अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 102, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें १०१
अंधारु कां उचिवडु । हा येकला येकवडु । जैसा कां मार्तंडु ।
भलतेथें ॥ २५९ ॥ तैसा आवडतिये भूमिके । आरुढलीयाही
कौतुकें ॥ परी ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥ २६० ॥
सिंधूचि शीव न मोडे ॥ पाणीपण सळू न मोडे ॥ परी मोडतु
कां गाडे । तरंगाची ॥ २६१ ॥ रश्मी सूर्याची आथी । परी
बिंबा बाहेरी जाती । म्हणोनी बोधसंपत्ति । उपमा नोहे
॥ २६२ ॥ आणि पल्हेचा दोडा । न पाहतां तढा ॥ जग तंव
कापडा । न भरेचि कीं ॥ २६३ ॥ सोन्याचा रवा । रवे-
पणाचा ठेवा । आवघेयाची अवयवां । लेणें नव्हे ॥ २६४ ॥ न
फेडितां आडवावो । दिगंतोनि दिगंता जावो । नये मा पावो ।
उपमा काइ ॥ २६५ ॥
सूर्याला अंधकार असो किंवा प्रकाश असो, सूर्य ज्याप्रमाणें वाटेल तेथें
आपल्या एकरूपानें एकटा असतोच २५९. तसा कोणत्याहि त्या भूमिके-
वर कौतुकानें आरूढला तरी आपल्या स्वरूपाची हानी न होतां हा
असतो. २६०. जरी अनंत तरंग उत्पन्न झाले व नाश पावले तरी समु-
द्राची मर्यादा मोडत नाहीं व पाणीपणाचा भंग होत नाहीं. २६१. सूर्य-
किरण बिंबाच्या बाहेर जातात, म्हणून सूर्याची उपमा आत्म्याला शोभत
नाहीं. २६२. आणि कापसाचें बोंड फुटूनच कापूस सर्वत्र मिळतो, वस्त्रें
मिळतात म्हणून बोंडातल्या कापसाची उपमा आत्म्याला देतां येत नाहीं.
२६३. सोन्याच्या लगडीचा लगडपणा न मोडतां सर्व अवयवांना
घालण्यासारखे दागिने होत नाहींत. २६४. प्रतिबंध दूर केल्यावांचून
एका दिशेहून दुसऱ्या दिशेला जातां येत नाहीं, मग आत्मस्वरूपाला
दिशेची उपमा कशी देतां येईल ? २६५.