सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 203, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 203

सार्थ तुकारामगाथा १६१
कसे लाभले ? जन्मतःच पाचव्या सहाव्या दिवशी याला सटवीच्या किंवा सटवाईच्या फेऱ्याची बाधा कशी झाली
नाही ? ४
३५२ गर्भाचे धारण । तिने वागविला सिण ॥ १ ॥
व्याली कुल्हाडीचा दांडा । वर न घालीच धोंडा ॥ २ ॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सिण-त्रास, काळ-यम, माय-आई
अर्थ - असा जो अभक्त त्याच्या गर्भधारणेने आईस शीण मात्र व्यर्थ झाला १ आपल्याच गोतास काळ
होणारा कुऱ्हाडीचा दांडा तो जणु व्याली उपजतच तिने त्याच्या मुखावर धोंडा घालून त्यास मारून का नाही
टाकले ? २ हा तिच्या पोटी जणु प्रत्यक्ष यमच जन्मास आला व त्याने सर्व कुळास बट्टा लाविला ३ तुकाराम
महाराज म्हणतात, अशा या दुष्ट अभक्ताची आई नरकास जाते ४
३५३ पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥ १ ॥
विधीपुरतें कारण । बहु वारावे वचन ॥ २ ॥
सर्वस्वाप्ति नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥ ३ ॥
तुका म्हणे दुरी । राखता हे तोची बरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वारावे-दूर करावे, नाडी-आड येते, फसचित
अर्थ - जो स्त्री आपल्या पतीस पतनाकडेच नेत असते तिचा स्नेह किंवा तिचे प्रेम या सर्व गोष्टी खोट्याच
समजाय्यात १ केवळ शास्त्रविधीपुरताच तिच्याशी सबंध ठेवावा तिच्याशी फार बोलणे दूर करावे, फार बोलू नये
तिच्याशी २ ती सर्वस्वाच्या आड येणारी, फसविणारी असून लाघवाची, गोड गोड बोलाची ती एक येडीच
असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही स्त्री जितकी दूर ठेवता येईल तितकी बरी त्यातच आपले
सुख आहे ४
३५४ देव आड जाला । तो भोगिता मी उगला ।
अवघा निवारला । शीण शुभाशुभाचा ॥ १ ॥
जीवशिवाचे भातुके । केले क्रीडाया¹ कौतुके ।
फेचीं येथें लोके । हा आभास अनित्य ॥ २ ॥
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग ।
वाटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥ ३ ॥
अवघी एकाचीच वीण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न ।
वेदपुरुष नारायण । तेणे केला नियाडा ॥ ४ ॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस ।
पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा² ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - उगला-उगाच, भातुकें-भातुकलीचा खेळ, लाग-सबध; सौरस-गोडी
अर्थ - आता आमच्यासमोर देव उभा राहून आड आला व तोच सर्व भोगत असून मी मात्र उगाच उभा
आहे सर्व शुभाशुभ कर्माचा शीण जो अवघा होता तो त्याने स्वतःकडे भोक्तृत्व घेऊन दूर केला १ केवळ क्रीडा
१ होत कवतुकें, २ निरोपी
तु गाथा २१