सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

वेगळेच आहे हे पोर तुझे आमच्या घरी शिंयावरचे दही, दूध, लोणी शिंयावर उरतच नाही कुठून येतो हा तुझा
पोर? कारण दार पाहिले तर ते जसेच्या तसे लावलेले असते या तुझ्या मुलाने आमच्या मुलांमुलींना नादावून सोडले
आणि आमच्या सुनांना वेड लाविले ना मा कृष्णाने १ तू अजून तरी याला नीट समजावून सांग ना या गोष्टी बऱ्या
नाहीत असे याला बजाव नाही तर आम्ही आमच्या जियाची सुद्धा परवा करणार नाही आम्ही सर्वजणी मग मिळून
आमचा नाश करून घेऊ मग मात्र तुमच्या आमच्यान अंतर निर्माण होईल २ हा तुझा पोरगा आपले परके असा लौकि-
कातील काही भेदच ठेवीत नाही भलत्याच गोष्टी करीत असतो हा पाळत ठेऊन हा आम्ही घरी नाही असे पाहून
हा आमच्या घरात शिरतो व आमच्या सुनांचे त्याच्या सोऱ्यास धरून चुंबन घेतो, आलिंगन देतो व त्याच्या बाजवर
देखील लोळत राहतो हा तुझा मुलगा हा आमच्या दह्यादुधाचे घट कडाकडा फोडून टाकतो, यशोदाबाई याला
धरू पाहावे तर हा हातात सुद्धा लागत नाही ३ आता मात्र याची भीडमुवत आम्ही काही ठेवणार नाही तो
आमच्या हातात लागला तर मग आमच्या मनात येईल ते आम्ही करू आम्ही खूप दिवस याचा त्रास सोसला तुझे हे
एकुलते एक पोर म्हणून आम्ही आतापर्यंत याच्या खोड्यांकडे दुर्लक्ष केले निवाडा केला नव्हता पण आता तो
हातात सापडला म्हणजे आम्ही त्याचे पाय जवळच्या खांबास बांधून टाकू मग काही त्याचे चालणार नाही मग
याने द्रव्य दिले प्राण दिला तरी आम्ही काही याला सोडणार नाही, मग जियाचे काय वाटेल ते होवो यशोदाबाई ! ४
तेव्हा यशोदा मातेने श्रीकृष्णाला धरून गोळणींच्या हाती दिले व म्हटले, 'हा पाहा माझा मुलगा तुम्ही सर्व निष्ठुर-
पणे या माझ्या बाळात बोलाल व तुमचा हा क्षोम त्याला बाधेल मात्र याची गुणवत्ता अशी आहे की याचा हात
जिथे लागेल तिथे दूधलोण्याचाच काय पण अमृताचाही पूर लोटतो' तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीस
पाहून मग त्या गौळणी देशास व स्वतःच्या देहभानास विसरून गेल्या ५

३९२ विरहतापें फुदे छंद करित जाली । हा गे तो गे सावधान सवेचि दुश्चितीं ।
न सामाळुनि अंग लोटी पाहे भोवतीं । वेगळीच पडो पाहे कुळाहुनिया ती ॥ १ ॥
खुंटलीसी झाली येथें अवघियाची गती । आपुलीं परावीं कोण नेंणे भोवती ।
त्याची' नांवें बोमे अहो अहो थोपती । नवलच हा येरां वाटोमिया हासती ॥ २ ॥
बाहेरीच धांवे रान। न धरीच घर । न कळे बघना जाला तेणे संचार ।
विसरोनि गेली सासुरे कीं माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आता येऊ येथें सर्वया बळा ।
त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्याळा । बहुता मते तर्कवाद निराळा ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - कुदे-हृदया दई, बोमे-हाका मारो, निश्चळ-स्तभ्य
अर्थ - एक गोपी या श्रीकृष्णाच्या विरहतापाने हुदयो देत देत नानाप्रकारचे शब्द बरळत आहे ती म्हणते
'अग हा पाहा हरी तो पाहा हरी' मग लागलीच सावध होऊन उदास बनते ही मग तिला धीर निघत नाही ती
पडून राहते सभोवती पाहते आपल्या जातिकुळातून तो वेगळीच झालेली असते १ तिला सावध करण्याविषयी
सर्वांचे प्रयत्न संपले ती सभोवतीच्या माणसांनाही थापकी की दुसऱ्याची अशी ओळखीनाशी झाली फक्त श्रीकृष्णा
श्रीकृष्णा, अशा हाका मात्र ती मारू लागली तेव्हा भोवतीच्या इतर गोळणींना नवल वाटून त्या हसू लागल्या २
ती गोपी घरात न राहता बाहेर रानावनातच धावू लागली तिला भगवद्भक्तीमुळे कुठलेच बंधन उरले नाही
सासरमाहेर याचा तिला विसर पडला केवळ श्रीहरीलाच ती पाहात असल्यामुळे इतराचा तिला विसर पडला ३
तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व गोळणी आता स्तब्ध राहा आता येथे कुणी कसलीही बळजबरी करू नये
ज्याच्या त्याच्या मुखाने येथे निर्णय झालेला आहे बहुमतनि व तर्कवादानेच येथे निर्णय ठरलेला आहे आता उगाच
आपली वाद नको ४

१ त्याच्या नावे वो बोमे बोमे भावो श्रीपनी

सार्थ तुकारामगाथा २९३
३९३ ये रे कृष्णा खुणाविती खेळो भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें ।
कळों नेदी माया त्याचे त्यास ठाउके । खेळतोसे दावी लक्षलक्षार्थे मुकें ॥ १ ॥
अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया१ त्या वाहाती संकल्प मना ।
काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनिया राणा२ ॥ २ ॥
अवघियांचा जाणे जाला मेळासा हरी । मिळोनिया जावे तेथें तया भीतरी ।
कळों नेदी घरिच्या करी गोवूनि चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥ ३ ॥
आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिले पारिखें जन ।
एकाएकीं तेथें नाहीं दुसरे भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वाचून ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भातुकें-भातुकलीचा खेळ चटे-सवयी
अर्थ - अरे कृष्णा ये ना, आपण भातुकलीचा खेळ खेळू सर्व गोळणी एकत्र जमून असे त्या कृष्णाला
म्हणाल्या पण हा देव त्याची माया कुणास समजू देत नाही त्याची त्यासच ठाऊक असते आपण खेळतो आहोत
असे दाखवीत असला तरी त्याचे लक्ष स्वरूपावस्थेने मुकेपणाने होते १ गवळणीनी या कृष्णास अनेक सवयी लाविल्या
नाना संकल्पांनी आवडेल त्या भावनेने त्या त्याला चिंतू लागल्या कायेने, वाणीने, मनाने, वासनेने त्याचे समस्वरू
त्या रूपातच गुंतून राहिले एकान्तात मिळणारे त्या श्रीहरीचे सुख त्या रानावनात मिळवू लागल्या २ सर्व गोळणींचा
जमाव जमला आहे असे पाहून या श्रीकृष्णाने त्यांच्यात मिसळून जाण्याचा संकल्प केला व कुणासही कळू न देता
त्याने त्यांच्या घरी प्रवेश करून चोरी केली व त्यांना हातोहात फसवून ठाणीच्या पलीकड असणारे त्याचे चित्तच त्याने
चोरून घेतले ३ मग त्या गोळणी आपणाशीच आपण अशा नादात मोठ्या आनंदाने क्रीडा करू लागल्या त्यांनी
इतर परक्या लोकांचा त्याग केला व त्या दुसऱ्या कुठल्याही वस्तूस न मानता तुकाराम महाराज म्हणतात, एका
श्रीकृष्णास स्मरून एकाएकीच राहिल्या ४
३९४ खेळता मुरारी जाय सरोवरा तिरीं । तव नग्नचि या नारी तेथें देखियेल्या ।
मांडिलें विदान ख्याल सुखाचे सधान । अग लपवूनि मान पिलगत चाले ॥ १ ॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे ।
पाया पडता रे । न सोडी नेदी साउला रे ॥ २ ॥
साडचा साउलीं३ पातळें गोडें फसविया चोळ्या ।
बुथी घेऊनि सकळा कळंबायरी पळे ।
खांदी४ धरूनिया करों दृष्टि घालोनि सामोरी ।
बैसें पाला योढी वरी खदखदा हासे ॥ ३ ॥
आनंदें कल्लोळ बाळा खेळती सफळ देती उलटिया चपळ ।
एकी एकीहूनि म्हेररा बेल सुर काढी ।
एकी उगविती५ फोडीं ।
नाना परीच्या भिकडी६ खेळ माडियेला ॥ ४ ॥
एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तव नारी ।
म्हणे नाहीं नेले चोरी काय जाणो केंव्हा ।
१ तया त सवरूप वाहाती मना तया तया सवल्प वाहाती मना २ राना ३ पाथळा, ४ खादी घालुनिपा,
५ नागविती, ६ बिकडी
तु गाथा २५

