सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 66, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंदिला आहे. सर्वांची प्रवृत्ति सुखासाठीं असते हें स्पष्ट आहे. पण सुख म्हणजे काय ? जे आपणास इष्ट वाटते ते सुख
व ज्याचा द्वेष वाटतो तें दुःख' (यदिएं तत्सुखं प्राहुः द्वेष्यं दुःखमिहेष्यते) अशी सुटसुटीत व्याख्या महाभारत-
कारानी केली आहे, परंतु येथेही इष्ट कशास म्हणावे, अनिष्ट कशास म्हणावे असा प्रश्न निर्माण होतोच नैयायिकानी
'अनुकूलवेदनीयं सुखम्' 'प्रतिकूलवेदनीयं दुःखम्' अनुकूल वेदना सुख व प्रतिकूल दुःख अशी परिभाषा
वापरली आहे
परंतु प्रतिकूल वेदना घालवून अनुकूल वेदना कशी संपादावी हेच भक्तिमार्गाच मुख्य रहस्य आहे. संसार
मूळचाच दुःखमय असला तरी प्रभुकृपेच्या साहाय्याने त्याचे गोड रूप आनंदमय व सुखमय कस करायचे हे सतपुरुष
शिकवितात या संसारात सुखाचा विचार वरवर तर कुठेच नाही 'सुख नाहीं कोठें आल्या संसारां' असाच
अनुभव तुकारामबुवा इतरत्रही सांगतात मग हे सुख आहे तरी कोठे ? तुकारामानी याचे उत्तर दिले आहे,
'सुख पंढरिये आलें । पुंडलिका साठविले,' 'सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुशिया नामें', 'सुखरूप ऐसे कोण
दुजें सांगा । माझ्या या पांडुरंगासारिखें,' । 'सुख वाटें तुझें वर्णिता पवाडे,' 'सुख वाटे याचि ठायां । बहु पायीं
संतांचे', 'हेचि सर्वसुख जपावा विठ्ठल' अशा अनेक वचनातून श्रीविठ्ठल व त्याचे संत सज्जन यांच्याशिवाय दुसरीकडे
सुख कधीन मिळणार नाही असे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले आहे ज्ञानेश्वरानीसुद्धा 'सर्व सुखाचे आगर ।
बापरखुमादेवीवर' असेच म्हटले आहे
तेव्हा हे अलौकिक व शाश्वतच सुख मिळविण्यासाठी संतांची संगती हवी आणि ही केव्हा तरी वय
झाल्यावर करावी असे नव्हे ईश्वराची भक्ती व संतसंगत याची जरूरी सुरुवातीपासूनच आहे कारण आपले
आयुष्य नकळत कमी होत असते, आणि पुढे पुढे इंद्रियाची कार्यशक्तीही मंदावते आपल्या आयुष्याचा सहसा लक्षात न
येणारा हिशेब बुवानी या अभंगात दिला आहे माणसाचे शंभर वर्षे आयुष्य मानले तर त्यातली निम्मी वर्षे रात्रीच्या
झापण्यात जातात व बाळपण तारुण्य, जराच्याधी व्यसने यातही बरीच वर्षे जातात या सर्व गोष्टीचा विचार
करून आपण सावध असावयास हवे मानवी आयुष्याचा असा हिशोब आपल्या प्राचीन ग्रंथातून अनेक ठिकाणी
केला आहे भर्तृहरीने या आयुष्याचा हिशेब देताना सुख वाढून व कसे मिळणार असाच प्रश्न विचारला आहे.
आयुर्वर्षशतं नृणां परिमितं, रात्रौ तदर्थं गतं ।
तस्यार्धस्य परस्य चार्धमपरं बालत्ववृद्धत्वयोः ॥
शेषं व्याधि-वियोग-दुःखसहितं सेवादिभिर्नीयते ।
जीवे वारितरङ्गबुद्बुदसम सांख्यं कुत प्राणिनाम् ॥
माणसास आयुष्य शंभर वर्षांचे मानले तरी त्यातले अर्धे रात्रीच्या झोपेत जाते उरलेल्या अर्ध्यांतले बालपण, वार्धक्य
यात व मग जे उरले ते सेवा, रोग, वियोग, दुःख यात नष्ट व्हायचे हे जीवनच मुळी पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे
असल्यामुळे माणसांस सुख कुठले ? संतांनी मात्र या प्रश्नाचे उत्तर वरीलप्रमाणे दिले आहे
८९ बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥ १ ॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ॥ २ ॥
जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भांड-भांडखोर, बडबड्या
अर्थ - ईश्वरा, जे दुर्जन आहेत त्यांच्याशी बोलण्याचाही प्रसंग मजवर येऊ नये १ तुला विसरून संत
निंदा करतात त्याची संगत नको २ अशा दुष्टाचे तोंड जळून जाये त्या भांडखोर व बडबड्या माणसाचे नावही
दृष्टीसमोर नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरा, अशा माणसापासून मला दूर ठेव ४