सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
सार्थ तुकारामगाथा १६१
कसे लाभले ? जन्मतःच पाचव्या सहाव्या दिवशी याला सटवीच्या किंवा सटवाईच्या फेऱ्याची बाधा कशी झाली
नाही ? ४
३५२ गर्भाचे धारण । तिने वागविला सिण ॥ १ ॥
व्याली कुल्हाडीचा दांडा । वर न घालीच धोंडा ॥ २ ॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सिण-त्रास, काळ-यम, माय-आई
अर्थ - असा जो अभक्त त्याच्या गर्भधारणेने आईस शीण मात्र व्यर्थ झाला १ आपल्याच गोतास काळ
होणारा कुऱ्हाडीचा दांडा तो जणु व्याली उपजतच तिने त्याच्या मुखावर धोंडा घालून त्यास मारून का नाही
टाकले ? २ हा तिच्या पोटी जणु प्रत्यक्ष यमच जन्मास आला व त्याने सर्व कुळास बट्टा लाविला ३ तुकाराम
महाराज म्हणतात, अशा या दुष्ट अभक्ताची आई नरकास जाते ४
३५३ पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥ १ ॥
विधीपुरतें कारण । बहु वारावे वचन ॥ २ ॥
सर्वस्वाप्ति नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥ ३ ॥
तुका म्हणे दुरी । राखता हे तोची बरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वारावे-दूर करावे, नाडी-आड येते, फसचित
अर्थ - जो स्त्री आपल्या पतीस पतनाकडेच नेत असते तिचा स्नेह किंवा तिचे प्रेम या सर्व गोष्टी खोट्याच
समजाय्यात १ केवळ शास्त्रविधीपुरताच तिच्याशी सबंध ठेवावा तिच्याशी फार बोलणे दूर करावे, फार बोलू नये
तिच्याशी २ ती सर्वस्वाच्या आड येणारी, फसविणारी असून लाघवाची, गोड गोड बोलाची ती एक येडीच
असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही स्त्री जितकी दूर ठेवता येईल तितकी बरी त्यातच आपले
सुख आहे ४
३५४ देव आड जाला । तो भोगिता मी उगला ।
अवघा निवारला । शीण शुभाशुभाचा ॥ १ ॥
जीवशिवाचे भातुके । केले क्रीडाया¹ कौतुके ।
फेचीं येथें लोके । हा आभास अनित्य ॥ २ ॥
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग ।
वाटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥ ३ ॥
अवघी एकाचीच वीण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न ।
वेदपुरुष नारायण । तेणे केला नियाडा ॥ ४ ॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस ।
पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा² ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - उगला-उगाच, भातुकें-भातुकलीचा खेळ, लाग-सबध; सौरस-गोडी
अर्थ - आता आमच्यासमोर देव उभा राहून आड आला व तोच सर्व भोगत असून मी मात्र उगाच उभा
आहे सर्व शुभाशुभ कर्माचा शीण जो अवघा होता तो त्याने स्वतःकडे भोक्तृत्व घेऊन दूर केला १ केवळ क्रीडा
१ होत कवतुकें, २ निरोपी
तु गाथा २१
१७० सार्थ तुकारामगाथा
करण्यासाठी मुली भातुकलीचा खेळ करतात त्याप्रमाणे त्याने ०शियाशिवीचा खेळ केवळ स्वत च्या कौतुकासाठी
मांडलेला आहे या ठिकाणी विविध प्रकारचे लोक म्हणजे हे आपले, हे परके असे आहेत तरी कुठे ? जो दिसतात तो
सर्व आभासच आहे अनित्य आहे २ तात्त्विक दृष्टीने पाहिले तर हे सब जगच विष्णुमय नव्हे काय ? आपला
सबंध तिथे जडत असला तरी व वर्णधर्माप्रमाणे वाटणी झालेली असली तरी हा एक प्रकारचा खोट्याचाच प्रकार नव्हे
काय ? ३ सारे पाहिले असता हे सर्व चराचर जगत म्हणजे त्या एकाचीच वीज नव्हे काय ? मग तेथे भिन्नतेचा
प्रकार असणार कुठून ? असा निर्णय जो वेद पुरुष नारायण त्यानेच घेतलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हण
तात त्या प्रसादाची गोडी मला भाग्याने मिळालेली आहे म्हणूनच मला त्या प्रभूच्या पायाशी निवास करण्याचे
सधी मिळाली आहे मी आता येथून निराळा कधीच होणार नाही ५
विवरण - तुकोबांच्या या एका सुबोध अभगात एक फार मोठे तत्त्व स्पष्ट झाले आहे केवळ स्वत च्या
सुखासाठी ते चित्तत्त्व बहुविध रूपानी व्यक्त झाले वास्तविक पाहता ही विविधता खरी नव्हे निरनिराळया रूपाची
वाटणी, वर्णविभाग हे सब खेळच होत परतु मूळचे तत्त्व फार वेगळ बाहे या सब विविधतेतून एक प्रकारचे बनूट
असे सूत्र आहे 'मयि सर्वमिद प्रोत सूत्र मणिगणा इव दान्यान अनेक मणी ओवावेत त्याप्रमाणे माझ्या ठिकराणीच हे
सर्व विश्व ओविलेले आहे असे गीतेत भगवतानी सागितल बाह सूत्र व त्यात ओवलेले मणी या गीतेच्या दृष्टान्तातील
कमतरता भरून पाडताना ज्ञानेश्वरानी एव बहारदार अशी तत्त्वदर्शी ओवी लिहिलेली आहे 'सुवर्णाचे मणी केले।
ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसे म्या जग धरिलें। सबाह्याभ्यंतरों' ॥ आता हा एकाचाच विस्तार असल्यामुळे
'अवघी एकाचीच वोण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न' असा महत्त्वाचा प्रश्न बुवानी उत्पन्न केला आहे
मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली-अभंग
३५५ न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥ १ ॥
भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ २ ॥
शतखंड देह शस्त्रधारी । करिता परी न भीयें ॥ ३ ॥
तुका म्हणे केलों आधीं । दृढ बुद्धी सावध ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जड-दुःख, सकट, आगोज-भयंकर
अर्थ - विठ्ठला, मी तुझे पाय सोडणार नाही असे त्रिचार सागतो अगदी भयरकर वाटेल असा भार
मजवर मोठाच पडला आहे विठ्ठला २ शस्त्रधारण करणाऱ्याने मजवर जरी आघात करून शेकडो तुकडे माझ्या
देहाचे केले तरी मी भिणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, आरभीच सावध होऊन मी बुद्धी दृढ केली
आहे सावध केली आहे ४
३५६ बरवे बरवे केले विठोबा बरवे । पाहोनि आत क्षमा अगीं फाटीवरी मारविलें ॥ १ ॥
शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटविले ॥ २ ॥
तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतले रे ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - बरवें-चागले, फाटीवरी-काठ्यानी
अर्थ - विठ्ठला, हे फार चागले केले तुम्ही माझ्या अगची क्षमा वृत्ती पाहून मबाजीबुवाकडून मला
काठ्यानी तुम्ही मारविले १ नीतीनियम सोडून त्याने मला फार शिवीगाळ परून माझी पुरतीच विटबना केली २
तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही क्रोधापासून यावेळी माझे रक्षणच केले ३
३५७ पावलो पाथलो । देवा पावलो रे ॥ १ ॥
थरवें संचित होतें तैसे जालें रे । आता काय बोलो रे ॥ २ ॥
सोज्ज्वळ फटकवाटा भावे करू गेला रे । तुका म्हणे करुन वेगळा केलो रे ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा १७१
शब्दार्थ व टीपा :- सचित-पूर्वजन्मीचे साठलेले कर्म, सोज्वळ-नीट, स्वच्छ, कटकवाटा-वाटघाती
भरलेला वाटा
अर्थ :- देवा, माझ्या पूर्वसचित कर्माप्रमाणे मला फळ मिळाले ? धाडले कर्म मी केले असावे; त्याप्रमाणे
घडून आले. आता त्यावर मी काय बोलावे ? २ मबाजी गोसाव्याने प्रदक्षिणेच्या मार्गात काट्या पसरल्या होत्या
त्या मोठ्या भक्तिभावाने लोकाना त्रास होऊ नये म्हणून मी दूर केल्या पण तुकाराम महाराज म्हणतात, ह्या
गोसाव्याने मला धरून भूर केले की हो ३
३५८ का होती कां होती । देवा एवढी फजोती ॥ १ ॥
मुळीं वर्म नसतो चुकलो । तो मी ऐसे चित्तीं ॥ २ ॥
होणार होऊनि गेले । मिथ्या आता खंती रे ॥ ३ ॥
तुका म्हणे पुरे आता । दुर्जनाची सगती रे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वर्म-रहस्य, खती-काळजी
अर्थ :- देवा, माझी एवढी फजिती का होत असते रे ? देवा, मुळातले रहस्य जर मला समजले असते तर
अशी फजिती झाली नसती १ मुळातच हा दुर्जन आहे असे समजण्याचे माझे चित्तात आले नाही २ खरे, आता जे
व्हायचे ते होऊन गेले आता त्याची काळजी करणे खोटेपणाचेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मला
दुर्जनाची संगत नको हो देवा ४
३५९ सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥ १ ॥
तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ २ ॥
कोणा लाज नेणा ऐसे । आणिका शरण आम्ही¹ जाता ॥ ३ ॥
तुका म्हणे सख्या । माझ्या रखुनाईच्या कांता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुजा-दुसरा, आणिका-दुसऱ्याना.