१९४ सार्थ तुकारामगाथा

केला सकळीं हाकारा तंव आलिया बाहेरा ।
आतां म्हणतील घरां जावे केंशा परी ॥ ५ ॥
तंव हासे वनमाळी वरी पाहोनी सकळी ।
लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात ।
लाज राखावी गोपाळा आम्हांजनौंची सकळां ।
काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥ ६ ॥
जोडोनियां कर या गे सकळी समोर ।
वांयां न बोलावे फार वडबड कांहीं ।
भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन ।
करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥ ७ ॥
एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे ।
म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं ।
जोडोनियां हात कँशा राहिल्या निवात ।
तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- विंदान-कौशल्य, ख्याल-खेळ, विसंगत-वाकबूल, साउली-वस्त्रे, बुधी-तोशबदन
घेण्याचे वस्त्र, हाकारा-गोंगाट, भातुके-खाऊ वगैरे, चाड-हौस, किमत
अर्थ - खेळता खेळता श्रीकृष्ण एके दिवशी यमुनेच्या तीरावर येऊन पोहचला तेव्हा त्याने नग्न अवस्थेत
न्हात असलेल्या स्त्रिया पाहिल्या त्यावेळी त्याने तेथे मौजेची क्रीडा सुरु केली आपले अंग दिसू न देता, मान खाली
घालून त्याने यमतीचा खेळ केला. १ या श्रीकृष्णाने असा खेळ केला की काही विचारू नका. पाया पडल्याखेरीज
त्यांची वस्त्रे त्याने दिली नाहीत २ कुणाच्या साड्या, कुणाची पातळे, कुणाच्या वेणीतले गोंडे, कुणाच्या चोळ्या,
कुणाचे तोंडावर घेण्याचे वस्त्र, अशी सर्व वस्त्रे घेऊन तो पळाला व शेजारच्या कदबाच्या झाडावर चढून हातात
फांदी धरून समोर नग्न स्त्रियाकडे त्याने आपली दृष्टी वळविली गोपींची ती धादल पाहून झाडाच्या पानाच्या
आड आपले मुख लपवून तो खदखदून हसू लागला ३ आनंदाच्या कल्लोळात रममाण होऊन त्या गोपी पाण्यात
खेळत होत्या कित्येक जणी मोठ्या चपळाईने पाण्यात उड्या मारीत होत्या दुसऱ्या काहीजणी आपापसात स्पर्धा
लावून सुईर्शोप्रमाणे पाण्यात डुबून लांबवर निघत होत्या कित्येकजणी नाना प्रकारचे खेळ शरीत होत्या ४ मग
काहीजणी बाहेर काठावर येऊन आपापली लुगडी पाहू लागल्या, तो ती वस्त्रे तेथे त्यांना दिसेनात मग त्या
एकमेकींस म्हणत राहिल्या, 'या ठिकाणी आपली लुगडी दिसत नाहीत कुणी चोराने नेली काय ? केव्हा नेली ?'
मग सगळ्यांनी एकत्र गोंगाट करून म्हटले, आता घरी तरी जावे कसे ? ५ इतक्यात वृक्षावरील श्रीकृष्ण हसला,
तेव्हा त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले मग त्या लाजल्या व मागेपुढे हात धरून त्या पुन: पाण्यात शिरल्या व श्रीकृष्णास
म्हणू लागल्या, 'कृष्णा, आमची सर्वांची लाज राख, काय मागशील ती गूळघाटी आम्ही तुला देऊ ' ६ त्यावर
कृष्ण म्हणाला, 'तुम्ही सर्वजणी हात जोडून माझ्यासामोर यावे, व्यर्थ बडबड उगाच करू नका मला खाऊची किंवा
धनाची मुळीच गरज नाही एकचित्त मन करुन मला वंदन करा म्हणजे झाले' ७ मग त्या गोपी एकमेकींकडे
पाहू लागल्या व आपण सारी लाज सोडून चला त्या कृष्णास जाऊन वदू या, असे म्हणत राहिल्या मग त्यानी
हात जोडून, निवान्त राहून त्या श्रीकृष्णाची प्रार्थना केली तुकाराम महाराज म्हणतात, अशा योगाने श्रीकृष्णाने त्या
सर्व गोपींची लाज राखली ८
विवरण - श्रीकृष्णचरित्रातील हा एक प्रसंग भागवत, ब्रह्मवैवर्त पुराणातून आलेला आहे श्रीकृष्णासारखा
पती आपणाम मिळावा म्हणून गोकुळातील कुमारीनी हेमतऋतूत कात्यायिनी देवीचे व्रत केले भद्रकाली नावाच्या

सार्थ तुकारामगाथा १९५
कात्यायिनी देवीची आराधना करून त्या श्रीकृष्णस्वरूपांत दंग झाल्या होत्या एके दिवशीं श्रीकृष्णचरित्राचे गुणगान
करीतच आपलीं वस्त्रे कांठावर ठेवून त्या पाण्यांत विहार करू लागल्या श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे दूर करून ती
कदंब वृक्षावर नेऊन ठेविली गोपी त्याला वस्त्रे देण्याबद्दल गळघाडतबमा पाण्यात राहून विनवू लागल्या 'आपण
थंडीने कांकडत आहात, आमची वस्त्रे द ना' अशी त्यांनी परोपरीने त्यांना विनंती केली त्याने सांगितले की,
'नग्न होऊन तुम्ही या यमुनंत स्नान करीत हाता त्यामुळे तुमच्या व्रताचा भंग झाला आह आता मला हात जोडून
नमस्कार करा म्हणजे ता दोष दूर होईल' मग गोपी बाहेर आल्या व त्यांनी लज्जेचा भान दूर राखून श्रीकृष्णास
वदन वेल व श्रीकृष्णाने त्यांनी वस्त्रे त्यांना परत दिली सर्व भावनांचा त्याग करूनच ईश्वरात शरण जावे लागते
असे या कथेने तात्पर्य मागण्यात येते त्या मुग्ध युवतींना कृष्णाविषयी आणखीन प्रीती वाटू लागली घरी
जाण्याचेही भान त्यांना उरले नाही व त्यांना त्यांच्या मनासारखेच घडेल असे आश्वासन देऊन त्यांना गोकुळात
परत जाण्याम श्रीकृष्णान प्रवृत्त केले मग अंतर्यामी श्रीकृष्णाचे स्मरण करीतच त्या गाकुळात परत फिरल्या
३९५ धरिला पालव न सोडी माझा येणे। काहीं करिता या नदाचिया कान्हे।
एकली न येतें मी ऐसे काय जाणे। कीठें भरले अवघड या राणे रे ॥ १ ॥
सोडों पालव जाऊ दे मज हरी। वेळ लागला रे खोपतील घरों।
सासू दारुण सासरा आहे भारी। तुज मज सागता नाहीं उरी रे ॥ २ ॥
सह्या¹ वशिया होत्या मजपाशीं। तुज फावले रे फाकता तपासी।
होतें अंतर तर सापडते फेंसी। एकाएकी अगी जडलासी रे ॥ ३ ॥
केंसी भागली हे करिता उत्तर। शमित मावळल्या आसुडिता कर।
स्वामी तुकयाचा भोगिता चतुर। भोग भोगी त्याचा राखे लोकाचार वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पालव-पदर, वशिया-प्रिय फाकता-दूर होताच
अर्थ - या कृष्णाने माझा पदर धरला आहे तो काही केल्याने आता सोडायला तयार नाही असे हा नदाचा
कान्हा काही करील हे मला ठाऊक असते, तर मी येथे एकटी आलेच नसते या भारी अशा अवघड रानात कधी येऊन
पडले आहे कुणास माहीत ? १ श्रीहरी, तू माझा पदर सोड ना मला घरी जाऊ दे घरी जायला मला वेळ लागला
तर सर्वजण माझ्यावर रागावतील ना माझ्या घरी माझे सासुसासरे फार रागीट आहेत त्याना जर हे समजले तर
ते तुझी माझी काही भीड उरू देतील असे नाही २ माझ्या प्रिय मैत्रिणी माझ्याजवळ होत्या त्या दूर होताच तुला
माझी खोडी काढण्याचे फावले रे मी तुझ्यापासून दूर असते तर तुला सापडलेच नसते पण तू माझ्या अगदी निकटच
अगशी होतारा ३ याप्रमाणे तिने श्रीकृष्णास म्हटल्यावर ती श्रमाने थकून गेली कारण त्या श्रीकृष्णाने तिचा हात
हिसकल्यामुळेच ती फारच फष्टी झाली होती तुकाराम महाराजाचा हा स्वामी असे भोग घेण्यात एवढा चतुर आहे
की तो ज्यांच्याशी भोग भोगतो त्याचा लौकिक आचार तो नीट सांभाळीत असतो ४
३९६ गाई गोपाळ यमुनेचे तटीं। येती पाणिया मिळोनि जगजेटी।
चेंडू चौगुणा खेळतो वाळवटीं। चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥ १ ॥
ऐसा गोपिका त्या कामातुरा नारी। चित्त विव्हळ देखावया हरी।
मिस पाण्याचे करितील घरी। बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥ २ ॥
चिरें चोळिया त्या धुता विसरती। ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती।
कोणा नाठवे कोण कुळ याती। जालों तटस्थ² सकळ नेत्रपाती वो ॥ ३ ॥
दंतधावनाचा मुखामाजी हात। वाद्ये वाजती नाइके जनमात।
करी श्रवण कृष्णवेणुगीत। स्वामी तुकयाचा पुरवोल मनोरथ वो ॥ ४ ॥
१ सखिया वशिया होतिया, २ तटस्त

