा येथें चालत नाहीं. २५२. याचें स्वतःला पाहणें विचार-
दृष्टीनें पाहिलें नाहीं असें आहे. २५३. हा आत्म्याचा विलास आहे. तो
जागा न होतां स्वरूपानें मूळचा जागाच आहे. २५४. स्वतः दर्शनरूप
असल्यामुळे आत्मस्वरूपस्थितीवर दृश्यद्रष्टादिकांची भ्रमानें प्रमिति होत
असूनहि आत्म्याचा निजात्मभाव मोडला जात नाहीं. २५५. आरसा न
पाहतां मुख मुखपणानेंच असतें, आणि विशेष भावाचें पाहणें मुखेंच आहे.
आणि मूळ पाहण्याकडून पाहिलें तर पाहणे व न पाहणें निघून जातें.
२५६. कितीहि विस्तार होऊनहि आत्म्याचा एकपणा मोडत नाहीं, त्याचा
संकोच झाला तरी तो आहे तसा संपूर्ण असतोच २५७. कधींहि जाणवत
नाहीं, मग तो प्रकाशाची तर वार्ता कशाला ऐकतो ? २५८.