अर्थ :- अनंता, परमेश्वरा, मला आता या सर्व उपाधींतून सोडवा ना ? १ देवा, तुझ्याशिवाय दुसरा कोण
माझे प्राण रक्षण करणारा आहे ? २ मी जर दुसऱ्या दैवताना शरण गेलो, तर त्याची लाज तुमच्याशिवाय कुणास
वाटणार आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे रखुमाईच्या कांता, विठ्ठला, मला या त्रासातून मुक्त करा ४
विवरण - वरील चारपाच अभंगातून तुकारामबुवाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्देश
आहे तुकोबांच्या वेळी मबाजी नावाचा एक ब्राह्मण चिंचवडहून देहू येथे स्थायिक झाला होता देहूच्या पीलशेट्टी
नावाच्या एका गृहस्थाने मठ वगैरे बाधण्यासाठी आपल्या शेतातील भिवमगा नावाचा एक भाग मबाजी
गोसाव्यास दिला मबाजीने त्यावर फुलझाडे वगैरे लावून एक छोटासा बगीचा तयार केला लोकाना मत्र वगैरे
देऊन मबाजी थोडाफार गब्बरशाही वगीत असे त्याची शिष्यशाखाही मोठी होती, परंतु तुकाराम महाराजाचा
भजनकीर्तनाचा संप्रदाय वाढला तेव्हा सर्व लोकाची गर्दी तुकोबाच्या भोवती होत राहिली मबाजीस या गोष्टीचे
वैषम्य वाटले तो मनातून तुकोबाचा द्वेष करू लागला
हा प्रकार व्हापला एक निमित्त सापडले तुकोबाच्या मासऱ्यानी, अमाजी मुळ्ये यानी त्याना एक म्हैस घेऊन
दिली ही म्हैस एकदा कुंपण ओलांडून मबाजीच्या परड्यात शिरली तिने झाडाची थोडी नामधूपही केली अर्थातच
मबाजीला फार राग आला,त्याने तुकोबाना अपशब्द बोलायला सुरुवात केली परंतु तुकोबा शान राहिले पण मबाजीचा
स्वभाव पालटला नाही त्याने एकादशीस लोक विठ्ठलमदिरात येतील व आपल्या परड्यास उपद्रव होईल या भीतीने
प्रदक्षिणेच्या वाटेवर काटेरी झुडुप घालून अडथळा निर्माण केला भक्ताना प्रदक्षिणा घालताना त्रास होऊ नये म्हणून
१ तुम्ही
१७२ सार्थ तुकारामगाथा
तुकोबांनी हे काटेरी कुंपण वाढून टाकले हे काम होत असतानाच मबाजी संतापून धावतच तेथे आला कुंपणाचीच
एक काटेरी काठी उपटून तिने तुकोबास मारहाण करण्यास त्याने प्रारंभ केला एक काठी वापरून निरुपयोगी झाली,
की तो दुसरी घेई अशा दहा काठ्या झाल्या तरी तुकोबांची शांती ढळली नाही तुकोबांना वाटले, देव आपल्या
क्षमावृत्तीची परीक्षाच पाहात आहे या गबाळावर रागवावे हे त्याच्या मनात येईच ना इतर भक्त मंडळींनी व अवलीने
अथवा जिजाईने हळूवार हाताने त्यांच्या अंगात रुतलेले काटे काढले एकादशीस तुकोबांचे कीर्तन सुरू झाले मबाजी
कीर्तनाला आला नव्हता तुकोबा स्वतः त्याच्या घरी गेले व त्याची त्यांनी क्षमा मागितली आपणास मार देताना
त्याला काही घाम तर फार झाला नाही ना ? अशी त्यांनी चौकशी केली । पुढे मबाजीबुवा सजिर झाला व
कीर्तनास जाऊ लागला
३६० पुत्राची वारता । शुभ ऐके जेवीं माता ॥ १ ॥
तैसे राहो माझें मन । गाता ऐकतां हरिगुण ॥ २ ॥
नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥ ३ ॥
तुका म्हणे पाहे । कासवीचे पिले माये ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वारता-बातमी
अर्थ - दूर गेलेल्या मुलाची शुभ वार्ता ऐकून ज्याप्रमाणे आईस आनंद होतो, १ त्याचप्रमाणे या ईश्वरीचे
गुण गाऊन, ऐकून माझ्या मनास आनंद होत असतो २ पारध्याच्या गाण्यास जसे हरिण लुब्ध होते व देहभान
विसरून जाते तशीच अवस्था माझी झाली आहे ३ मोठ्या प्रेमाने कासवीची पिले आपल्या आईकडे पाहात
असतात त्याप्रमाणे देवा, माझे लक्ष तुझ्याकडेच लागून राहिले आहे आईच्या दृष्टीवर पिल्लांचे पोषण होते असा
कासवीच्या बाबतीत संकेत आहे ४
३६१ ध्यानीं योगिराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाठीं तयाचिया ॥ १ ॥
तान भुक त्याचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥ २ ॥
कोण सखें तया आणीक सोयरें । असे त्या दुसरें हरीविण ॥ ३ ॥
कोण सुख त्याच्या जीवासी आनंद । नाहीं राज्यमद घडी तया ॥ ४ ॥
तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करिता होय ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - कपाटीं-डोंगराच्या गुहेत, राज्यमद-राज्याचा लोभ, घडी-क्षणभर
अर्थ - जे लोक सर्वसंगपरित्याग करून, ध्यानस्थ होऊन डोंगराच्या गुहेत जाऊन बसले त्या योगीराजाच्या
पाठोपाठ देव त्याच्या संरक्षणासाठी नेहमी असतो १ त्याची तहान, भूक, त्याचा शीतोष्णापासूनचा त्रास यांची
काळजी तोच घेत असतो कारण हे योगिराज किंवा विरक्त पुरुष देहाविषयी नेहमीच उदासीन असतात २ त्यांना या
श्रीहरीखेरीज त्याची चिंता पाहणारे दुसरे सखेसोयरे कोण आहेत ? ३ त्या रानावनात त्याच्या जीवास कसले सुख
असते ? त्यांच्या मनात दुसरा कसला आनंद असतो ? एक क्षणभर देखील राज्यसुखाचा लोभ त्यांना वाटत
नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा महात्म्यांना विष आणि अमृत याही गोष्टी सारखीच वाटते त्या
नारायणाच्या कृपेमुळे सर्वत्र समभाव निर्माण होतो ५
३६२ न व्हावे तें जालें देखियेले पाय । आता फिरूं काय मागें देवा ॥ १ ॥
बहु दिस होतौं करीत हे आस । तें आले सायासे फळ आजि ॥ २ ॥
कोठवरि जिणे संसाराच्या आशा । उगवो हा फासा येथूनिया ॥ ३ ॥
वृक्षालीं तयाचा मूळ ना भारग । लागे तो लाग सांडूनिया ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा १७३
पुढें उल्लंघितां दुःखाचें डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥ ५ ॥
तुका म्हणे कास धरीन पीतांबरों । तूं भवसागरीं तारूं देवा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टोपा :- आस-इच्छा, सायासे-प्रयत्नाने, फांसा-पाश, उगवो-सुटावा, लाग-लाभ, तारू-नाव
अर्थः- देवा जे सहजासहजी घडणार नाही ते आज घडले की रे. मी आज तुझे पवित्र चरण पाहिले. आता
काय या थोर लाभापासून मी मागे फिरू ? १ पुष्कळ दिवस झाले, मी हीच इच्छा करीत होतो. ते फळ तुझ्या
चरणदर्शनाने मोठ्या प्रयत्नाने माझ्या हातात आले. २ या संसाराच्या आशेत राहून देवा, कुठवर जगावे ? आता या
श्रीविठ्ठलाच्या चरणामुळे संसाराच्या पाशातून मी सुटावे. ३ असला हा विठ्ठलप्राप्तीचा लाभ सोडून देऊन जे संसार-
सागरात बुडून गेले त्यांचा काहीही ठावठिकाणा सापडत नाही. ४ जर तुझी संगत मिळाली नाही तर देवा, पुढे
दुःखाचे डोंगरच्या डोंगर ओलांडताना पुनः पुनः गर्भवासाचे जे दुःख भोगावे लागते त्यास अंत नसतो. ५ तुकाराम
महाराज म्हणतात, देवा, म्हणून मी तुमच्या पीतांबराची कास धरूनच उभा राहीन. कारण तूच या भवसागरातील
माझी नाव आहेस विठ्ठला. ६
३६३ वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥ १ ॥
तया पुंडलिकाने केला उपकार । फेडावया १ भार पृथीवीचा ॥ २ ॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टोपा - तपाचे तपश्चर्येचे, सायास-कष्ट.
अर्थ - त्या वैकुंठास जाण्यासाठी माणसांस तपश्चर्या करून फार मोठमोठे प्रयत्न करावे लागतात प्रसंगी
जीवाचा नाशही करावा लागतो. १ परंतु तो पुंडलीक महामुनी किती थोर पाहा. त्याने मोठाच उपकार पृथ्वीवरील
भार हलका करण्यासाठी केला आहे. २ कारण त्याने भूवैकुंठ पंढरपूर येथे विठ्ठलाला उभे करून अतिशय सोपी
व सुलभ अशी पायवाट निर्माण केली आहे; असे तुकाराम महाराज म्हणतात. ३
३६४ शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥ १ ॥
येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ २ ॥
करितो होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥ ३ ॥
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गाढे-मोठे, लंडीपणा भित्रेपण, घडी-वेळ
अर्थ :- लोकहो, शोकाने शोकच फार वाढतो म्हणून हिंमत धरून मोठे धैर्य वाढवा. १ या नरजन्मास
येऊन काय न करावे ? तर बंधूंनो येथे भित्रेपणा मात्र खोटा आहे. २ परमार्थाच्या विचाराविषयी अथवा ईश्वर-
भक्तित्विषयी सर्व जण होय होय असेच म्हणतात, पण शेवटी प्रत्यक्ष मदत करण्याचा प्रसंग आला की कोणीच साह्य
करीत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरभक्ती करण्याची नरजन्मातील ही एक वेळ साधली तर
पुष्कळच लाभ आहे ४
३६५ म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जियैली ॥ १ ॥
माझिया गोतें हैं बसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ २ ॥
करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरे विपमासी ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं काळापाशी गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥ ४ ॥
- शब्दार्थ व टीपा :- वर्जियैली-मोडली, गोतें नातेवाईकानी, गोवा-आठवणूक
१ हरावया