१९६ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - मिस-निमित्त, चिरें-कपडे, तटस्थ-तटस्थ, दंतधावन-दात घासणे
अर्थ - या श्रीकृष्णाबरोबर गाई व गोपाळ हे यमुनेचे पाणी पिण्यासाठी नदीच्या तीरावर सर्व मिळून येतात
व चौगुणांचा चेंडू वाळवंटात खेळू लागतात अशा या श्रीकृष्णास चला आपण पाहू या असे त्या गोपी परस्परांत
म्हणू लागल्या १ अशा या गोपी त्या भगवंताविषयो कामातुर झाल्या असून त्यांचे चित्त विव्हळ झालेले असते
हरीला पाहण्यासाठीच त्या पाणी भरण्याचे निमित्त करून बारा सोळा गोपिका यमुनेच्या तीरावर येतात २ पण
त्यांचे लक्ष जर श्रीकृष्णमूर्तीकडेच एकसारखे लागलेले असल्याने त्या कपडे किंवा धोळधा धुण्याचे विसरूनच जात
आपले कूळ काय, आपली जात कोणती याची आठवणही त्यांना श्रीकृष्णवेधात उरत नसे त्या सर्व गोपिकांच्या
डोळ्याची पाती श्रीकृष्णदर्शनाने तटस्थ, स्थिर बनली होती ३ कुणी गोपिका दात घासत होत्या, त्यांचा हात मुखा-
तच राहिला तिये माना यांचे वाजत होती तो आवाज लोकांच्या गलबल्यामुळे कमी वाटत होता परंतु पुरुषाचा
स्वामी हा श्रीकृष्ण सर्वांचे मनोरथ पूर्ण करील या सर्व गोपी त्याचे वेणुगीत ऐकण्यात तल्लीन झाल्या होत्या ४
३९७ कोठें मी तुझा धरू गेले संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥ १ ॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ २ ॥
रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोवतीं मी ते माझी ॥ ३ ॥
तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलोंच अबोला करूनिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संग-सोबत, गोवळा-गोपाळा
अर्थ - या कृष्णाची संगत कुठून मी धरली असे मला झाले आहे त्यामुळे सारे जग माझ्या पाठीमागे लागले
आहे १ अरे अवगुणी गोपाळा, दूर सर ना तू येथे कसलेही खोटे चाळे करू नकोस २ तुझ्या रूपलावण्याच्या नेध
मला लागल्याने माझी चित्तवृत्ती तुझ्या स्वरूपीं जडली आहे रे तिला मी व माझे भाव दिसेनाने झाले आहेत ३
तुकाराम महाराजांचा हा स्वामी आता त्याच्या जीवात जाऊन स्थिर झाला आहे त्याच्या बोलण्यातच अबोला आहे ४
३९८ गोड लागे परी सांगताचि न ये । बैसें मिठी सये आवडीची ॥ १ ॥
वेधलें वो येणे श्रीरंगरंगें । मीमाजी १ अगें हारपलीं ॥ २ ॥
परतेचि ना दृष्टी बैसली ते ठायीं । बिसावोनि पायीं ठेले मन ॥ ३ ॥
तुकयाच्या स्वामीसवे झाली भेटी । तेंव्हा झाली तुटी मागिल्याची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सये-सखे, आवडीची-प्रेमाची, वेधले-हरून घेतले
अर्थ - या श्रीकृष्णाची संगत इतकी गोड आहे की ती किती गोड आहे हे सांगताच येत नाही सखे, प्रीतीची
मिठी त्याच्या पायाशीच मी मारली आहे १ या श्रीरंगाने माझे चित्त हरून घेतले आहे माझी सर्व अंगे विकारा-
सहित माझ्यातच सामावली आहेत २ त्याच्या ठिकाणी जी एकदा दृष्टी स्थिर झाली ती पुन परत वळतच नाही
त्याच्याच पायाशी मन विसावले आहे ३ तुकयाच्या या स्वामीशी एकदा जीवाची भेट झाल्यानंतर मग पूर्वीचा
संबंध सर्व सुटतो ४
३९९ पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥ १ ॥
बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवू ॥ २ ॥
जीवा आवडे जीवाहुनि । नव्हे क्षण वेगळा ॥ ३ ॥
जाले विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नभा-आभाळात
१ मी हे माझी.

सार्थ तुकारामगाथा १९७
अर्थ:- आकाशासारखी निळसर अशी ज्याची शोभा आहे ती पाहावयास मी गेले होते तेव्हा त्याची शोभा
फारच चांगली दिसली १ तो माझ्या मनात बसला आहे म्हणून कोणी लावू नका. २ माझ्या जीवाला तो
स्वतःच्या गोपापेक्षा आवडतो. माझ्यापासून तो एक क्षणभरही वेगळा होत नाही ३ तुकयादासी ही त्याच्या
स्वामीसारखी, विश्वंभरासारखीच बनून गेली आहे. ४
४०० कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥ १ ॥
देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ २ ॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद फळा कौतुकें ॥ ३ ॥
तुका म्हणे हांसे जन । नाही कान ते ठायी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- भुलली-विसरली, फळा-कला
अर्थ :- कुणी एक गवळण श्रीकृष्णाच्या नादात इतकी रमून गेली, स्वतःस इतके विसरली की, डोक्यावरील
ओझे आठवून 'गोरस घ्या, दही दूध घ्या' असे म्हणायच्या ऐवजी ती 'श्रीहरी घ्या' असेच म्हणू लागली १ तिने जो
डोळ्यांनी पाहिला तोच तिच्या मनात स्थिर झाला असून तो तिच्या तोंडूनही उच्चारला जात आहे. २ तिला
स्वतःला आपला विसर पडला व ती गोविंदाच्या फलकौतुकात रममाण झाली ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या तिच्या कृत्यास लोक हसतात तरी ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांच्याकडे कानच देत नाही ४
४०१ करुनी आइत सत्यभामा मंदिरिं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे ।
न येचि देव येतील कामलहरी रे । पडिलो बुद्दिचिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥ १ ॥
सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरते हे दाविसी लाघव रे ।
बोलतोसी ते अवघो तुझी माय रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ २ ॥
मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे ।
मागुती ब्रम्हासि भेटी दिली तंई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि १तरी रे ॥ ३ ॥
भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे ।
नटा क्रिया नाहीं मी तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडचा कौसल्या रे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आइत-सर्व सामग्रीची तयारी, सत्यभामा-श्रीकृष्णपत्नी, कवाड-दार, टिमकारी-धक्का
दिला, माय-गोटी माया, कानडा-न कळण्यासारखा
अर्थ - एके दिवशी श्रीकृष्णपत्नी सत्यभामेने रात्री आपल्या मंदिरात श्रीकृष्णभेटीसाठी सर्व प्रकारचा साज-
शृंगार करून तयारी केली व सबंध रात्र संपून गेली तरी ती कृष्णाची वाट पाहात बसली परंतु श्रीकृष्ण काही आले
नाहीत तिच्या अंगच्या कामलहरी वाढत राहिल्या ती अशा प्रकारे चिंतामग्न असतानाच दारावर कुणी तरी धक्का
दिला १ तेव्हा रागावून सत्यभामा त्या श्रीकृष्णास म्हणाली, 'दूर सरा तुम्ही, तुमची मजविषयी प्रीती आहे ती
समजली मला. केवळ कार्य साधण्यासाठी तुम्ही हे गोडीचे कौतुक दाखविता. पण तुम्ही जे बोलता ते सर्व खोटेच
असते जाणूनबुजून जनु माझी थट्टा करण्यासाठीच तुम्ही उजाडता उजाडता आलात २ पण याचा बोल तुम्हास
देऊन काय उपयोग ? मी भोळी वेडी ना ! नारदास मी तुमचे दान दिले तेव्हा माझी विटंबना झाली ती पुरी वाटली
नाही. पुनः ब्रह्मास भेट दिली त्यावेळीही अशीच विटंबना माझी झाली असे असून अजूनही मी तुमच्यावर विश्वास
ठेवीत आहे हेच माझे चुकले ना. ३ माझा सर्व भ्रम होता तो आता समजला, दूर झाला मी तुम्हास भला मानून
चालत होते. पण तुमची क्रिया तुमच्या बोलण्याप्रमाणे नाही असे मला कळून आल्यामुळे तुम्ही नटाप्रमाणेच मला
वाटता. तुकया बंधूचा हा स्वामी सहजासहजी न समजणारा असून मोठा खुशाल आहे. ४
१ नाही

१९८ सार्थ तुकारामगाथा
विवरण - सत्यभामा ही श्रीकृष्णाची एक पट्टराणी तिने एक नाजूक तक्रार या अभंगात केलेली आहे
श्रीकृष्णभेटीसाठी आसुसलेल्या चित्ताने ती रात्री वाट पाहात असताना मध्यरात्र उलटून गेली तरी श्रीकृष्ण आला
नाही म्हणून ती रागवली आहे श्रीकृष्ण इतर नायिकाच्या बहुधा रुक्मिणीच्या मंदिरातच रमला असावा अशा
शंकेने ती व्यथित होऊन त्याला रागावून बोलत आहे याच वेळी नारदास देण्याच्या तुलादानाचे समयी सर्व
दागिन्यानी भरलेली पण समतोल न झालेली व रुक्मिणीच्या तुलसीपत्राने समतोल झालेली तुला ध्यानात येताच ती
रुष्टी झालेली आहे या आपल्या विटंबनेची खंत तीव्र वेदना तिच्या मनात होती नारदानी स्वर्गांतून आणलेली
पारिजातपुष्पे कृष्णास दिली ती त्याने सत्यभामेशिवाय इतर स्त्रियाना दिली नाही कृत्याचा राग सत्यभामेस आला
तिच्या रागाची अशी निमित्ते वारंवार उमटलेली दिसतात त्यातील एक बारीक निमित्त बुवांनी या अभंगात साकार
केले आहे येथून पुढचे काही अभंग 'तुकयाबंधू' या नावाने मुद्रांकित झाले आहेत याचा अर्थ तुकारामबंधू म्हणत
आहे किंवा तुकारामबंधू सांगत आहे असा घेता येतो तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा नावाचे होते त्यांनीही
काही अभंग केले असावेत या कान्होबाचा उल्लेखही पुढे काही अभंगातून आहे हा कान्होबा शब्द श्रीकृष्णवाचक
दितो व तुकोबाच्या बंधूचा उल्लेख म्हणून किती हे सांगणे कठिण आहे
४०२ तव तो हरि म्हणे वो निजगाने वो । लाइ नीच का देसीस डोहणे वो ।
मजपें दुजें आलें ते देव जाणे वो । शब्द फाय हे बोलसी ते उणे वो ॥ १ ॥
पाहा मनीं विचारूनी आधि वो । साडूनि देईं¹ भ्रांति करों स्थिर बुद्धि वो ।
तट केले हे माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आजुनि तरी घरी शुद्धि वो ॥ २ ॥
कोठें तरी दुनियांत वर्तले वो । स्त्रियानों भ्रतारा दाना दिले वो ।
फंसा भला मी नव्हे ते सोसिंले वो । रुसतेसी² तू उफराटें नवल जाले वो ॥ ३ ॥
काय सांग म्या दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वं आणविले हनुमंतासि वो ।
कष्टी केले मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधू म्हणे खरे खोटें नव्हे यासि वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लाइ- अति, डोहणे-टोमणे, मजपें-मजकड तट-बडबड तटा
अर्थ - सत्यभामेचे वरील भाषण ऐकून तो श्रीकृष्ण मग तिला म्हणाला, प्रिये असे अति वाईट बोलून
मला टोमणे का देतेस ? माझ्याकडे दुसरे कुणी आले असेल तर एक देवच जाणे उगाच उणेदुणे शब्द का बोलतेस
मला ? १ तू मनात तुझा विचार करुन पाहा ना सर्व भ्रम सोडून तुझी बुद्धी स्थिर करुन पाहा आजपर्यंत तुझे माझे
अशी बडबड करुन जो तटा केलास त्याचा काय उपयोग ? नीट डोळे उघडून अजून तरी शुद्धीवर ये ना २ असे
कुठे तरी जगात घडले आहे का ? स्त्रियांनी आपल्या पतीचे दान दिल्याचे कुठे कधी घडले का ? पण ती गोष्ट तू
केलीस ; व मी ती सोसली असा पाहा मी किती चांगला आहे असे सांगून तूच रुसतेस माझ्यावरच हा उलटाच
न्याय म्हणायचा नवलच म्हणायचे ३ सांग बरे, मी काय तुझी विटंबना केली ? तुझा गर्व दूर व्हावा म्हणून मी
हनुमंताला आणले यावेळी हनुमंत व गरुड यांच्यात भांडण होऊन गरुडास किती त्रास झाला बरे मलाही राम
होण्यासाठी, रुक्मिणीस सीता होण्यासाठी किती त्रास झाला ? तुकयाबंधू म्हणत आहे, खरेच खऱ्याखोट्याचा
निवाडाच कुणी करीत नाही ४
४०३ तव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो। नवाजिले³ तुम्हीं म्हणा आपणासि वो ।
तरी कां वचनुक सुमनासि वो । नट नाटय बरे सपादू जाणतोसि⁴ वो ॥ १ ॥
सर हो परता परता⁵ हो आता हरी । म्हणे सनाजिताची कुमरी ।
जाणतें मी या शब्दाच्या कुसरी। ऐसेच करून ठकविले आजिवरी ॥ २ ॥
१ दहेभ्रांती, २ रमसी ते ३ नावाजीत होता आपणासी ४ जाणसी परी, ५ आता हरी आता हो,

