सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 67, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 67

सार्थ तुकारामगाथा ४१
९० तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोध तैसेचि खळ ॥ १ ॥
का रे सिणलासी बाउगा । न भजता पाडुरंगा ॥ २ ॥
मानदंभासाठीं १। केली अक्षराची आटी ॥ ३ ॥
तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥ ४ ॥
वाटिलें तें धन । केली अहंता जतन ॥ ५ ॥
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- खळ-दुष्ट, बाउगा-व्यर्थ, आटी-सायास, वर्म-मुख्य गोष्ट
अर्थ :- वरवर कर्मे करणाऱ्या पण अंतरंगात ईश्वरप्रेम नसणाऱ्यांना उद्देशून बुवा म्हणतात, मोठमोठे
यज्ञयाग करून अग्नीत तीळ व तांदूळ यांच्या आहुती दिल्या, त्याचा काय उपयोग ? काम, क्रोध हे दुष्ट विकार
असेच्या तसेच राहिले ना ! १ पांडुरंगाला न भजता उगाच श्रम व्यर्थ का करता ? २ केवळ मानसन्मान
मिळावा, कीर्ती वाढावी म्हणूनच ना अक्षरांची घोकपट्टी केली, पांडित्याचा धडेबाज माजविला ? ३ तपश्चर्या केली,
तीर्थयात्रा केली यामुळे फक्त अभिमान तेवढा वाढला. ४ पुष्कळ दानधर्म करण्यासाठी धन वाटले, पण यातही मी
दानधर्म केला ही अहंता उरलीच ५ तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगास स्मरण्याचे मुख्य रहस्यच न समजल्यामुळे
या बाह्य कर्मकांडाने अधर्म मात्र घडला ६
विवरण - परमेश्वराचे स्मरण, नामसंकीर्तन, भजन, विठ्ठलभक्ती ही साधी साधन सोडून यागसाधना,
शरीरकष्ट, तीर्थयात्रा, उपासतापास, दानधर्म वगैरेंच्या चक्रात सापडणाऱ्या लोकांना सावध करण्याचे काम
तुकारामांनी अनेक अभंगातून केले आहे या वरवरच्या गोष्टीत विठ्ठलस्मरण नसेल तर वृथा अहंकार मात्र येऊन
अधर्म घडतो ईश्वरासाठी घर सोडून जावे लागत नाही, प्रपंचाचा त्याग करावा अस नाही मोठमोठी यज्ञकर्मे
करून काही साधण्याचीही जरूरी नाही 'न लगे सायास जाणे वनान्तरा । सुखें येतो घरां नारायण' अशी संतांची
शिकवण आहे नामसंकीर्तन हे अतिशय सोपे असे साधन सांगितले आहे तीर्थयात्रानी व व्रतवैकल्यानी काय होणार?
वृथा अभिमान मात्र वाढणार त्या ऐवजी 'तीर्थांचे जें मूळ वतावे जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये' आहे तेच
जाणून घ्यावे असे संताना वाटते 'तीर्थे केलीं कोटिवरी । नाहीं देखिली पंढरी' तर सर्व व्यर्थ आहे असेच
बुवाना म्हणावयाचे आहे
९१ भवसारतापें तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुबाची ॥ १ ॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ २ ॥
बहुता जन्मींचा जालो भारवाही । सुटिजें हें नाहीं वर्म ठावे ॥ ३ ॥
वेढियेलो चोरों अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करो कोणी माझी ॥ ४ ॥
बहु पागविलो बहु नागविलों । बहु दिवस जालो फासाविस ॥ ५ ॥
तुका म्हणे आता धाव घालीं वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - भवसारतापें-संसारातील त्रासामुळे, भारवाही-ओझे वाहणारा, सुटिजें हें-ज्या योगानें
सुटाव असे, अंतर्बाह्यात्कारी-आतून, बाहून, कणव-दया, पागविलों-दुबळा, पंगू केला गेलो, वेगीं-लवकर,
दीननाथा-गरिवाच्या नाथा
अर्थ - स्वतःच्या परिस्थितीचे सत्य निवेदन करणारा हा एक तुकारामबुवाचा श्रेष्ठ असा अभंग आर्त्त
हाकेने भारावलेला असा आहे यात ते म्हणतात, देवा, मी या माझ्या संसारातील त्रासांमुळे त्रासून गेलो आहे या
कुटुंबियांची सेवा करता करता मी देवा, थकून गेलो आहे १ म्हणून देवा, तुझे पाय आठवले आहेत, म्हणून तुझें
१ मान धन पोटासाठी
तु गा ६