१७४ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - म्हणूनच मी हा असा खेळ आज मांडिला आहे यात कोणतीहो दिशा मी वगळलेली नाही १
हे सभोवती जे दिसत आहे ते माझ्याच नातेवाईकांच्या सबंधातील जगत आहे विटाळाचा भेद मला कुठेच दिसत
नाही २ त्या श्रीविठ्ठलाने तो स्वत च सर्वत्र भरून राहिला आहे अशी मला ओळख पटवून दिली असल्यामुळे
दुसरा विपरीत भावच माझ्या मनात कधी येत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या काळोपाशी माझ्या
चित्ताची आडवणूक झालेली नाही माझी स्थिती, माझी बुद्धी त्या देवापासून निराळी मुळीच नाही ४
३६६ वैष्णव तो जया। अवघी देवावरी माया ॥ १ ॥
नाहीं आणिक प्रमाण । तन धन तृण जन ॥ २ ॥
पडता जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥ ३ ॥
तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - तन-शरीर जड-सकट
अर्थ - ज्याची सब प्रीती त्या देवावर असते तोच खरा वैष्णव होय १ त्याला शरीर, सपती, लोक
हे गवताप्रमाणे क्षुल्लक वाटतात त्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा नसते तो देवालाच प्रमाण मानतो २ केवढहो
मोठे सकट आले तरी तो आपल्या नेहमीच्या नित्य उपासनेत अथवा भक्तीत निर्धाराने व्यत्यय आणीत नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात तो एकदा ईश्वराशी जडला की मग त्याची जात कोणती का असेना ४
३६७ करोत तपादि साधने । कोणी साधो गोराजने ॥ १ ॥
आम्ही न वजों तया वाटा । नाचू पंढरीचोहटा ॥ २ ॥
पावोत आत्मस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥ ३ ॥
तुका म्हणे छंद । आम्हा हरिच्या दासा निंद्य ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गोराजने- ईश्वराच्या प्राप्तीसाठी स्वत स जाळून घेण्यासारखी अघोर साधन, न वगो-
जाणार नाही, चोहटा-चव्हाट्यावर
अर्थ - कुणी तपश्चर्यादी साधन करोत, अथवा कुणी ईश्वराच्या प्राप्तीसाठी स्वत स जाळून घेण्याचे अधोरी
उपाय करोत १ आम्ही काही त्या वाटाकडे चुकूनही जाणार नाही आम्ही केवळ पंढरपूरच्या चव्हाट्यावरच
श्रीहरीचे नाम घेत नाचत राहू २ कुणाला आत्मस्थितीचे ज्ञान लाभो कुणाला मुक्ती ही उत्तम स्थिती असे म्हणा
वेसे वाटो, ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे असले विठ्ठलभजनाखेरीजचे छंद आम्हासारख्या भक्तांना निंद्यच
वाटतात ४
स्वामींस सद्गुरूची कृपा झाली-अभंग ४
३६८ सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥ १ ॥
सांपडविले वाटे जाता गगास्नाना । मस्तकों तो जाणा ठेविला कर ॥ २ ॥
भोजना मागतो तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥ ३ ॥
कांहीं कळे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा जाली ॥ ४ ॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥ ५ ॥
बाबाजी आपले सागितले नाम । मत्र दिला राम कृष्ण हरी ॥ ६ ॥
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अगीकार तुका म्हणे ॥ ७ ॥
सार्थ तुकारामगाथा १७५
अर्थ. - सद्गुरुराजा, मजवर तुम्ही फार मोठी कृपा केलीत परंतु माझ्याकडून तुमची म्हणावी अशी काही
सेवा झाली नाही १ मी गंगेस स्नानासाठी जात असतानाच त्यांनी मला वाटेत पकडले व माझ्या मस्तकावर आपला
अभय हात ठेविला २ त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पावशेर तूप मागितले परंतु मला त्याचा विसर पडला,
हे सर्व स्वप्नात घडले ३ सद्गुरूच्या या ईश्वराच्या सेवेत काही अंतर पडले की काय न जाणो, म्हणून त्वरा
करून सद्गुरू मला सोडून दूर निघून गेले ४ राघव चैतन्य, केशव चैतन्य अशी आपल्या परंपरेची खूण त्यांनी
मला सांगितली ५ आणि स्वतःचे नाव बाबाजी चैतन्य असे सांगून त्यांनी मला 'राम कृष्ण हरि' हा सोपा मंत्र
दिला ६ या दिवशी माघ शुद्ध दशमी, गुरुवार, हा पुण्यदिवस होता तो पाहूनच त्यांनी माझा स्वीकार केला असे
तुकाराम महाराज म्हणतात ७
विवरण - मर्तपर्य तुकाराम महाराज याना सद्गुरूनाथांची कृपा झाली, त्यांनी त्यांचा स्वीकार केला, असा
अतिशय महत्त्वाचा प्रसंग या व या पुढच्या तीन अभंगात त्यांनीच स्वतः वर्णन केलेला असल्यामुळे या अभंगांना
सांप्रदायिकतेत अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे वैराग्य पूर्णपणे अंगी बाणल्यानंतर तुकोबांचे पूर्ण लक्ष ईश्वराकडेच
लागून राहिले होते वृक्षवल्लीच्या सहवासात व वनचरांच्या संगतीत ते आपल्याशीच वादविवाद करून रमत होते
आपली बुद्धी स्थिर करून ह्याने आपल्या मनास पाडुरंगचरणी दृढ केले होते पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांचे मन
तळमळत असे त्याच्या चित्तानी तळमळ होत असे पण परमार्थाच्या मार्गावरही त्याची पावले चित्तशुद्धीच्या मार्गाने
झपाझप अशी पडत होती रोज नवीन जागृति त्यांना येई 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा'
या शब्दात त्यांनी स्वतःच्या आत्मविकासाचे मर्म सांगितले आहे त्यांनी संसार व व्यवहार जवळ जवळ सोडलेलाच
होता एकान्तात ग्रंथांचे अध्ययन व ईश्वराचे चिंतन त्यांचे सुरू होते अभ्यासगाभनेत मग्न असणाऱ्या तुकोबाना
मग एके दिवशी सद्गुरू श्रीबाबाजी चैतन्य यांचा स्वप्नात उपदेश झाला कारण मद्गुरूच्या स्वीकाराखेरीज परमार्थ-
ज्ञान विटे पडते जगू ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, 'शब्दात आलोडिले । अथवा योगादिक जे अभ्यासिले । तें तेंचि
म्हणो ये आपुले । जे सानुकूळ श्रीगुरू ॥' श्रीगुरूची अनुकूलता लाभली वरच सर्व साधनाची वा परमार्थप्राप्तीची
सार्थकता हाय असा हा श्रीगुरूचा महिमा वर्णन करताना अत्यंत बहारदार पद्धतीने श्रीज्ञानेश्वरांनी तेराव्या अध्यायात
'आचार्योपासनम्' या शब्दावर जे अतिशय विस्तृत व जिव्हाळ्याचे भाष्य केले आहे त्याला इतरत्र जोड नाही
याच भूमीस अनुसरून तुकोबांना चैतन्य संप्रदायातील बाबाजी महाराज याचा उपदेश स्वप्नात झाला
सद्गुरूंनी तुकोबांचेवर पूर्ण कृपा केली त्यांना रामकृष्ण हरि हा मंत्र मिळाला हा उपदेश तुकारामांना स्वप्नात
इंद्रायणीच्या गंगेच्या काठी स्नानास जात असताना झाला श्रीगुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून कृतार्थ केले
सद्गुरुनाथांनी त्यांना भोजनासाठी पावशेर तूप मागितले, पण विस्मृतीमुळे तुकोबांच्या हातून ते मिळाले नाही
आपल्या हातून ते मिळाले नाही हाच आपल्या हातून अंतर पडल्याचा प्रसंग घडला म्हणून सद्गुरूंनी निघून
जाण्याची घाई केली की काय ? अशी खूटपूट तुकोबांच्या मनास लागली या बाबाजी चैतन्यांनी राघव चैतन्य व
केशव चैतन्य अशी आपली परंपरा निवेदन केली हा दिवस माघ शुद्ध दशमी गुरुवार हा होता इतका सर्व तपशील
तुकोबांच्या गुरुप्राप्तीसबंधीचा महत्त्वाचा आहे
तुकारामांना हा मंत्रोपदेश देणारे सद्गुरुनाथ कोण ? ते त्यांना केव्हा, कुठे भेटले? त्यांनी जाण्याची त्वरा
का केली ? त्यांनी पावशेर तूप का मागितले ? वगैरे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुकोबाच्या गुरुपरंपरेचा शोध घेण्याचे
महत्त्वाचे कार्य आजपर्यंत अनेक संशोधकांनी विशेषत श्री वा सी बेंद्रे यांच्यासारख्या अभ्यासकाना केले आहे
श्री बेंद्रे यांच्या मते हा गुरुपदेश तुकोबाना ओतुराम 'गंगाघाट' नावाच्या वाटेने तुकोबा असताना झाला सद्गुरूच्या
स्पर्शाने तुकोबाना भावावस्था प्राप्त झाली असावी असाही स्वप्नाचा अथ त्यांनी केलेला आहे या भावानंदात तुकोबा
पूर्णपणे भग्न झाले असल्यामुळे खूप वेळ झाला तरी त्यांना जाग आली नाही एवढ्यात बाबाजी चैतन्य निघून गेले
मग सावध झाल्यानंतर तूप द्यायचे विसरून राहून गेले म्हणून तुकारामबुवाना वाईट वाटले साधू, सन्यासी, वैरागी
यांना तूप देण्याची प्रथा असे तुकोबांचा हा गुरुपदेश इंग्रजी कालगणनेप्रमाणे २३ जानेवारी १६४० या दिवशी
झाला असल्याचा शाध श्री बेंद्रे यांचा आहे
१७६ सार्थ तुकारामगाथा
चैतन्य संप्रदायाच्या परंपरेचा शोधही आज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे या पंथाचा बंगालमधील गौरंग
प्रभू किंवा चैतन्य प्रभू यांच्या पंथाशी काही संबंध आहे की काय ? असा एक तर्क संशोधकांच्या मनात नेहमी असतो,
पण तो तसा नाही असे मानण्याकडे कल काही आधुनिक अभ्यासकांचा आहे
राघव चैतन्याचे बालपण गिरनारच्या भोवती गेले त्याचा संचार महाराष्ट्र, उत्तर हिंदुस्थान, तेलंगण इत्यादी
भागात नेहमी असे राघव चैतन्याचे मूळचे नाव रघुनाथ गिरिनारच्या एका भागात 'शौर्यकुळात' याचा जन्म झाला.