सार्थ तुकारामगाथा १९९
भावे गेले म्हणून न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा सग ।
तो तो केले हे पाठमोरे जग । ऐसे काय जाणे हे तुझे रंग ॥ ३ ॥
काय करू या नागविले कामें । लागलें तयातव इतुके सोसावे ।
नाहीं तरी का नव्हती ठावीं वर्मे । परद्वारीं ऐसा हाकलीती प्रसिद्धनावे ॥ ४ ॥
काय किती सागावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठुर ऐसा निर्गुण ।
आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि याहासी भाडण ॥ ५ ॥
इतुकियावरी म्हणे वैकुंठींचा राणा । होऊन गेलें तें नये आणू मना ।
आता न करीं तैसे करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - नवाजिले-नावाजले, चांगले म्हटले, बचनुक-फसवणूक, सत्राजिताची कुमरी-सत्रा-
जिताची कन्या सत्यभामा, फुसरी-कौशल्य, आर्त-इच्छा
अर्थ - श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून त्यावर ती म्हणाली, 'हृषीकेशी, देवा, तुम्ही तुमच्या चांगुलपणास
नावाजिले तरी, मग तुमची अशी फसवणूक का होते ? तुमच्या मनात हे सर्व सोंग असून तुम्ही त्याची बतावणी
मात्र फार चांगली करता १ सत्राजिताची कन्या सत्यभामा मग पुन म्हणाली 'देवा, दूर व्हा आता तुम्ही, तुमच्या
शब्दांचे हे कौशल्य मी चांगलेच जानते ना असेच लाघव करून आजवर मला फसविलत २ देवा, तुमचा वियोग
कधीही न व्हावा म्हणून मी तुमच्याकडे आले जन्मोजन्मी तुमची संगत घडावी अशी माझ्या मनाची तीव्र इच्छा म्हणून
तर जग पाठमोरे करून त्याची पर्वा न करता, तुमच्याकडे आले पण हे तुमचे असले ढंग मला काय माहीत ? ३ काय
करू हो देवा ? माझ्या या कामी मनानेच मला फसविये हो म्हणून तर मला इतके सोसावे लागले नाही तर देवा,
तुमच्या कृती काय मला माहीत नव्हत्या ? दुसऱ्याच्या स्त्रियाबद्दलची तुमची रहस्ये प्रसिद्धच आहेत ४ देवा,
आणखी किती गुण तुमचे सागावेत ? तुमची निष्ठुरता व दुर्गुणता वर्णन करण्यास वाणीसुद्धा समर्थ नाही तुमच्या
दृष्टीत आपले परक्याचे असे काही नाहीच आई, बहीण असाही फरक तुमच्या दृष्टीत नाही तुम्ही सासूसुनांचे भाडण
लावून देता ५ सत्यभामा जेव्हा इतके निष्ठुरपणे बोलली तेव्हा तो वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण तिला म्हणाला,
'भामे, आता पूर्वी जे होऊन गेले ते गेले पुन ते काही मनात आणू नकोस मी पुन तसल्या गोष्टी करणार नाही
अशी शपथ घेतो पाहा तुमच्यासाठी तुकयाबंधू कान्होबा म्हणतात, असा हा श्रीकृष्ण भक्तावर दया करणारा आहे ६
४०४ कान्हो ऐकली रे ऐकली रे । तुजसवे चुकले¹ रे ।
भय वाटे वनीं² मज अबळा धाकली रे ॥ १ ॥
निघता घरीं आई बा वारी । तुजसवे का आलियें हरी ॥ २ ॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥ ३ ॥
पिकल्या चोरी जाले सामोरी । काय जाणे कोठें राहिला हरी ॥ ४ ॥
आड खुट जालिय जाळी । काय जाणो कान्हे माडिली रळी ॥ ५ ॥
तुका म्हणे जाउ आलिया वाटा । पाहो हरी पायीं न मोडे फाटा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - अबळा-अबला, बलहीन स्त्री, बा-वडील, वारी-नको म्हणत असताना, रळी-
मस्करी, चट्टा
अर्थ - श्रीकृष्णा, मी एकटीच आहे रे एकटी तुझ्या बरोबर येऊन चुकले १ आता या वनात मला भय वाटते
रे मी एक लहान, बलहीन अशी स्त्री आहे रे, घरून निघताना मला आई, वडील नको म्हणत असताना मी तुझ्या
बरोबर का आले कुणास माहीत ? २ वाटेने लोक सांगत होते की, तू खोटा आहेस, लबाड आहेस पण मला
१ चुकली, २ जनी,

२०० सार्थ तुकारामगाथा


तुझ्याच संगतीची चट लागली होती. ३ बोरीचा वृक्ष समृद्ध झालेला पाहून मी त्याच्या समोर आले, पण काय झाले कुणास माहीत, हा श्रीहरी कुठे गेला ? ४ आता पुढे खुंट जाळपाच तेवढ्या दिसतात. बोरीच्या काटेरी जाळयाच दिसतात, फळे नाहीत. या हरीने ही काय मस्करी आरंभिली आहे कुणास माहीत ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, तो मग म्हणाली, 'चला आपण आल्या वाटेनेच जाऊन त्या श्रीहरीस पाहू या. म्हणजे पायास काटा लागणार नाही' ६

४०५ क्याला मज आपो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥ १ ॥
बहु दिसीं जाली यासीं मज¹ भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ २ ॥
कोवळें बोलतो मना आवडेतें । डोळियांचें पातें ढापवेना ॥ ३ ॥
आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां नो पाठी वांयां पुरविली ॥ ४ ॥
तुमचें तें काय खोळंबलें काज । भल्या कां नो मज फोडा घरी ॥ ५ ॥
तुकयाचा धनी गोकुळनायक² । सरा कांहों एक बोलतो मी ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :- क्याला-कशाला, आपो-आई, सोकरा-छोकरा, मुलगा, ढापवेना-हालत नाही, चोलुनिया-चोरून, भल्या-बऱ्या, चांगल्या
अर्थ :- आई, मला घरी चल, घरी चल असे का म्हणतेस ? मला का निवारतेस ? मी नंदाचा मुलगा श्रीकृष्ण याच्याशी खेळत आहे ग. १ फार दिवसांनी त्याची माझी भेट झाली आहे ना त्याची व माझी तुटी आता होऊ नये अशी इच्छा आहे. २ तो कृष्ण फारच मृदू बोलतो, त्याचे शब्द माझ्या मनास फारच आवडतात. त्याला पाहाताना माझ्या डोळ्याचे पाते हालत नाही ३ आजही सगळ्यांना चोरून मी त्याच्याकडे आली आहे. पण तुम्ही माझी पाठ विनाकारण का ग पुरविता ? ४ यात तुमचे काय काम खोळंबिले आहे ? तुम्ही चांगल्या दिसत असून मला का ग घरी फोडून ठेविता ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा धनी गोकुळाचा नायक श्रीकृष्ण आहे, दूर व्हा. मी त्याच्याशी काही थोडे बोलणार आहे आता ६

४०६ आतां न यें मागें । मी आलें याच्या रागें ।
काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥ १ ॥
कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्याच सकल ।
येचाल ते बोल । झुठे होती बोलिले ॥ २ ॥
याचे भेटी माझें मन । स्वरूपीं ठाकले लोचन ।
वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥ ३ ॥
काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें ।
यांचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥ ४ ॥
या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें ।
घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥ ५ ॥
आतां मोटी बार । माझी³ नका धरूं चार ।
तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों⁴ ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :- रागें-प्रीतीने, कलिथ्या-करता, कोल्हाल-गोंगाट, झुठे-खोटे, बीजें-दुसऱ्याने, मोटी-मोठी आशा, सुतलों-निजलो
अर्थ :- मी काही आता मागे परतणार नाही मी आता या श्रीकृष्णाच्या मागेमागेच आले आहे. जगाने माझ्यामागे काय रागाने बोलायचे असेल ते बोलून घ्यावे. १ तुम्ही सर्वजणी आता गोंगाट का ग करता ? तुम्ही


१ मसी, २ वैकुंठनायक, ३ माजी, ४ सुतले

सार्थ तुकारामगाथा २०१
सर्वजणी आता मला परक्याच आहात. जे काही मला शब्द बोलाल, नावे ठेवाल, ते सर्व खोटे होईल. २ याच्या
भेटीमुळे माझे मन व माझे डोळे याच्याच स्वरूपात जडून राहिले आहेत. आता त्याच्यापासून वेगळे असण्याचा एक
क्षणही मला आवडणार नाही. ३ मला कसलेही काम आता नकोसे झाले आहे. दुसऱ्याने काही बोललेले मला
आवडणार नाही कारण या श्रीकृष्णाच्या कामबाणांनी मी विद्ध झालेली आहे. ४ आता या कृष्णाशिवाय जगणे
म्हणजे त्या जिण्यास आग लागो. आता माझ्या मनाने याची संगत निश्चीत केली आहे ती काही मी सोडणार नाही.
तेथून काही मागे परतून फिरणार नाही. ५ आता माझ्यासंबधी काही मोठ्या आशा धरल्या असतील तर त्या
सोडून द्या. कारण मी आज तुकयाचा दाता स्वामी श्रीकृष्ण याच्या शय्येवर झोपलों आहे. ६
४०७ हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥ १
अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता१ ॥ २ ॥
याचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा ऐसा । देवपिशा उदारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा .- हरिरता-हरीशी रममाण झालेल्या, लागवरी-गर्भधारणेच्या स्थितीत, देवपिशा-
देवाविषयी वेड्या
अर्थ :- श्रीहरीशी रममाण झालेल्या या गोपी फार चपळ असून त्याचा संग गर्भधारण करण्याच्या स्थितीत
कधीच येत नाही. १ अनेक भोग जरी त्यांनी भोगले तरी त्या सर्वांगानी उत्तम व पवित्र राहतात. २ त्याचे संबंध,
व त्याचे पावित्र्य याचे वर्णन वाणीने करता येण्यासारखे नाही. यासाठी काय करता येण्यासारखे आहे ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, याप्रमाणे या उदार गोळणी देवाविषयी वेड्या झालेल्या आहेत. ४
४०८ गोळणी आल्या याज२ । म्हणती या गे३ राखो आज ।
सांपडवुनी माज- । घरांत धरुनी कोंदू ।
उघडें४ कवाड उभ्या कान्होशाचे आट ।
साता पाँचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥ १ ॥
नित्य सोंकवला नेदी । सांगो चित्त बोला ।
आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ २ ॥
जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी ।
गडिया ठेविनि बाहेरी पूर्वद्वारें शिरे ।
त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें ।
पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥ ३ ॥
उतरोनि सिकें । पाहे चाखोनियां निकें ।
गोड तेंचि एका एकें । हातीं लांभवितो ।
जाणे राखती तयांसि । तेथें अधिकचि नासी ।
माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥ ४ ॥
जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी ।
माज५ कोडूनी भीतरी । घरांत६ घरीयेला ।
कां रे नागविसी । माझें मुळीं लागलासी ।
आणवीन तुजपासीं । मागें खादले तें ॥ ५ ॥
१ पुरता, २ बाजें, ३ रे, ४ उभे, ५ माजे, ६ घरात घरी एवला
तु गाथा .२६

२०२ सार्थ तुकारामगाथा
दोही' संधी² बाहे । धरुनि नेती माते पाहे ।
काय नासी केली आहे । घरामाजी येणें ।
तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख ।
बसवंती कवतुक । करुनी रंजविल्या ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाजें-रागाने, धमाने, काळोखाचे-अधाराच्या, पिलंगत-लपत छपत.
अर्थ :- मोठ्या कष्टाने, त्रासाने गोकुळच्या गोळणी एकत्र झाल्या व म्हणू लागल्या, या ग, आज आपण
त्याची राखण करू व सापडताच त्यास माजघरात कोंडून ठेवू. त्यानी मग दार उघडेच ठेविले व त्या पाचसातजणी
एकत्र येऊन अंधाराच्या आड मौन धारण करून गप्प राहिल्या. १ मनात म्हणत राहिल्या, हा देव रोज घरी
येऊन चोरी करून दूध लोणी खायला सोकावलाय किती सांगितले तरी त्याकडे लक्षच देत नाही आता बरा
सापडणार आहे. याला काही कुणी आता जियत सोडणार नाही २ या गोळणींचा हा बेत जाणून श्रीहरी त्याच
घरी चोरी करण्यासाठी आला. त्याने आपले सोबती बाहेर ठेविले व त्याने पूर्वच्या दाराने आत प्रवेश केला. त्या
गोपींच्या भीतीने सभोवताली पाहात पाहात तो लपत छपत चालू लागला आणि त्याने समोर पाहिले तो त्यास
लोणी दिसले. ३ मग त्याने शिक्यापरचे ते लोणी काढले. त्याने ते चाखून पाहिले. त्याला फार गोड लागले आणि
त्यातील सर्वांत गोड लोणी होते ते त्याने एकमेकांच्या हातानी लांबविले आणि जिथे गोळणींनी चांगली राखण
ठेवली होती तिथे त्याने दह्यादुधाचा चांगलाच नाश केला. मग त्या देवाने आपली चोरी समजावी म्हणून लोण्याचे
हात जागोजागी पुसले ४ त्या सर्व गोळणींनी मग त्याचे हे मूळ रहस्य जाणले. त्याला घरात कोंडून धरून
ठेविले आणि त्यांनी म्हटले, 'श्रीकृष्णा, असे आम्हास का सतावतोस ? आमच्या मागे का लागला आहेस ? यादृर्वा
तू जे जे खाल्लेस तेहो मी परत आणवीन अशाने ' ५ मग त्यानी त्याला दोन्ही बाजूनी धरून त्याच्या आईपाशी
नेले व म्हटले, 'या तुझ्या मुलाने आज काय घरात नासाडी केली आहे पाहा.' तुकाराम महाराज म्हणतात, पण त्या
श्रीहरीच्या मुखाकडे पाहताच त्या गोळणींना दुःख वाटेनासे झाले. त्या यशोदा मातेनेही मुलाचेच कौतुक करून त्या
गोपींचे रंजन केले ६
४०९ आलियें धांवति धांवति भेट होईल म्हणून ।
तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥ १ ॥
आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा ।
हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ २ ॥
लाधिला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा ।
सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥ ३ ॥
जळो आतां संसार वो कईं शेवट पुरे ।
तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सीण-त्रास, सांग-पूर्ण, असाग-अमर्याद
अर्थ :- या श्रीहरीची भेट होईल म्हणून मी धावतच आले. पण वेळ निघून गेल्यामुळे तो निघून गेला व
मला मात्र त्रास झाला १ आता मी काय करू सांग ? तो श्रीकृष्ण मला कसा भेटेल ? त्या श्रीहरीसाठी माझा
प्राण फुटून आता बाहेर जात आहे त्याची फार मोठी आशा मला आहे हो २ पुष्कळांची पुष्कळ ओढ असल्यामुळे
याच्या भेटीस मात्र उशीर होतो इतर सगळे सांभाळताना हा न मिळाल्यास अमर्याद दुख होते. ३ हा संसारहो
त्या श्रीहरीशिवाय असेल तर जळून जावा. याचा कधी शेवट होणार आहे काय ? तुकाराम महाराजांच्या स्वामीच्या
साठी, गोपाळासाठी जीव मात्र माझा झुरतच चालला आहे. ४
१ देहिं संदे बाहे, २ सदी.

सार्थ तुकारामगाथा २०३
४१० आणीक काय थोडीं । परि तीं फार खोटीं फुडीं ॥ १ ॥
सदा मोकळींच गुरें । होतो फजीत तीं पोरे ॥ २ ॥
सदा घालिती हुबरी । एक एकाचे न करी ॥ ३ ॥
तुका म्हणे घरीं । माय वेळोवेळा मारी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फुडीं-वाईट
अर्थ - आम्ही पोरे काय थोडी आहेत ? पण ती सारी खोटी व वाईट बुद्धीची आहेत १ ज्याच्या
इंद्रियरूपी गाई नेहमी मोकळ्याच राहतात त्याची फार फजिती होते २ नेहमीच ते अहंब्रह्मची हुबरी घालतात ते
एकमेक एकमेकांसारखे करीत नाहीत ३ मग असल्या पोरांना तुकाराम महाराज म्हणतात, त्याची आई घरी मार
देत असते ४
४११ बहुतांचे संगती । बहु पावलो फजिती ॥ १ ॥
बरें केले मदयाळें । मागिलाचे तोड वाळें ॥ २ ॥
माझा करितील तटा । लपती आलिया चोभाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे काई । किती म्हणो बाप आई ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मदयाळें-श्रीकृष्णान
अर्थ - अनेक लोकाच्या संगतीत आतापर्यंत मी चांगलाच फजीत पावलो होतो १ पण आता आपली
सोबत देऊन या कृष्णाने फार चांगले केले मागच्या सर्व सोबत्याची तोडेच काळवडून टाकली २ हे सर्व सोबती
माझ्या बाबतीतले गाऱ्हाणे सांगून तटा धरतात व स्वतःचे काही बाहेर आले की मग लपून बसतात ३ तुकाराम
महाराज म्हणतात, अशा लोकांना, सोबत्याना आईबाप म्हणून मी किती जवळ करावे ? ४
४१२ गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले सवगडे सहित गाई ॥ १ ॥
चोरिले नवनीत वाधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ २ ॥
मोहिल्या गोपिका पाव्याच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊ ॥ ३ ॥
मायबापा लाड दाखविले कौतुक । तें या आणू सुख अंतरासी ॥ ४ ॥
निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी । ऐसा म्हणो बळी आमुचा स्वामी ॥ ५ ॥
तुका म्हणे सरसी असो येणे बोधें । लागोनि सबधें सर्वकाळ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - लीळा-क्रीडा
अर्थ - आपले स्वतःचे सोबती व गाई यांचे तुम्ही रक्षण केले अशा अनंग कृत्यांचे व क्रीडांचे पवाडे मी
गात राहीन १ तुम्ही गोकुळात लोणी चोरून आपला गळा वाढवून घेतलात श्रीकृष्णा, गोकुळात ज्याज्या क्रीडा
केल्यात त्या सर्वांचे मी वर्णन करीन २ तुम्ही तुमच्या मुरलीच्या नादाने सर्व गोपींना वेधून टाकले त्याच्याबरोबर
रासक्रीडा केलीत, त्याचे वर्णन आम्ही मोठ्या संतोषाने करू ३ तुम्ही तुमच्या आईबापांना जे लाडाने व
कौतुकाने क्रीडाविश्व दाखविले ते सर्व सुख आम्ही आमच्या मनात साठवून ठेवू ४ भक्ताचा सांभाळ करण्यासाठी
तुम्ही दुष्टाचा नाश केलात असा हा आमचा बलवान स्वामी आहे असे आम्ही म्हणू ५ तुकाराम महाराज
म्हणतात, या आमच्या श्रीकृष्णबोधाचाच विजय नेहमी असावा त्याचाच सबंध सर्वकाळ आम्हास घडावा ६
डांका-अभंग ८
४१३ चौक भरियेला आसनों पाचारिली कुळस्वामिनी ।
वैकुंठवासिनि ये धावोनी झडकरी ॥ १ ॥
१०