वडिलांच्या आज्ञेवरून रघुनाथाने श्रीदत्ताची उपासना केली दत्ताच्या अनुग्रहानंतर त्याच्याच प्रेरणेवरून हे जुन्नर-
जवळच्या ओतूरच्या डोंगरात व तपोवनात अनुष्ठान करू लागले पुष्पवती नदीच्या तीरावरील शिवाची मडक उपासना
यांनी केली शेवटी व्यासांनी याना दर्शन दिले व याचे नाव राघव चैतन्य असे ठेऊन 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा
मंत्र दिला दत्तानेही चतुःश्लोकी भागवताची शिकवण देऊन संप्रदाय वाढविण्यास सुचविले पुढे लेण्याद्रीसारख्या ठिकाणी
गहून यांनी आपली योगसाधना वाढविली याचा शिष्य केशव भट राजर्षी याच्या संगतीने याचा मुसलमानी राजकर्त्यां-
शीही परिचय वाढला या नव्या सबंधामुळे याची कीर्ती कल्याणी, गुलबर्गा या भागातही खूप वाढली आळंदचे पडित
व जोशी याचे अनुयायी झाले प्रसिद्ध राजर्षी केशवभट यास सन १५४८-४९ मध्ये दीक्षा देऊन यानी त्याचे नाव केशव
चैतन्य असे ठेविले केशव चैतन्याबरोबर यानी तीर्थयात्राही केली सन १५६२ च्या सुमारास राघव चैतन्य यानी
जिवंत समाधी घेतली याचा जन्म सन १४६० नंतरचा असावा याना मुसलमानी परंपरेत हजरत लाडले मशायकही
ऊर्फ राघव दराज आळंद शरीफ या नावाने ओळखत असत राघव चैतन्यांनी संस्कृत व मराठी भाषेत अनेक
ग्रंथ लिहिले ब्रह्मस्वरूप, मायाविचार, ईशम्तवन, योगनिद्रा, सनातन धर्मविचार, इंद्रियदमन, त्रिगुणलीला, बुद्धि-
विकास ही त्याच्या काव्यग्रंथाची नावे होत
केशव चैतन्य हे या राघव चैतन्याचे प्रमुख शिष्य होत यांचा जन्म राजर्षी कुलात झाला हा माळ
राजकारणी व शूर असून यास राघव चैतन्याच्या सहवासात वैराग्याचे महत्त्व पटले राघव चैतन्याकडून गुरुदीक्षा
मिळाल्यानंतर याचे नाव केशव चैतन्य म्हणून प्रसिद्ध झाले राघव चैतन्य समा धन्य झाल्यानंतर केशव चैतन्य काही
दिवस आळंद, मान्यव्हाळ, ओतूर येथे गहात बसत ओतूरास गयावाटेवर याचा मठ असे शिष्यगणही याना मोठ्या
प्रमाणावर लाभला होता केशव चैतन्यानी सन १५७१ मध्ये समाधी घेतली याचाही परमार्थातील अधिकार मोठा
असून यानी भक्तिप्रवाह, वैकुंठपद, बामनांगपंदेह, गीताभागवतसार, परमार्थ विचार असे ग्रंथ लिहिले होते
बाबाजी चैतन्य हे या केशव चैतन्याचे शिष्य होत हे ब्रह्मचारी असून यानी राघव चैतन्याच्या समाधीची
सेवा बरीच वर्षे केली होती याचा मान्यव्हाळीसही एक मठ असे याची उपासना भक्तीप्रधान असून याची कीर्ती
महाराष्ट्रात व तेलंगणात पसरली होती हिंदू मुसलमान असे अनेक शिष्य याना मिळाले याचे गुरू केशव चैतन्य हे
हजरत स्वाजा बदे नवाज व हे हजर शेख गाहाबुद्दीनसाहेब मान्यव्हाळ अशा नावानी प्रसिद्ध होते ओतुरूसही याचे
वास्तव्य असे
सार्थ तुकारामगाथा १७७
पुढच्या अभंगात समाधान व्यक्त केले आहे. वारकरी संप्रदायात या 'राम कृष्ण हरि' मंत्राचे फारच महत्त्व
मानले जाते. भजन-कीर्तनास प्रारंभ यानेच होतो यानाचा जप साधक करीत असतात. या सोप्या मंत्राने ईश्वरसर्वांना
सहज व सुलभ करून दिला अशी श्रद्धा सांप्रदायिकांची आहे
या मंत्राचा उच्चार निवृत्तिनाथ, ज्ञानदेव यांनीही केलेला आहे
'रामकृष्ण माळा नित्य जप करो । तपासी संसारी सुख आहे', 'रामकृष्ण मूर्ती जपा आवृत्ति', 'रामकृष्ण
मंत्र जगासी उद्धार' अशा शब्दांत निवृत्तिनाथांनी या मंत्राचे महत्त्व विशद केले आहे ज्ञानेश्वर महाराजांनीही
'रामकृष्ण सणू आम्हां नित्य दिवाळी', 'रामकृष्ण नेम गृह भजनें', 'हें योगियाचे निज जीवन । रामकृष्ण नारायण',
'ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं' या शब्दांतून या प्रसिद्ध मंत्राचा गौरव केलेला आहे 'नाम मंत्र आम्हां हरि रामकृष्ण'
असे मुक्ताबाईने म्हटले आहे. 'मंत्रामाजी मंत्र सार । रामकृष्ण हा उच्चार', 'रामकृष्ण हें वाचें उच्चारा । इतुकेचि पुरें
आम्हां' इत्यादी चरणांतून नामदेवांनी या मंत्राचे माहात्म्य वर्णन केले आहे पुढे एकनाथतुकारामांनी तर या मंत्राचा
उच्चार वारंवार करून भक्तिमार्गाची वाट सर्वसामान्य प्रापंचिकांनाही सुलभ करून दिली 'रामकृष्ण ऐसीं उच्चारोन
नामें,' 'रामकृष्ण गानीं गात । टाळ चिपळया वाजवीत', 'रामकृष्ण गोविंद नारायण हरी। केशवा मुरारी पांडुरंगा'
अशा अनेक चरणांतून तुकोबांनी या मंत्राचा उच्चार वारंवार केलेला आहे.
३६९ माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥ १ ॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नव्हे गुंपा कांहीं कोठें ॥ २ ॥
जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥ ३ ॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥ ४ ॥
तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरू पांडुरंग ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपाव-उपाय, गुंपा-गुंतागुत, सांगडी-नौका, तापे-ताफे, पेटीं-नदीतून तरून जाण्याचे
साधन.
अर्थ :- या सद्गुरुनाथाने माझ्या चित्तातील भाव जाणून मला हा मार्ग उपायाचा म्हणून सांगितला, १ तो
असा की हा माझ्या आवडीचा मंत्र सोपा असा 'राम कृष्ण हरि' असा सांगितला. त्यात कसलीही गुंतागुंत नाही. २
या सोप्या मंत्राच्या साहाय्याने अनेक साधुसंत यापूर्वी भवसागर तरून गेले आहेत ३ हा मंत्र सर्वांना सुलभ असा आहे.
जाणत्यांना किंवा नेणत्याना आपापल्या आवडीप्रमाणे याचा लाभ घेता येतो. या साधकाना हा मंत्र म्हणजे एक-
प्रकारची भवसागर तरून जाणारी नौकाच आहे. भवसागर पार करणारा हा एक ताफाच आहे. भवनदी तरून
जाण्यास हे एक महत्त्वाचे साधन आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगाने, या कृपेच्या सागराने भव-
सागरातून तरून जाणाऱ्या तारूचेच, नावेचेच साहाय्य मला दिले आहे. ५
३७० घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविले संतीं विठोबासि ॥ १ ॥
लावूनिया हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ २ ॥
कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरे तीरीं उभा ॥ ३ ॥
खुंटले सायास अणिक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥ ४ ॥
तुज वाटे आतां ते करी अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- भार-ओझे, निरविले-स्वाधीन केले, सायास-श्रम/
अर्थ :- मी आतां या संतावर माझें ओझे घालून निश्चिन्त झालो आहे या संतांनी मला विठ्ठलाच्या
स्वाधीन केले १ या विठ्ठलाने मला जवळ घेऊन आपल्या हाताने माझा माथा कुरवाळिला; व काही चिंता करू
तु. गाथा. २३
नकोस असे मला सागितले. २ या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर आहेत, त्याची पावले एकसारखी असून अत्यंत
सुशोभित अशी आहेत. हा विठ्ठल भिवरा नदीच्या तीरावर आपल्या भक्तासाठी उभा आहे ३ देवा, आता या
जीयाकडून दुसरे कुठलेही प्रयत्न होणार नाहीत. केशवा, तुझेच पाय म्हणून मी धरिले आहेत ४ हे अनंता, आता
तुला जे वाटेल ते माझ्याविषयी कर. तुकाराम महाराज म्हणतात, या संतांनी मला तुझ्याकडे सोपविले असल्यामुळे
माझी लाज त्यांनाच आहे. ५
३७१ माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालो आतां ॥ १ ॥
तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ २ ॥
ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥ ३ ॥
जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हेचि आतां नाहीं लाज तुम्हां ॥ ४ ॥
तुका म्हणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- निर्धार-निश्चय, आणिका-दुसऱ्यास, ठायींचा-मूळचाच
अर्थ - आता माझ्या मनाचा निश्चय तुम्ही जाणून असा. मी आता माझ्या जियावर उदार झालो आहे १
देवा, आता मी तुझ्याशिवाय कोणाचाच आश्रय धरणार नाही. भीती, लाज, शंका याचा मी कधीच त्याग केला
आहे. २ देवा, तु व मी एवद्य असल्यामुळे तुझामाझा सबंध हा मूळचाच आहे; तोच या संतानी विशेषकरून
ध्यानात आणून दिला ३ आता मी माझा जीवभाव तुझ्याच पायावर ठेविला आहे पण याची तुला लाज आहे असे
कसे दिसत नाही ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी संतावर सर्वस्वी विश्वास ठेविल्यामुळे, आता विठ्ठला,
त्यांनी मला तुझ्या स्वाधीन केले आहे, मी तुझी पावले आता सोडणार नाही ५
विवरण.- तुकाराम महाराजांचे हे चार अभंग त्याच्या गुरुपदेशाचे म्हणून फारच प्रसिद्ध व महत्वाचे
आहेत अनेक महत्त्वाच्या बाबींचा स्पष्ट निर्देश यात आहे आपली गुरुपरंपरा, उपदेशाचा दिवस, गुरुमत्र
याचा उल्लेख केल्यानंतर तुकारामबुवानी हा आपला मार्ग अगदी सोपा, फार गुंतागुंत नसलेला असा दाखविलेला
आहे घरी असलेली विठ्ठलाची भक्तीच तुकोबांना गुरुपदेशातून मिळाली कृपेचा सागर जो पांडुरग तोच भवसागर
तरून जाण्यास नौकेच्या रूपाने मिळाला असा त्याच्या बोलण्यांतील भावार्थ होय याच मार्गांनी पूर्वीचे साधुसंत गेले
असल्याचाही उल्लेख 'जाती पुढे एक उतरले पार' या शब्दात आला आहे तोही महत्त्वाचा आहे
ज्याचा जसा अधिकार तशी सोय या मार्गात असल्याचीही ग्वाही महत्त्वाची आहे 'उतार सागडी तारे पेटी'
याच्या साहाय्याने भवसागर तरून जाण्याचे कार्य ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे व अनुकूलतेप्रमाणे करायचे असते
ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे या मार्गांनी चाल करणे 'सडे जे देखिले । ते ध्यानास लाविले । परिग्रही घातले
तरियावरी' म्हणजे जे ब्रह्मचारी, संन्यासी वगैरे सडे होते त्यांना योगमार्गाची दीक्षा दाखविली जाते व जे परिग्रही
म्हणजे बायकामुले व ससार याचे धनी होत, त्यांना नामाच्या नौकेवर घातले असा खुलासा श्रीज्ञानदेवांनीही केलेला
आहे ज्ञानेश्वरीत या साधनाचा समर्पक असा उल्लेख आलेला आहे काही जन 'ऐक्याधिया उतारा' घेऊन पैल
तीराला जातात कोणी देवप्रसादिचा सागडी' बरोबर घेऊन निघालेले असतात कोणी 'यजनक्रियेची पेटी ।
बाधोनि घातली पोटीं' असा अन्वंदेश मार्गास झालेले असतात, तर कोणी 'आत्मनिवेदनाचे तरांडे' (ताफे)
गळ्यास घेऊन भवसागराउन तरून जाण्याच्या तयारीत असतात तुकारामबुवानी ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील
सातव्या अध्यायातील या रूपकाची सांगड आपल्या विचाराशी घातलेली दिसते