रंगा येईं वो विठाई सांवळिये डोळसे ।
तुझें श्रीमुख साजिरें ते मी केधवां देखेन ॥ २ ॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।
अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥ ३ ॥
मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी¹ ।
भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥ ४ ॥
डाका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे ।
आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- डाका-मोठा नगारा, खुनी माणसाचा तपास करण्यासाठी कुंभार वाजवितो ते वाद्य;
चौर-देवीला बसण्यासाठी पाटावर वस्त्र ठेवून त्यावर गहू, तांदूळ वगैरे धान्यानी काढलेल्या चतुष्कोनाची आकृती,
पाचारिली-बोलाविली, मनसा-इच्छा, हाकारा-पुकारा, पुरस्कार-देणगी
अर्थ :- या आसनावर चोक भरून कुळस्वामिनीला हाक मारली आहे. 'वैकुंठवासिनी विठाई ये धावत
लौकर' अशा तीव्र हाकेने तिला जागृत केले आहे. १ विठाई, सावळिये आई, तू डोळस आहेस, माझ्या अंत करणाचा
रंग ओळखून, भाव पाहून लौकर धावत ये. तुझे सुंदर श्रीमुख मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे २ रजतमाची
धूपारती व पंचप्राणाची आरती अशी सर्व तयारी करून मी आज तू धावत झटकन ये अशी विनवणी करीत
आहे. ३ मनरूपी मेंढा एका घायासरसा मारून त्यातील आशा, इच्छा, तृष्णा याना काढून, सुटचा करून मी
भक्तिभावाने नैवेद्य ताटात वाढलेला आहे आणि तुला हाक मारण्यासाठी पुकारा करीत आहे. ४ तुकाराम महाराज
म्हणतात, अनुहात नादाचा डाका-नगारा ऐकून या देवीने माझ्या अंगात संचार केलेला आहे आणि आपले देणगी
घेऊन मला आरोग्यदान दिले आहे ५
विवरण - येथून पुढचे सात अभंग 'डाका' या नावाखाली असून ते सर्व रूपकात्मक असे आहेत. बहुजनात
भक्तिमार्ग प्रिय होण्यासाठी जे लोकवाड्मयात्मक असे भारूड वाङ्मय साधुसंतानी निर्माण केले त्यातलाच एक
प्रकार, 'डाका' म्हणजे मोठा नगारा देवाची आरती वगैरे सुरू असताना याच्या आवाजाने आसमंत दुमदुमून जातो
या ठिकाणी गोंधळाच्या वेळी जसे प्रमुख व इतर देवदेवताना पाचारण केले जाते त्याचप्रमाणे येथेही महाराष्ट्राची
कुलस्वामिनी, संतांची कुलदेवता वैकुंठवासिनी 'श्रीविठाई सावळिये' हीस पाचारण केले आहे आसन, चौर,
धूपारती, आरती, मेंढ्याचा बळी, अनुहात गजर, पुरस्कार वगैरे शब्दातून देवीच्या उपासनेचे रूपक या अभंगात
केलेले दिसून येईल
४१४ साच माझा देव्हारा । माफ ठेवा भाव खरा ।
त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥ १ ॥
माझें दैवत हे रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं ।
भरले मग अंगीं । निवाड करी दोहोंचा ॥ २ ॥
तुझें आहे तुजपासी । परि तूं जागा चुकलासी ।
चिघडूनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥ ३ ॥
आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवे ।
अंधकार व्हावे । नासु ठाव शोधावा ॥ ४ ॥
१ तुटी

सार्थ तुकारामगाथा २०५
आधळघासी डोळे । देते पागुळासी पाय ।
वांझा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥ ५ ॥
उगविलीं कोडों । मागें कित्येकाचीं बापुडीं ।
तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, भारू-विश्वास, फुलबरा-फुलांचा गुच्छ, नासी-नाश, उगविलीं-
सोडविली
अर्थ - हा माझा देव्हारा खराच आहे तुम्ही तुमच्या नवमय वचनांचा विश्वास खरा धरून सत्व, रज
तम या गुणांच्या फुलांचा गुच्छ घेऊन या अशी मी तुम्हास विनंती करीत आहे १ माझे हे प्रिय दैवत या वैष्णवांच्या
समतीत रगत येऊन चालत आहे ते माझ्या हृदयात पूर्णपणे भरून असून प्रवृत्तिमिवृत्तींचा निवाडा करीत आहे २
तुझी हरवली आहे अशी वाटणारी वस्तु खर म्हणजे तुझ्यापाशीच असून तू मात्र शोधायची जागा चुकून व्यर्थ
वणवण करीत हिंडत आहेस तुझ्या अंत:करणात निवास करणाऱ्या कामक्रोधादी विकारांनी तिचा नाश आरंभिला
आहे ३ आता त्या वस्तूची नीट ओळख माझ्या एका बेतावाचून तुम्हास होणार नाही, यासाठी अंधाराचा नाश
व्हावा म्हणून त्याचा शोध घेणे अगत्याचे आहे ४ ही आमची विठाई आंधळ्यांना दृष्टी देते, पांगळ्या लोकांना
पाय देते, निपुत्रिकाला पुत्र देते भक्तांचे सब नवस ही परिपूर्ण करते ५ हिने याहीपूर्वी कित्येकांची रहस्ये पूर्णपणे
सोडविली असून तुकाराम महाराज म्हणतात, हिला आधी तुम्ही नवस करा तुमची संकटे दूर करण्यासाठी एका
क्षणाचाही वेळ लागणार नाही ६
४१५ विनंति घातली अवधारी । मज देईं वो अभय करों ।
पीडिलों खेंचरों । आणीक वारी नावाची ॥ १ ॥
रगा येईं वो एकला रग वोडवला ।
हरिनामे उठिला गजर केला हाकारा ॥ २ ॥
देवां चे दैवते । तुज नमिले आदिनाथे ।
ये वो कृपावते । भोगा माझ्या धावति ॥ ३ ॥
न लवी आता वेळ । आइत सारिली सकळ ।
तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खेंचरी-कामक्रोधादा भुतांनी
अर्थ - या कामक्रोधादी भुतांनी मी त्रस्त झालो आहे विठाई, तू आपल्या अभय हातानी मला आश्वासन
दे इतर भूतांची भीतीही निवारण कर ही माझी विनंती तू ऐक १ हरिनामाचा पुकारा करून मी मोठा गजर
केला आहे त्याच्या रगात तुझ्या कृपेचा रग चढू दे ना २ हे आदिनाथे, तू सर्व देवाची देव असून मी तुला मनोभावे
नमस्कार करीत आहे तू कृपावंत होऊन मला माझ्या प्रारब्धकर्मापासून सोडिव आता तू उशीर लावू नकोस
तुझ्या पूजेची ही सब सामग्री मी आयतीच तयार केली असून तुकाराम महाराज म्हणतात, तू आमची कुलस्वामिनी
आहेस ४
४१६ माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा ।
त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसाये ॥ १ ॥
या रे लोटांगणीं । काहीं करा विनवणी ।
करील झाडणी । मूळ काढी संसार ॥ २ ॥

२०६ सार्थ तुकारामगाथा
पडिले विषयाचे गोधळीं । ते त्रिगुण आफळी ।
हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥ ३ ॥
घेतला अहंकारें । काम क्रोध या मत्सरे ।
पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥ ४ ॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा ।
अवघ्या एक सरा । पळती रग देखोनी ॥ ५ ॥
तुका म्हणे धावा भाव । फिटेल मनिचा संदेह ।
आणीक न लगे ठाव । काहीं कोठें हिंडावे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - झाडणी करणे-दूर करणे, आफळी-बाधून गेले, आसरा-जलदेवता
अर्थ - हा माझा खरोखरचा देव्हारा आहे याप्रमाणे दुसऱ्या कुणाजवळच तो नाही याची कीर्ती साऱ्या
त्रिभुवनात पसरत राहिली आहे याच्यासंबंधी कुणास विचारण्याचीही जरूरी नाही १ या माझ्या देवास नमस्कार
करून सर्वजण लोटांगण घाला हो त्याला काही नम्र भावाने विनंती करा ना तुम्हास लागलेले विकारादींचे भूत हा
देव काढून टाकेल संसाराचे भूत दूर करील २ जे नाना विषयाच्या जंजाळात सापडले ते त्रिगुणाच्या बंधनात
गुरफटले गेले असून या परमेश्वराच्या नामाची आरोळी ऐकताच ही भुते उठून दूर जातील ३ काम, क्रोध, मत्सर
अहंकार इत्यादी भुते याचे प्रेमळपणाने घेतलेले नाव ऐकताच उठून पळून जातील ४ माया, ममता या जलदेवतांनी
जो ताप दिलेला आहे त्या याचा रग पाहून ताबडतोब दूर पळून जातील ५ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही
फक्त तुमच्या मनातील एकचित्त असा भाव साधा मग तुमच्या मनाचा संदेह फिटून जाईल मग इतर ठिकाणी
आश्रय घेण्यासाठी हिंडण्याचे कारणच पडणार नाही ६
४१७ पुढें येते देवी । तिची जती¹ चालो द्यावी ।
मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥ १ ॥
एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा ।
माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावे करावी ॥ २ ॥
मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ ।
तुम्हीं केले बळ । मग मी ठायीं न पडें ॥ ३ ॥
तुका म्हणे मुळीं । लागली ते आली कुळीं ।
वंदुनी सकळीं । जीवे भावे ओवाळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जती-जत्रा यात्रा लोवाळ-गले लठ्ठ
अर्थ - पुढे येणाऱ्या देवीची यात्रा नेहमी चालू ठेवावी मायची आशा व मानाची भावना याचा त्याग
करावा १ ही एकवीरा देवी अंगात आली असून ती तुमचा सब रोग दूर करील माझ्या भक्ताना एकनिष्ठत पूजा
करण्यास सांगा असे ही सुचविते २ तिच्यासाठी चांगला गलेलेठ्ठ मनरूपी मेंढा मारून त्यायोगे तिला सर्व पूजा पोहोचेल
असे पाहावे याशिवाय तुमच्या कुठल्याही बळान मी सापडणार नाही असे ही सुचविते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, ही देवी आमच्या कुळाचीच आहे या कुलस्वामिनीस सर्वांनी वंदन करावे व तिला जीवेभावे ओवाळावे ४
४१८ अवघ्या जेष्ठादेवी कोण पूजनाचा ठाव ।
धरिताचि भाव कोठें नाहींसे जाले ॥ १ ॥
१ जगति

सार्थ तुकारामगाथा २०७
दिसें सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें ।
तळीं गेलें देखें । वरी टोले' न साहाती ॥ २ ॥
पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी ।
बसकोळचा घागरी । डेरे रांजण भाडगीं ॥ ३ ॥
तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना ।
आपुलाल्या स्थानां । जेथें त्याची शोभत्या ॥ ४
शब्दार्थ व टीपा - ज्येष्ठा-थोर, पट-सिंहासन, बसकोळचा-वंगट
अर्थ .-सर्वच देवी थोर व समान आहेत असे मानले तरी पूजा करण्यास कोणती घ्यावी याचा निवाडा करावाच
लागतो. असा एके ठिकाणी भाव धरताच मग दुसरीकडे पूजा योग्य वाटत नाही. १ सर्व वस्तु सारख्या दिसल्या तरी
एखाद्या निमित्ताने, कारणाने त्याची खरी किंमत ध्यानात येते. गाडग्याच्या उतरंडीत तळातील गाडग्यासच का मान असे
त्याच्यावरील गाडगी विचारतात; पण त्याना आपल्या वरच्या गाडग्याचे ओझे सहन होत नाही. २ सिहासनाचा
अधिकार एकासच असतो व इतर लोकांना त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे मान मिळतो. एकाच मातीच्या वसच्या
गौरी (लक्ष्मी), घागरी, डेरे, रांजण, गाडगी अशा वस्तू तयार होत असल्या तरी पूज्यस्थानाचे महत्त्व गौरीसच
असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मानाच्या जागेकरिता कोणी रुसू नये. आपापल्या योग्यतेच्या
स्थानावरच जो तो शोभून दिसतो. ४
४१९ खेचर खडतर । काळ कांपती असुर ।
नांदे भीमातीर । पंढरपुरपाटणीं ॥ १ ॥
आतां फ्री कां रे हांकारा । सहस्र नामें एकसरा ।
दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ २ ॥
सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या वनीं ।
पावली जननी । झोटि मोकळिया केशीं ॥ ३ ॥
लाविलें कावरें । प्रल्हादा म्हांसासुरें ।
आली येकसरें । दांत खात रंगासी ॥ ४ ॥
वसुदेवाचीं बाळें । सात खावलीं ज्या काळें ।
आली भोगवेळें । तया कारणें तेथें ॥ ५ ॥
पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं ।
धावोनियां काढी । अंगसंगें त्राहार्विलीं ॥ ६ ॥
नामाचे चिंतन । तेथें धांवते आपण ।
न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥ ७ ॥
कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता
काय भय भूतां । काळ यमदूतांचें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :-खेचर-आकाशात संचार करणारी भूतसृष्टी, पाटणीं-शहरात, झडपणी-बाधा,
वासुगीच्या-अशोकाच्या, झोटि-लांब केस, कावरे-त्रास, जाच, म्हांसासुरें-हिरण्यकशिपु या नावाच्या महिषासुराने,
बाज-नस्त, त्राहार्विली-रक्षण केली, हीण-कमीपणा

१ टोले साहातीं.

२०८ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - ही आमंची प्रमुख देवी पंढरपूर शहरात भीमेच्या काठावर नांदत असल्याने तेथरावी इतर क्षुद्र
दैवते हिच्यापुढे थरथर कापत असतात १ आता या देवीच्या नावाने हजार नावांनी एकदम हाक मारा मग तो
तुमचा अगसंग करून या इतर क्षुद्र दैवताना दूर करेल २ इतर दैवताची अशीच बाधा सीतामाईस झालेली
असल्यामुळे तिला अशोकवनात बंदिस्त व्हावे लागले पण या वेळीही जगन्माता केस मोकळे सोडून तिच्या साह्यास
धावली व तिला हिनेच मुक्त केले त्या हिरण्यकशिपु नावाच्या महिषासुराने थोर भक्त प्रल्हादाला त्रास देण्यास
सुरुवात केली मग हीच माता एकदम दात ओठ खात नृसिंहाच्या रूपाने आली व या दैत्याच्या तिन नाश केला ४
ज्या कसाने वसुदेवाची सात मुले निर्दयपणे मारिली होती त्याचा नाश करण्यासाठी हीच कृष्णरूपाने वसुदेवाचे दुख
दूर करण्यास सिद्ध झाली ५ सर्व सामर्थ्यांनी सिद्ध असलेले पाडववीर या क्षुद्र दैवताच्या कोपानी त्रस्त झाले व
वनवासात भटकू लागले, पण या श्रेष्ठ देवीनेच त्याचे रक्षण करून अगसंग येऊन त्याची लाज राखली ६ जेथे श्व
हिच्या नामाचे चिंतन सुरू असते तेथे तेथे ही जाऊन मदत करते रक्षण करते अशा वेळी ही देवी कृपाचा कमोपणा
न पाहता फक्त भावभक्तीकडे लक्ष देते ७ तुकाराम महाराज म्हणतात, ही कुळीची देवता आम्हास मातेप्रमाण
आहे ही एकदा प्रसन्न झाल्यावर मग प्रत्यक्ष यमाचे किंवा यमदूताचे भय कसाल ? ८
४२० देवी देव जाला भोग सरला¹ यावरी ।
सांगाया दुसरी ऐसी² नाही उरली ॥ १ ॥
हरिनामे देवनाम तुम्ही गाऊनियां जागा ।
पैठवणी मागा नका ठेवू लिंगाड ॥ २ ॥
शेवटीं सुताळी वरवी वाजवावी डाक ।
ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥ ३ ॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी ।
तुका म्हणे बरी आजि कोडीं उगविलीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पैठवणी-विदागी पाठवणी, लिंगाड-खटपट लचाट सुताली-चांगल्या ताळावर
अर्थ - देव झाला देवी झाली सर्व प्रारब्ध कर्मानुसार भोगावयाचे भोगही संपले आता काही दुसरे
करावचे आहे असे सांगायलाही काही उरले नाही १ आता तुम्ही या देवाचे हरीचे नाव घेऊन जागे राहा व
त्यासाठी आपली नेहमीची कृपेची विदागी मागा, उगाच मागे खटपट ठेवू नका २ आता या शब्दाच्या प्रसंगात
चांगल्या तालावर, सुरावर डाक वाजवा, व सरतेशेवटी संपल्यावर एक तालाने शेवटचा मेळ साधा ३ आता सर्व
मानकर्याचे मान देऊन झाल आहेत हा देव्हारा आता गुंडाळून ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, कारण आता
सर्व संकटाचा परिहार झाला आहे सर्व रहस्ये उलगडली गेली आहेत ४
४२१ झाली झडपणी खडतर देवता । सचरली आतां³ निघो नये ॥ १ ॥
मज उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ २ ॥
नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी काही आता ॥ ३ ॥
तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझें तो बचन आच्छादले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - झडपणी-बाधा
अर्थ - अरे मला कसली तरी बाधा झाली आहे कसल्या तरी खडतर देवतेने झपाटले आहे आता ती जी
अंगात झिरली आहे ती काही बाहेर निघत नाही १ आता मला लोकर काही तरी उपचार करा आता मला काही ही
१ सरले २ उरी ३ चित्ता रिघो नये