परमार्थात श्रीगुरू हाच नेहमी तारणारा असल्याने साधुसंतानी आपल्या श्रीगुरूनाथाचा महिमा मोठ्या
प्रेमाने वर्णन केलेला आहे शिष्य आपल्या गुरूविषयी केवढे प्रेम दाखवितो ? तर 'सवाह्य आपुलें । जेणें गुरुपुढें
वोपिलें । आपण केलें । भक्तीचे घर ॥ गुरुगृह जये देशीं । तो देशुचिये मानसीं ।' अशा भाषेत ज्ञानेश्वरांनी
श्रीगुरूचे माहात्म्य वर्णन केले आहे सद्गुरुनाथ कसा असतो, काय करतो, यासबधी एकनाथानी म्हटले आहे,
' तरी तो कायेंवाचामनें । श्ांति कृपाळू दीवाकारणे । तोडी शिष्याचीं भयबंधनें । उठवी ठाणे अहंकाराचे ॥ जो
शब्दज्ञानें पारंगतु । ब्रह्मानंदें सदा डुल्लतु । शिष्य प्रबोधनों समर्थु । यथोचितु निजमायें । ' शिष्यप्रबोधन हे श्रीगुरूचे
महत्त्वाचे कार्य बाबाजी चैतन्यानी तुकारामबुवांच्या चित्ताचे प्रबोधन केले तुकारामबुवानी समकालीन भोंदू गुरूची
थट्टा केली आहे त्यांच्यासारख्या श्रेष्ठ सताला स्वत श्रीगुरू बाबाजी चैतन्य शोधीत आले हाही योग कमी
महत्त्वाचा नाही
३७२ देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥ १ ॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ २ ॥
देवाची जतन । तया बाधू न शके अग्न ॥ ३ ॥
तुका म्हणे हरी । प्रल्हादासि यत्न करी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जतन-जपणूक, यत्न-यतन, जतन, रक्षण
अर्थ - देव एकदा सोबती झाल्यावर, त्याची कृपा झाल्यावर सगळ्या जगाची आपल्यावर कृपा झाल्या-
सारखी असते १ असा अनुभव असूनही जीव उगाचच कासावीस होत असतात २ ज्याला देवाने सरक्षण दिले,
ज्याची जपणूक ईश्वराने केली त्याला प्रत्यक्ष अग्नीही काही करू शकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या
प्रल्हादासही आणीबाणीच्या संकटातून ईश्वरानेच साभाळले ४
विवरण - एकदा देवाने कृपा केली म्हणजे मग प्रत्यक्ष अग्नीसारख्या प्रखर पंचमहाभूताचाही त्रास होत
नाही हे सागताना बुवांनी प्रल्हादाचे एवच उदाहरण दिल आहे ते योग्यच आह प्रल्हाद हा हिरण्यकशिपु व कयाधू
याचा मुलगा हा मोठा विष्णुभक्त हाता याने वाढविलेले भक्तीचे स्ताभ त्याचे वडील हिरण्यकशिपुस न आवडल्या-
मुळे प्रल्हादाचा छळ करण्यास त्याच्या बापाने सुरुवात केली हत्तीच्या पायास बाधून तुडविणे, सर्प डसविने, वाघगी-
पाशाने बाधणे, शस्त्रप्रहार करणे, कडकड्यावरून लोटून देणे, अग्नीत टाकणे यासारख्या उपायानी प्रल्हादाचा छळ
झाला पण अत्यंत शात चित्ताने त्याने ता सहन केला व ईश्वराची भक्ती आणखी दृढ केली शेवटी ईश्वराने
नृसिंहाचा अवतार धारण करून प्रल्हादाच्या बापाचा वध केला याची विष्णुभक्ती श्रेष्ठ प्रकारची असून हा थोर
नृसिंहभक्त म्हणूनही प्रसिद्ध आहे
३७३ भले म्हणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥ १ ॥
ठसावितां यत्न लागती सायास । चुकतया घडे नास अल्प वर्म ॥ २ ॥
पाकसिद्धी लागे संचित आइते । घटता सोई ते तेव्हा गोड ॥ ३ ॥
तुका म्हणे बरे सांगताचि गोष्टी । रणभूमि दृष्टि न पडे तो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आइते-श्रम न करता मिळालेले, सायास-श्रम, नास-नाश, संचित-साहित्य
अर्थ - आम्ही संताचे सेवक आहोत असे म्हणताना बरे वाटते सतमाहात्म्याची आयती मिळालेली भीक
आपणास बरी वाटते १ पण त्याचा महिमा जनात ठसावना फार श्रम पडतात काही थोडे जरी चुकले तरी
संतत्वाचे मर्म नाहीसे होईल हेही ध्यानात हवे २ चांगल्या स्वयपाकाच्या प्राप्तीसाठी साधनसाहित्याची तयारी
आयती असेल सर उत्तम तरच सर्व स्वयंपाक गोड व रुचकर लागतो ३ युद्धाच्या वार्ता दूर राहूनच करावयास
गोड असतात प्रत्यक्ष रणक्षेत्र दृष्टीस पडले नाही तोपर्यंतच या वार्ता मनोरंजक असतात त्याप्रमाणे सतपणाच्या
गोड गोष्टी होत ४
३७४ संतसमागम एकांदिया परी । राहावे त्याचे द्वारीं¹ श्वानयाती ॥ १ ॥
तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचे ॥ २ ॥
१ घरीं
१८० सार्थ तुकारामगाथा
कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥ ३ ॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगतीं । घडेल पंगती संतांचिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- समागम-सहवास, परी-प्रकाराने, श्वानयाती-कुत्र्याची जात होऊन, कामारी-काम
करी, रंक-गरीब
अर्थ - संताचा सहवास अगदी हलक्या मार्गाने साधता आला, त्याच्या दारांत कुत्र्याच्या जातीचे होऊन
राहता आले तरी राहावे, १ कारण त्या ठिकाणी रामनामाचे श्रवण होईल व संताच्या भोजनानंतर उच्छिष्टाचे
सेवन करायला मिळेल २ तेथे कामकरी बटीक अशा गरीब वृत्तीनेही राहावे व संताची सेवा करावी. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, त्या संताच्या संगतीत सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील त्याच्या पंगतीत सुखमय असे भोजन
घडेल. ४
३७५ एकली राणागोविंदा सवे । गेले ठावें तें जाले ॥ १ ॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळो । नाही विषम जवळों आतळले ॥ २ ॥
नव्हती देखिली म्या वाट । म्हणोनि हा धीट सग केला ॥ ३ ॥
भेणे मिठी दिधली गळा । सेजे जवळ दडाले ॥ ४ ॥
सलगी धरो पयोधर । साहाती करमुर सवे ॥ ५ ॥
आहेव मी गर्भीणपणे । हे सांगणे का लागे ॥ ६ ॥
तुका म्हणे सेवटा नेले । सपादिले उभयता ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - शिंदळो-वाईट चालीची स्त्री, विषम-विरुद्ध, सग-सहवास, सोबत, भेनें-भयाने
करमुर-एक प्रकारचे शस्त्र, आहेव-सौभाग्यवती
अर्थ :-त्या गोविंदाबरोबर रानावनात मी एकटी गेले हे तुम्हांस कळले वाटते ? १ पण त्यासाठी मला
वाईट चालीची म्हणू नका असे मी पुन पुन सांगते हो मी त्याच्याजवळ गेले हो काही लोकविरुद्ध गोष्ट मी केली असे
नाही २ मी या रानाची वाट कदा पाहिली नव्हती, मला ती माहित नव्हती म्हणून धीटपणाने त्याची सोबत
घेतली ३ रानावनातील श्वापदाच्या भयात मी त्याच्या गळ्यास मिठी मारली, मी त्याच्या शेजेजवळ दडून
राहिले, म्हणून काय झाले ? ४ त्याने गमतीने, थट्टेत माझे स्तन धरले, पण मी मात्र त्याचे करणे एक प्रकारच्या
शस्त्राप्रमाणे मानले, सहन केले ५ मी गर्भिण असले तरी मनात संशय धरू नका तुम्ही मी सौभाग्यवती आहे
ना ? तुम्हास हे सब सांगावया हवे का ? ६ तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माहिती देऊन तिने उभयताचा
लौकिक वाढवून आपले काय शेवटास नेले ७
विवरण - येथून पुढच काही अभग शृंगारमिश्रित अशा भक्तित्मायनचे आहेत श्रीकृष्णाशी आलेला सबंध
गोळणीच्या वा गापांच्या निमित्तान रिता विविध प्रकारचा होता, त्यात किती नाजुक छटा होत्या, याचे मोठे मनोहर
वर्णन तुकारामबुवांनी विविध प्रकारात कल आहे वरवरचा भावा शृंगाराची व स्त्रीपुरुष प्रमाची, परंतु बोध
किंवा अनुभव मात्र आत्मानुसन्धानाथा, भक्ताचा असा हा प्रकार या अभंगाचा आहे माग अभंग क्र ७ वर विवरण
केले आहे त पाहाव
३७६ होते बहुत हे दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ॥
व्हावी भटी ते जाली गोविंदासीं । आता सेवा करीन निश्चयेंसीं वो ॥ १ ॥
स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथें आड मज न साहाये वारा । देउनि कपाट आले तें दुसरें वारा वो ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा १८१
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदीं वेगळें होऊं एक घडी ।
नाहीं लौकिक स्मरला आवडी । आतां येणे काळें या वो लोभें वेडी वो ॥ ३ ॥
उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चितीने निश्चितो सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साहे-मदत, सायासाची-प्रयत्नाने
अर्थ - या गोविंदाची भेट व्हावी असे माझ्या मनात फार दिवसापासून होते आज मात्र माझे सर्व नवस
फळास आले आहेत, पूर्ण झाले आहेत कारण आज त्या गोविंदाची व माझी भेट झाली आहे आता मी त्याची
जन्मभर सेवा करीत राहीन १ तुम्ही मात्र स्थिर राहून मला साह्य करा मी आजवर जन्ममृत्यूच्या फेरा घालून
खूप कष्ट सहन केले आता येथे मला दुजेपणाचा वारा सुद्धा सहन होत नाही मी आज दुजेपणाचे दार लावून आले
आहे दुजेपण आता दूर सारा २ मूळ स्वरूपाच्या सत्तेत असणारे हे स्थान मी मोठ्या प्रयत्नाने मिळविले आहे
आता त्याच्यापासून एक क्षणभरही मी दूर होणार नाही यासाठी मी लौकिकाचीहो फिकीर करणार नाही आता
यावेळो याचाच लोभ मला जडून मी त्याच्या नादाने वेडी झाले आहे हो ३ निजात्मबोधाच्या उदयाने माझाही
उदय झाला भी निश्चित झाले आहे याची गोडी फार लागल्यामुळे तिचाही आस्वाद फार घ्यायला आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, असा हा भाग्याचा दिवस मागितला तरी पुन दिसणार नाही ४
३७७ स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेंचि त्याचा जीव वो ॥ १ ॥
आपआपणांशीं करितो नवल । परि वादावाद न संडितो बोल ।
एका मेघशामें जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सलोल वो ॥ २ ॥
एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीने आवडी इतरीं ।
अंध बहिर हे प्रेतलोकाचारी । त्याची कीर्ति गाइली पुराणांतरीं वो ॥ ३ ॥
स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवों आदर ।
परस्परे हैं साबरा सादर । योग रञ्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥ ४ ॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐसे ठेवी उरी ।
दुरी जवळी सचिता एसे घरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥ ५ ॥
तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें योरलून ।
पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयीं चरण वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - नवलाव-नवल, जलधर-मेघ, पराविया-दुसऱ्याच्या
अर्थ - श्रीकृष्णप्राप्तीचा अनुभव असा स्वतःस आल्यानंतर त्या गोपी एकमेकींना तो मोठ्या प्रीतीने सांगू
लागल्या हा श्रीकृष्ण नाना रूपे घेऊन सर्वांनाच कसा मिळाला ? हे नवल कसे घडले हो ? तो सर्वसाक्षी जो
श्रीकृष्ण त्याच्याच ठिकाणी त्याचा जीव जडून राहिला १ मग त्या आपापसात नवल करू लागल्या त्यांच्या
विषयांच्या वादविवादात सुख असल्यामुळे त्या ते सोडीत नाहीत या एका मेघश्यामाच्या, कृपेच्या मेघाच्या ओलाव्यामुळे
त्यांचे हृदय प्रीतीने द्रवून गेले आहे २ त्या सर्व गोपींचा एकच विषय म्हणजे तो श्रीकृष्ण बनला आहे त्याच्या-
वरील प्रीतीमुळे त्यांना इतर वस्तूवरील प्रीती ध्यानात येते बाह्य लौकिकाविषयी या गोपिका अंध, बहिऱ्याच झाल्या
आहेत लोकाच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष नाही परंतु त्याची कीर्ती साऱ्या पुराणांनी गाइली आहे ३ आपल्या
आवडत्या व प्रीतीच्या माणसाची स्तुती कुणी दुसऱ्याने केली तर ती अधिक रुचकर लागते कारण आपल्या प्रीती-
पात्राचा गौरव त्यात असतो व त्याच गौरवाविषयी आवड आपल्या मनात निर्माण होते म्हणून या गोपी परस्परांशी
१८२ सार्थ तुकारामगाथा
मोठ्या आदराने श्रीकृष्णच्या गुणगानात तल्लीन झाल्या या सज्जनाच्या सहवासाच्या सुखास अंत नाही ४ या
भक्तीचे प्रेम चराचर सृष्टीत निर्माण झालेले असते ते कधी तुटत नाही त्याच्या ठिकाणी वापरभावही निर्माण
होत नाही, हा आप्त म्हणून जवळचा, हा दूरचा असा विचार तेथे नसतो त्याच्याजवळ किंवा त्याच्याहून दूर हे
ज्याच्या त्याच्या संचित कर्माप्रमाणे ठरते ज्याच्या त्याच्या मनात कर्माचा जसा रंग असेल तसा श्रीहरी त्याला जवळचा
व दूरचा वाटतो ५ या गोपींच्या व संताच्या उच्छिष्टाचे भोजन मात्र या तुकारामास मिळाले आहे आतबाहेरून
प्रेमाचा पूर ओसंडून आला आहे या गोपिकांची श्रीकृष्णस्तुती ज्याच्या कानी पडली त्या जीवाचे जतन आपोआपच
होते तुकाराम महाराजसुद्धा हे श्रीचरण हृदयाशी धरतात ६
३७८ आजि का यो तू दिससी दुश्चित्ती । म्हणी एका मन लगे तुझ्या चित्तीं ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरि चित्तीं वो ॥ १ ॥
सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायीं जाला खड वो ॥ २ ॥
होते तैसे ते उमटले वरी । बाह्य संपादणी अंतरीची चोरी ।
नाहीं मर्यादा निसंग' बावरी । मन हे गोविंदीं देह काम करी वो ॥ ३ ॥
नाहीं करीत उत्तर कोणासवे । पराधीन भोजन दिले खावे ।
नाही अचळ सांवरावा ठावे । देखो उदासीन तुज गे देहभावे वो ॥ ४ ॥
कोठें नेणो हा फावला एकांत । सदा किलकिल भोवती बहुत ।
दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥ ५ ॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भाउवी सासुसुना ।
परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हण ऐसे फळो यावे जना वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - दुश्चित्ती-उदास भांड-भांडखोर, अचळ-पदर, किलकिल-बिलबिल, गोंगाट, लाघव-
कौतुक
अर्थ - एक सासू आपल्या सुनेला म्हणत आहे आज तू मुली, अशी उदास का ग दिसत आहेस ? एका
कामात तुझे चित्त लागेल तर शपथ जी वस्तू ठेवून देतेस ते स्थान तू विसरून जातेस तुझ्या चित्तात काय त्या
श्रीहरीने ठाण दिले आहे काय न कळे १ दूर हो तू दूर हो तू पुरतीच भांडखोर व निर्लज्ज झालीस आता या जगास
तोंड कसे दाखवणार आहेस ? तुला जन्म देणारी तुझी आई रांडच म्हटली पाहिजे तिने रांडेलाही लाजविले आहे
तुला जन्म देऊन सासरमाहेर या दोन्ही बाजूचा तुझा संबंध तुटला ना २ तुझ्या मनात जे काळेबेरे होते तेच बाहेर
प्रकटले कितीही बाहेरची बतावणी केलीस तरी तुझ्या मनात जे चोरटपट होते ते प्रगट झालेच की तुला आता
काहीच मर्यादा नाही राहिली तू अगदी निसंग व बावरी बनली आहेस तू वरवर कामात देह राबवीत असलीस तरी
तुझ्या मनात त्या गोविंदाने कायमचे स्थान दिले आहे ३ तू धड कोणाशी बोलत नाहीस कुणाला उत्तर देत नाहीस
पराधीनासारखी वागतेस, कुणी भोजन दिले तरच घेतेस, अंगावरला पदर सावरावा हेही भान तुला उरत नाही
तुझा सारा देहभावच उदासीन होऊन गेलेला आहे ४ तसे पाहिले तर तुझ्या भोवती हा नेहमीच गजबजाट असतो
पण तुला कुठे एकांत मिळाला कुणास माहीत ! दोघांनी एकत्र राहून कसे व कुठ बोलणे केलेत हे कळत नाही
लाजलज्जा सोडून तू हरीच्या हातात हात दिलास तरी कसा ग ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे तो
श्रीकृष्ण कौतुकाने खेळ खेळतो सासूसुनांचे भांडण लावून कौतुक पाहतो तो परंतु ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती तुम्ही
जाणा सर्व लोकांनी ही भक्ती समजावून घ्यावी ६
१ निशंक
सार्थ तुकारामगाथा १८३
३७९ भरिला सांडूनि रिता करी घट । मीस पाण्याचे गोविदाची चट ।
चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥ १ ॥
चाळा लाविलेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें ।
दावो बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ २ ॥
मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार ।
उगा राहे कां मारिसी फंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥ ३ ॥
धरिली सोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मर्जी संगें ।
मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकीं पडिलीं तुझीं सोंगें रे ॥ ४ ॥
सुख अंतरींचें बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी ।
तुज मज काय सोयरीक ऐती । नंदनंदन या थोरपणें जाती रे ॥ ५ ॥
खरी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचें बाह्य रंग जाणा ।
मन भिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- उलंडूनि-सांडून, रिता-रिकामा, मीस-निमित्त, चट-सवय, फंकर-खडा
अर्थ :- श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा या गोपींच्या मनात पाहा किती आहे घरी पाण्याने भरलेला घट
त्यांनी सांडून दिला व पाणी भरण्याचे निमित्त करून त्या गोविंदाच्या दर्शनास चटावलेल्या गोपी नदीपलीकडे
निघाल्या श्रीकृष्णाकडे जाणारी वाट त्या झपाझपा चालू लागल्या आणि तो श्रीहरी आपलीच वाट पाहात आहे असे
त्यांनी पाहिले. १ अशा प्रकारे या श्रीकृष्णाने या गोपगोपिकांना चांगलेच छेडावून सोडले आहे त्यांना आपल्या
प्रीतीचे असे हे कृष्णरूपच जिथे तिथे दिसते. या गुणातीत श्रीकृष्णाने नाना वेष धारण करून हा खेळ मांडिला आहे. २
मनात जे आहे त्यास अनुसरून काही भाषण करावे त्याच्याशी, अशा आवडीच्या निमित्ताचा आधार घेऊन त्या म्हणू
लागल्या, 'कृष्णा, उगी रहा ना ! उगाच खडा का मारतोस ? माझ्याशी बोलणे वाढवून का उत्तर देतोस ? ३ अशी
ही पायीट सोड तू टाकून दे ना ही तुझी थट्टा माझ्यापाशी नाही चालणार. मी आपला जीव सोडून तुला मिठी देईन
तुझे असली सोंगे मला चांगलीच माहीत पडली रे.' ४ अशा प्रकारे या गोपींच्या हृदयात साठवलेले श्रीकृष्ण-
प्रीतीचे सुख बाहेर प्रगटून येते. त्या म्हणतात, 'असा या विनोदाचा अभिप्राय तू आमच्याशी का करतोस ? अशा
ऐट्रीचे तुझे व आमचे नाते तरी आहे का ? तू नंदाच्या थोरपणावर जाऊ नकोस तू श्रीमंताचा पोर म्हणून ऐट दाखवू
नकोस.' ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण काय रूप धरील ते कुणासही समजून देत नाही या गोपींच्या
बाह्य आचरणाचे रंग विविध प्रकारांचे असले तरी त्यांच्या मनातील सुख मात्र मोठेच आहे. या गोपींचे मन श्री-
कृष्णाच्या मनाशी मिळून गेले आहे त्यामुळे या गोपींचे सर्व भोग त्या श्रीकृष्णालाच प्राप्त होतात ६
३८० आजि नवल मीं आलें येणें राजें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।
गोठी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आगियेले तेणें वो ॥ १ ॥
गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जबळी दुजें नाहीं ।
अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ २ ॥
बहुत कामें मज नाहीं आरावूक । एक सारितां तों पुढें उभें एक ।
आजि मी टाकोनि आले सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥ ३ ॥
चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां' दोघेजणें ।
सुखें निर्भरे जालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणे जाणें वो ॥ ४ ॥
१ जाता
१८४ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा : - गोवी- गुतागुल, साव घालणे-हाक मारणे, गुमान-गुप्त, आराधूक-सौख्य, निर्भर-
पूर्ण, विश्वाती, सुटले-सपले
अर्थ : - आज फारच नवल झाले, कारण मी या रानात आले व गोविंदाची अवचितपणे भेट झाली हो
सर्व माणसे या भेटीविषयी फार गुतागुत सागत असत; पण हा नदाचा कान्हा माझ्या पूर्व पुण्याईने आज मला भेटला
हो १ आता जे व्हावचे ते होऊन गेले आता दुसरा काही उपायच उरला नाही बरे, त्यावेळी कुणास तरी हाक
मारावी तर कुणी दुसरे तिथे नव्हतेच मग तो श्रीकृष्ण माझ्या अगाशी जडला मग आता काय उरले? आता बाई
सर्व गुप्तपणे ठेवावे, पुणास काही सांगू नये हेच खरे २ आतापर्यंत मला पुष्कळ कामे होती, एक संपले, की दुसरे
उपस्थित होई मला कशी ती विश्वाती नव्हती पण आज मात्र मी ती सर्व कामे सोडली व येथे आले तो त्या
श्रीकृष्णाने येथे आणलीनच एक नवे कौतुक रचले पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी चिंता ती गोपी
करीत असतानाच तो नारायणाने दूर केली दोघाची अगे एकमेकास मिळाल्यावर दोघानाही सपूर्ण सुख झाले व
त्यामुळे पुन जन्मास येणे जाणे सपले ४
३८१ मैं भुली घरजानी वाट । गोरस बेचन आयै हाट ॥ १ ॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरू देखै गोपाल ॥ २ ॥
फाहा पग डारू देख आनेरा । देखें तो सब थोहिने घेरा ॥ ३ ॥
हुं तो यकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा : - मैं-मी, भुली-विसरले, हाट-बाजार, पग-पाऊल
अर्थ - एक गोपी म्हणत आहे, मी या बाजारात गाईचे दूध विकण्यासाठी आले होते पण आता परत
जाताना घराची वाटच विसरून गेले आहे १ या मनमोहन कन्हैयाने, लालाने माझे चित्त हरण केले या गोपा-
ळाच्या नादात मी सर्व विसरून गेले २ मी आता पाऊल तरी कुठे टाकू ? जिकडे तिकडे त्याच्या रूपाने मला
घेरले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लाघव पाहून ती गोपी चकित होऊन गेली. तिच्या मनातील
सर्व प्रकारची भीती नष्ट झाली ४
विवरण - येथून पुढचे दोन व हा एक असे तीन अभग मराठी भाषेतील नाहीत ते हिंदी भाषेतील आहेत.