सार्थ तुकारामगाथा २०९
फार सहन होत नाहीं २ मला असे करा ना. चंद्रभागेच्या तीरावर एक देव आहे. त्याच्या पायांवर घाला ना मला.
आता माझ्या जीवात काही उरलेले नाही, म्हणून ही विनवणी करीत आहे. ३ तुम्हांस मी हे वर्तमान कळवीत
आहे तोवर तुकाराम महाराज म्हणतात, तो माझी वाणीही बंद होण्याची वेळ आली.
४२२ अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे ।
कोणाचे हे चाळे सुख दुःख न मनितां ॥ १ ॥
मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं ।
पालटाचा घेईं । भाव खरें लोपे ना ॥ २ ॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा ।
स्थिरावल्या कैसा काय जाणों विचार ॥ ३ ॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ ।
मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सोवा - मनातील गोष्टी, एथ्याच - उगाच
अर्थ:- माझ्या अंगात देवी संचारली आहे हे तुम्हांस कुणास समजत नाही काय ? माझी सर्व सुखदुःखे व
त्याचे चाळे कुणी संपविले ? १ मी तर आता बेहभानावर नाही माझ्या या बोलण्यावरूनच काही ओळख पटल्यास
पाहावी. माझ्यात जो पालट झाला आहे त्याचा खरा भाव काही लपणारा नाही २ आपल्या मनातल्या गोष्टी तुम्ही
उगाच विचारून तर पाहा. त्या कशा स्थिर झाल्या आहेत याचा नीट विचार करा ३ तुकाराम महाराज म्हणतात,
हा लाभ होण्याचा काळ असून थट राहण्याचे येथे कारण नाही अशी संधी आता पुन: कशी व केव्हा येणार ? ४
४२३ पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय ।
बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेतितां फुंप फांटी । खुंट दरडी न पाहे ।
आधार' नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥ १ ॥
दाते हो दान करा । जातें पंढरपुरा ।
न्या मज तेथवरी । अल्लमाचा सोयरा ॥ २ ॥
हिंडतां गव्हाणें गा । शिणलों बारोदारीं ।
न मिळेचि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।
कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी ।
पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥ ३ ॥

  • या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना ।
    न सरेचि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।
    पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा ।
    श्वान हे लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥ ४ ॥
    काय मी चुकलौं गा । मार्गे नेणवे फांहीं ।
    न कळेचि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।
    १ आधार नाही कोणी। मज बाप ना माय ॥ २ येरझारी, ३ जन्मदु ख निवारी, ४ नाही भीक, ५ नेगवेचि.
    तु. गाथा....२७

२१० सार्थ तुकारामगाथा
मी माझी भुल्लों गा । दीप पतंगासोयी ।
द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥ ५ ॥
दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण ।
यावया येथवरी । होतें हेंचि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुशन ।
विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सैराट-भलतीकडेच, फुंप-कुपण, खुंट-खाट, दरडी-नदीचे उंच तीर, अरामाचा-पांगु-
ळाचा, गव्हाल-पांगळयाच्या हातातील काठी, पागोरा-अंकीत.
अर्थ:- देवा, मी पांगळा झालो आहे. मला हातपाय नाहीत य ज्यावर मी बसलो आहे ते भलतीकडेच
कुठेही बेदरकारपणे जाते ते फाट्यास, कुपणास, खाडास, नदीच्या उंच तीरास न पाहता वाटेल तसे धावते. देवा,
मला कुणाचाच आधार नाही. ना आईचा, ना बापाचा १ अहो दाते लोकहो, मला दान करा ना. मी पंढरपुरास
निघालो आहे. मला तेथवर न्याना तुम्ही. तुम्हीच संतजन आमच्यासारख्या पांगळयांचे सोयरे आहात २ या
काठीच्या साहाय्याने मी सर्वत्र हिंडून हिंडून शिणून गेलो आहे. माझे दुःख निवारण करणारा दाता अजून मला
कुणीच भेटला नाही. संतांच्या मुखातून अशी कीर्ती ऐकली आहे की तो पंढरपूराचा धीहरी पांगळया माणसांस पाय
देतो. तो मला दाखवा ना. ३ मी या पोटाच्या निमित्ताने लोकांच्या अकित झालो आहे; त्यामुळे प्रत्येक आईबापास
हे माझे म्हणणे असतेच, ते कधी सरतच नाही. भीक मागणेही संपत नाही. काही लोक मला दारात पाहताच
पुढे जा म्हणतात. त्यांना काही दया मायाच नाही; पण महादारुण अशी ही आशा कुत्र्याप्रमाणे माझ्या पाठेमागे
लागली आहे. ४ मी पूर्वी काय व कसे चुकलो कुणास माहित, मला पापपुण्यही कळेनासे झाले आहे. दिव्यावर
पतंग झेप घालतो त्याप्रमाणे मी माझ्याच वृत्तीवर राहिलो. संतमहानुभाव लोकहो, मला जीवदान द्या. ५ मी फार
दूरच्या गावाहून आलो आहे. मला फार मोठे दुःख झाले आहे याच दुःखाच्या पोटी मी येथवर आलो बाहे. तुमची
भेट दुर्लभ असली तरी आज तुमच्या पायाचे मला दर्शन झाल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आज तुम्हां संताना
दोन्ही हात जोडून नमस्कार असोत. ६
४२४ देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों ।
करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों ।
पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलीं ।
परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगूळ जालों ॥ १ ॥
आतां माझी करीं चिंता । दान देईं भगवंता ।
पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ २ ॥
चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं ।
बहुत जन गेलीं । नाहीं आलीं भागुतीं ।
न देखें काय जालें । कान तरी ऐकती ।
बैसलों संधिभागीं । तुज धरुनि चित्तीं ॥ ३ ॥
भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाय ।
न भरें पोट कधीं । नाहीं निश्चळ पाय ।
हिंडतां भागलों गा । लक्ष चौऱ्याशीं गांव ।
धरुनि राहिलों गा । हाचि बसता ठाय ॥ ४ ॥

भरवसा काय आतां । कोण आणि अयचिता ।
तैसीच जाली कीर्ति । तया मज बहुतां ।
म्हणउनि मारीं हाका । सोयी पावे पुण्यवंता ।
लागली भूक थोरी । तूं चि कृपाळु दाता ॥ ५ ॥
संचित सांडवलें । कांहीं होतें जबळीं ।
वित्त गोत पुत भाया । तुटली हे लागावळी ।
निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं ।
तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सघोभायीं- संसार व तू यात, ठाव-मूळ ठिकाण, वित्त-संपत्ती, गोत-नातेवाईक,
पुत-पुत्र, लागावळी-मायेचा सबंध.
अर्थ:- हा काहो माझा देश या येय नसूनही मी या ठिकाणी फिरत फिरत आलो आहे. मी आता कुणावर
सत्ता करावी ? मी स्थिर कुठे राहिलो आहे ? माझ्या पायांनी व डोळ्यांनी तर मला सोडूनच दिले आहे असा मी
आंधळा, पांगळा या परदेशी असून मला कुणीही प्रेमाचे नाही. १ देवा, आता माझी चिंता तूच करावीस तुझ्या कृपेचे
दान द्यावेस. मागेपुढे राहून कुणी साभाळणारे मला नाही; म्हणून तू मला आता या साधुसंतांच्या हाती सोपीव २
याउ चालत असताना मला फार भय बाटले. कारण या वाटेने पुष्कळ लोक गेले; पण ते काही परत आले नाहीत.
त्यांची काय गती झाली ती काही कानावर आली नाही. काही दिसलेही नाही. यामुळे संसार व तू माच्यात धित ठेवून,
मनात तुला बाणवून मी बसलो आहे. ३ देवा, तुझ्या ठायीचे मूळ ठिकाण सोडल्यापासून मी तुझी करुणा भाकीत
आहे. कोणत्याही एकाच गळी मी निश्चल होऊन राहिलो नाही. खूप हिंडता हिंडता थकून गेलो. चौऱ्याऐशी लक्ष
गावे हिंडून हिंडून मी फार थकलो आहे देवा, आता तुझ्याकडे पाहात याच जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नात आहे. ४
कुणीतरी अवचित मजसाठी काही घेऊन येईल असा भरवंसा मला नाही. कारण माझ्या पूर्वीच्या लोकात तशीच
कीर्ती झालेली आहे. म्हणून तर देवा, तुला मी हाका मारीत आहे पुण्यवंता, माझ्यावर कृपा कर. मला फार भूक
लागली आहे रे, आजि तुझ्याशिवाय कृपाळू व उदार दाता असा कुणी नाही ५ माझ्याजवळ जे काही थोडे पूर्व-
कर्माचे संचित होते ते सर्व खर्च झाले. संपत्ती, नातेवाईक, पुत्र यांच्या मायेचा सबंधही संपून गेला देवा, मी आता
खरोखरीच निष्काम बनलो आहे. हेच माझ्या कपाळी होते तुकाराम महाराज म्हणतात, आता तूच माझा सर्वस्वी
हित करणारा प्रभू आहेस. ६
विवरण :- वरील दोन अभंग पांगळ्याचे म्हणून तुकारामबुवांनी लिहिले आहेत धडधाकट, श्रीमंत, कला-
चतुर, श्रेष्ठ वर्णाची, देखणी माणसे कुणालाही प्रिय होतील पण आंधळे, लुळे, पांगळे याचा कणव कुणाला येणार ?
पाप नसल्यामुळे, डोळे नसल्यामुळे अधिकच दयनीय अवस्था झाल्यावर एका पांडुरंगाखेरीज दुसरा कोणी दाता नाही
अशीच या पांगळ्याची खात्री झालेली दिसते अशा पांगळ्याला कुणी सांभाळणारा नसतो, कुणी जवळ करणारा
नसतो, भारी दुखे याला भोगावी लागतात, सर्वांनी त्याची उपेक्षा केलेली असते तेव्हा संताच्या सहवासात, साधूच्या
संगतीत त्याच्या जीवास तेवढेच सुख होते ईश्वराकडे चित्त लागल्यामुळे तेवढीच दुःखाची जाणीव कमी होऊन या
पांगळ्या-आंधळ्याची जीवितातील करुणा भक्तीस मोठी पोषक झाली. देवासही अशा माणसाचा फार लोभ कारण
याना साभाळणारा हाच एक पाडुरंग असल्याची जाणीव त्यालाही आहेच या पुढचेही आंधळ्यावरील रूपकात्मक
अभंग याच भूमिकेवरचे आहेत
४१५ देखत होतो आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टो गेली वरी आले पडळ ।
तिमिर फोडलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालो देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