मराठी सतार्नी हिंदी भाषेत फार मोठी रचना केलेली आहे राम व कृष्ण ही दोन प्रधान दैवते उत्तर हिंदुस्थानातील
गगा, यमुना हिमालय द्वारका, मथुरा, वृन्दावन काशी, पुरी ही प्रमुख तीर्थस्थाने उत्तरेसच तेव्हा पूर्वीपासून यात्रेच्या
निमित्तान उत्तर हिंदुस्थानात सारखी येजा असे नामदेव दोन वेळा उत्तरेत पजाबापर्यंत गेले होते पहिल्या खेपेस
त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरादिकाच सतसमळही होते एकनाथस्वामीनीही काशीयात्रा केलेली होती रामदास तर साऱ्या
भारतात बारा वर्षापर्यंत भ्रमण करीत होते लोकस्थिती डोळसपणे पाहात होते उत्तरेचे साधुसतही दक्षिणेकडे
रामेश्वरापर्यंत येत असत याच्या वैचारिक देवाण घेवाणीची भाषा अर्थातच सस्कृत किंवा हिंदी असावी श्रीकृष्णाच्या,
श्रीरामाच्या भक्तिभावाने त एकत्र बाघले गेले होते सर्व भारतीय माधुसताची निष्ठा एक आहे अनुभूती एक आहे
भक्तिमार्गाची चाल एक आहे भाषेचा, धर्माचा जातीचा विचार बाजून राहून या साधुसताच्या प्रचारकार्यात एक
परमेश्वराची जवळीक हेच नान दृढ होते कबीर, तुलसीदास, सूरदास, थी चैतन्यदेव नरसीमेहता त्यागराज, पुरदरदास
इत्यादी सतकवी श्रीकृष्ण, श्रीराम थोविठ्ठल याच्या प्रेमाने बद्ध झालेले असल्यामुळे त्याची अनुभूती समान होती
मराठी संतानी हिंदी भाषेत वचने कशासाठी केली ? हिंदी भाषाच जाणणाराची सोय त्यात किती होती
याविषयी तक करण कठिन आहे पण एक अदाज असा की सूरदास नददास, मीराबाई इत्यादी कृष्णभक्त कवीनी
व सतानी हिंदी भाषेतून अवीटपणे श्रीकृष्णाचे स्तवन केले आहे त्याच्या लीला गाइल्या आहेत हिंदी, विशेपत
ब्रजभाषा ही जणू कृष्णलीला गाण्यासाठीचे तयार झाली अनेक साधुसंताच्या व कृष्णलीलाच्या सहवासाने
पवित्र बनलेली ही भाषा याच प्रेमापोटी एकदा वापरून पाहण्याची इच्छा मगाठी संताना व्हावी हे साहजिकच आहे
या एका वृत्तीतून मराठी सताच्या हिंदी भाषेतील कृष्णलीलाकडे पाहाण्यासारखे आह
सार्थ तुकारामगाथा १८५
३८२ हरिविन रहिया न जाये जिहिरा । कबकी पाडी देखें राहा ॥ १ ॥
क्या मेरे लाल¹ कवन चुकी भई । क्या मोहिपासितो बेर लगाई ॥ २ ॥
कोई सखी हरी जावे बुलावन । वार हि डारू उसपर तन ॥ ३ ॥
तुका प्रभु कब देखें पाऊ । पासीं आऊ फेर न जाऊ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जिहिरा-प्राण, पाडी-वाट, बेर-वेळ, तन-शरीर
अर्थ - या श्रीहरीशिवाय माझा आता प्राण राहाणार नाही मी किती तरी वेळ झाला त्याची वाट पाहात
उभी आहे १ माझ्या लाला, कृष्णा माझ्या हातून काही चूक झाली का रे ? माझ्याकडे येण्यास एवढा वेळ तरी
का केलास ? २ कुणी एखादी सखी या श्रीहरीला बोलावणारी भेटेल तर मी तिच्यावरून जीव ओवाळून
टाकीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, या प्रभूची पायने मी कधी बरे पाहीन ? एवढा त्याच्यापाशी पोचल्यावर
मग मी परत फिरणार नाही ४
३८३ भलो नदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥ १ ॥
आगळ आवो² देवजी कान्हा । में घरछोडी³ आहे म्हागा ॥ २ ॥
उनसु कळना⁴ नव्हे तो भला । खसम अहकार दादुला ॥ ३ ॥
तुकाप्रभु परबल⁵ हरी । छपी आहे हु जगायी न्यारी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -डिकरो-मुलगा, आगळ-पुढे, खसम-कंठव, रागाट परवल-बलवान
अर्थ - ह्या नंदराजाचा मुलगा फार चांगला आहे कारण त्यानेच माझी लाज राखली आहे १ नदाच्या
कृष्णा, जरा पुढे ये ना तुझ्यासाठी मी घर सोडून भेटण्यासाठी आले आहे २ माझा अहंकाररूपी पती फार रागीट
आहे, त्यास कळता कामा नये नाही तर तो फार रागवेल ३ तुकाराम महाराज म्हणतात हा प्रभू फार बलवान
आहे याच्या मागेच मी या जगापासून वेगळी होऊन लपली आहे ४
३८४ नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करुं⁶ न साहती बहु होतो उवारा ।
मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा⁷ ॥ १ ॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगीं यो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ २ ॥
नये कळों नेदावी हे दुजियांसि मात । घडाया तयासी उत्कंठा एकांत ।
एकाएकीं साक्षों येयें आपुले चित्त । कोण्या काळें होईल नेणो भाग्य उदित वो ॥ ३ ॥
स्वाद सोण देहभान निद्रा खटन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।
अवघे वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आले जीवन ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उवारा-उष्णता वेशिया-आधार
अर्थ - श्रीकृष्णाच्या विरहाने तापलेली एक विरहिणी आपल्या मैत्रिणीस म्हणत आहे माझ्या शरीराला
काही शीतोपचार करू नका मैत्रिणींनो तुमचे उपचार काही मला आता सहन होत नाहीत त्यांच्यामुळे फारच
उष्णता वाढत आहे माझा रोग माझ्या मनास झालेला आहे त्याचे दुख मनास होणारे आहे एकच उपाय करता
येण्यासारखा आहे तो करा त्या नदाच्या कुमाराला लौकर आणा बर १ अग सख्यानो, मैत्रिणींनो, तुम्हीच मला
अशा प्रसंगी मोठा आधार आहात म्हणून माझ्या मनातील हा सर्व भाव मी तुम्हांस सांगितला हो त्या श्रीकृष्णाचा
वेध माझ्याकडे पाहा किती आहे त्याची सावळी प्रभा माझ्या अंगात उमटून आली आहे ही सब स्थिती खरीच
१ जाउ २ आवे ३ मे घर छाडी आहे म्हागा ४ उन्हम् कळना वेतो भला ५ परबली ६ न साहवे
मज बहु होतो उवारा ७ कुमारा वो ८ भावना वो
तु गाथा २४
१८६ सार्थ तुकारामगाथा
आहे, हे माझ्या या अवस्थेवरून समजेल तुम्हांस. २ माझ्या मनाची ही अवस्था पुन्हा दुसऱ्यास सांगू नका बरं. त्या
श्रीहरीशी एकान्त घडावा अशीच मनात उत्कट इच्छा आहे. यात आपले एकट्याचेच चित्त साक्षीत असावे. अहो
भाग्य माझे केव्हा उदयास येईल ग ? ३ रुची, शोष, देहभान, निद्रा याचा नाश होऊन तटस्थ अशी अवस्था केव्हा
प्राप्त होईल ? डोळे अर्धोन्मीलित कधी होतील ? सर्व काही नाहीसे होऊन त्या श्रीहरीचेच चरण मला केव्हा
दिसतील बरे ?' तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवालाच जगवणाऱ्या त्या देवाचे दर्शन मला झाले. ४
३८५ पडिली भुली धांवतें संराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।
मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवूनि ललाट वो ॥ १ ॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें १ वहिले लपाला आतां खांदीं ॥
कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ २ ॥
मागें बहुताचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणे केला त्याग ।
पहिलें २ पाहतां ते हरपलें अंग । खुंटली वाट नाहीसे जाले जग वो ॥ ३ ॥
शोकें वियोगें घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।
केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- भुली-मोह, भ्रम संराट-स्वैरतेने, चोजविते-शोधिने, शुद्धी-शोध, वहिले-सत्वर
अर्थ :-त्या श्रीकृष्णच्या नादाची भूल मला पडली आहे. मोह निर्माण झाला आहे. त्या गोविंदाचाच एक छंद
मला लागला असून मी त्याचीच वाट शोधीत आहे. लोक काय म्हणतात हे सर्व सोडून मी त्याच्या चरणावर डोके
ठेवून त्यास वंदन करीत आहे १ त्या गोविंदाचा शोध कोणी तरी करील काय ? हा सत्वर कुठे तरी झाडांच्या फांदी-
मागे लपला काय ? का माझीच देहबुद्धी कुठे आड आली म्हणून तो मला दिसत नाही काय ? त्या करुणेच्या सागराला,
कृपेच्या निधीला आळवून कुणी तरी बोलवा हो २ या कृष्णाच्यासाठी मी मागील सर्व संबंधियांचा संग सोडला;
आणि हा सख्य ज्याच्यासाठी सोडला तोही मला सोडून गेला ना. पुढे त्याची मूर्ती मला आता दिसेना व मागच्या
जगाचीही वाट खुंटल्यासारखीच झाली की हो ३ त्या गोपींचा घोर वियोगमुळे फार झाला. सगळ्यांना त्या
प्रभूचा वियोग घडला. मग त्या श्रीहरीला शरण गेल्या आम्ही फार अन्याय केला असे म्हणू लागल्या. हातून घडलेल्या
दोषांचा त्यांनी उच्चार केला आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी प्रकट झाला ४
३८६ काय उणे का करितोसि चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परपरता ३ तूं पळोनि जाशी दुरी । अनावर या लटिकिया बाहेरी वो ॥ १ ॥
माया करणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे ४ आघात ।
न पुरे अवसरु हेचि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त वो ॥ २ ॥
बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी ।
करितां लाग न येसीच पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥ ३ ॥
तुज म्हणीयें मी न सगँ अनंता । नको जाऊं या डोळियां परता ।
न लगे जोडी हे तुजयिण आतां । तुक्यास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- परपरता-परा वाचेच्या पलीकडील
अर्थ :- श्रीकृष्णाच्या विविध खोड्या पाहून त्याची आई यशोदा त्याला एकदा म्हणाली, 'कृष्णा, अरे,
आपल्या घरी काय कमी आहे रे ? म्हणून तू दुसऱ्याच्या घरी जाऊन चोऱ्या करतोस ? तुला सांगावे तरी किती रे •
१ होते वाईले लपाले. २ पैल ३ परे परता ४ जगाचे
सार्थ तुकारामगाथा १८७
हरी ? तू काही माझे ऐकत नाहीस. तुला सांगावे तरी कसे ? कारण तू परा वाचेच्याही पलीकडे पळून जातोस
मोठाच अनावर तू झाला आहेस. लौकिका वेगळा होऊन वसला आहेस' १ अशी ही कृष्णाची आई मोठ्या करुण
वाणीने म्हणत आहे, 'मी आता किती लोकांचे आघात तुझ्यामुळे सोसू रे ? मला इतर कामांस वेळच मिळत नाही,
रोज हीच कटकट वाढत आहे. कृष्णा, तूच शांतचित्ताने यातून मला सोडीव रे बाबा. २ घरी पुष्कळ कामे असून
त्यांत मी गुंतून राहिलेले आहे; आणि तू डोळा चुकवून बाहेर जातोस. काही केल्या तू क्षणभरसुद्धा परत येत नाहीस.
तुला पकडण्यासाठी काही प्रयत्न करावेत असे उरलेच नाहीत ३ अनंता, याता यापुढे मी तुला पुन काही कामे
सांगणार नाही. पण तू आता माझ्या डोळयापुढून जाऊ नकोस दूर. तुझ्याशिवाय मला आता दुसऱ्या कोणाचीही
प्राप्ती नको आहे.' तुकाराम महाराज म्हणतात, हा तुकयाचा स्वामी कान्होबा असा गुणसंपन्न आहे. ४
३८७ घाली कवाड ढळली वाड राती । कामे व्यापिली कां पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवंचे हातीं । आजी शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥ १ ॥
बोले ऋतिकेशीं राधा हें वचन । मशों लाघव दाववी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज *पूर्ण वो ॥ २ ॥
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । ते पाचारिलें होउनि ये वो सीता ।
लाजिनली रूप न ये पालटिता । झाला सोमकने आपण रामें रीता वो ॥ ३ ॥
सत्यभामा दान करी नारदासी । तें कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालितां न ये कनक वो राशी । सम तुके एक पान तुळसी वो ॥ ४ ॥
मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रह्मचारी ।
दिली वाट यमुने माये खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरो वो ॥ ५ ॥
जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भावचि कारण वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कवाड-दार, वाड-मोठी, संबोखिली-समजूत काढली.
अर्थ : - 'फार रात्र झाली आहे. आता दार लाव. या राधेचे हृदय श्रीकृष्णाच्या विरहाने व्यापून जाऊन
ती उदास झाली आहे हा पुन्हा सुदैवी स्त्रीच्या हाती सापडला की काय ग ? आज माझी शेज तर पतीशिवाय शून्य
दिसत आहे !' अशा प्रकारचे वचनही राधा आपल्या सखीजवळ बोलत आहे; ती म्हणते, 'हा नारायण मोठे कौतुक
मला दाखवितो. हा मनाचा मोठा कोमळ आहे ग; पण फार निर्गुण, अवगुणी बरं. मी याला त्याच्याशी बोलणारच
नाही. तो संपूर्णपणे मला समजला आहे. २ द्वारकेस असताना श्रीहरीने गरुडास पाठवून हनुमंताला बोलावून
आणले; व स्वतः श्रीहरी रामरूप झाले व सत्यभामेस सीता होऊन तू ये असे त्यांनी सांगितले. पण सत्यभामेस आपले
रूप एकदम पालटून सीता होता येईना तेव्हा तो फार लाजली तेव्हा मग रुक्मिणी सीता झाली व हा स्वतः राम
झाला. ३ सत्यभामेने नारदास या श्रीहरीचे दान केले तेव्हाच तो कसा आहे हे मला समजले. श्रीकृष्णाची तुला
करण्यासाठी सत्यभामेने आपल्या दागिन्यांच्या सर्व राशींच्या राशी घातल्या तरी त्याची तुलना होईना, मग रुक्मि-
णीने एक तुळशीचे पान टाकल्या बरोबर तुला पुरी झाली. ४ मला कसा विसर पडला, कुणास माहीत ? आम्हांस
भोगून हा मी ब्रह्मचारी आहे असेच म्हणाला होता त्या वेळेस हे वाक्य म्हटल्याबरोबर यमुनेने वाट दिली. अजूनपर्यंत
तुम्हाआम्हात याची थोरवी समजलीच नाही. ५ हा नारायण श्रीहरी सर्व जीवांचे विचार जाणतो. कारण तो सर्वत्र
व्यापून राहिलेला असून तो लपून राहिला असल्यामुळे दिसत नाही एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात, राधेची स्वतः
विषयीची प्रीती जाणून त्याने तिला आलिंगन देऊन तिची समजूत काढली कारण भावभक्तीनेच हा प्रभू सर्वांनाच
प्राप्त होतो. ६
१८८ सार्थ तुकारामगाथा
३८८ मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं ।
दहि दुध तुप लोणी शिया मुरे काहीं ।
मेळवुनी पोरे तेथें रिघे एकसरें ।
बेगी आणोनी सामोरे तेथें लोणी खाय ॥ १ ॥
हरि सोकला वो हरि सोकला वो ।
सोकला तो वारी¹ तुज लाज नाहीं तरी ।
आम्हा सापडता उरी तुज मज नाहीं ॥ २ ॥
तुज वाटते कोड² यासि लागतसे गोड ।
काय हासतेसी वेड तुज लागले वो ।
आम्ही जाऊ तुजवरी पोरे चाळविल्या पोरी ।
काय सागो भाडखोरी लाज वाटे आम्हा ॥ ३ ॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे ।
तब दसवती म्हणे आणा शीक लावू ।
चोर आणिला काटाळा घरी दारी लोकपाळी ।
डेरा रिघोनि मुसळा तेथें लोणी खाय ॥ ४ ॥
मिळोनि सकळा दाये लावूानया गळा ।
कैसा बांधिती उखळा येथें राहे उगा ।
बरा सापडलासी हरी आजिच्याने करिसिल चोरी ।
डोळे घालुनिया येरी येरीकडे हासे ॥ ५ ॥
फाकल्या सकळा उपडोनिया उखळा ।
मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही ।
उठिला गजर दसवती नव्हे घोर ।
धावे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - रिघे-शिरतो एकसरे-एकदम, वारी-आवर कोड-कौतुक हाथचियाचे-गळयाखालचा
खळगा, घोणे-माना खाला घालून बसण
अर्थ - साऱ्या गौळणी मिळून श्रीकृष्णाच्या खोड्याबद्दल यशोदा मातेजवळ गाऱ्हाणी सांगू लागल्या त्या
म्हणू लागल्या की, आमच्या घरी शिक्यावर दही, दूध लोणी तूप यापैकी तुझा मुलगा खोडरी काहीच उरू देत नाही
: गावातील पोरे तो जमवितो व घरात एकदम शिरून शिक्यावरील लोणी आम्ह्यासमोर खातो १ हा तुझा हरी असा
धीटपणा करून लोणी खायला सोकावला आहे तू त्याला आवर बाई, नाही तर तुलाही लाज नाही असे मानू आम्ही,
मग तो आमच्या हातात सापडला तर मात्र मग तुझे आमचे नाते विसरून आम्हीच त्याला शिक्षा करू २ तुला या
तुझ्या मुलाचे भारी कौतुक वाटते व त्यालाही ते मोठे गोड वाटते तू हसतेस काय ग? तुला काय वेडबीड लागले की
काय ? आम्ही आपल्या तुझ्या मोठेपणामुळे याच्याकडे दुलक्ष करतो, पण या तुझ्या मुलाने आमच्या मुलींना नादी
लाविले आहे भाडखोर बाई, तुला काय सांगू ? आम्हाला भारीच लाज आता याच्यामुळे वाटू लागली आहे ३
त्यावेळी जवळच श्रीकृष्ण म्लान मुख करून मान खाली घालून उभा होता त्यावर यशोदा माता म्हणाली, 'त्याला
१ वरी २ कोडें