सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 589, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 589

सार्थ तुकारामगाथा ५४३
बोलून बहिणाबाई थांबत नाही, तर ती स्पष्ट म्हणते, 'बहिणी म्हणे ब्रह्मीं नांदे तो ब्राह्मण । यातीशीं प्रमाण
नसे तेथें'
साधुसंतांनी हा जो निवाडा केला आहे, त्यास केवळ समकालीन परिस्थिती व ब्राह्मणाची अधोगती एवढीच
पार्श्वभूमी नाही. या विचारास एक तात्त्विक बैठक असल्याचे आपण पाहिले आहे. एकाच ब्रह्मतत्त्वापासून जर हे
चराचर विश्व व्यक्त झाले असेल, तर हा ब्राह्मण, हा अंत्यज हे ठरले कसे ? या प्रश्नाचे उत्तर वाटते तितके सोपे
नाही. चोखोबांनी यार्ची तात्त्विक मीमांसा श्रेष्ठ प्रकारची केलेली आहे. समकालीन ब्राह्मणाची परिस्थिती, नखोन
जाणीव व तत्त्वाची बैठक याचा सुंदर मिलाफ ज्यात आहे, असा एक एकनाथाचा अभंग येथे देणे अस्यानी होणार
नाही. एका ब्राह्मणाचा व महाराचा एक खटकेबाज संवाद एकनाथांनी देऊन शेवटी निर्णयही दिलेला आहे तो
संवाद असा-
'कां रे महारा ! बदमस्ता ?' 'का हो ब्राह्मणबाबा भलतेंच बोलतां !'
'तुझे बापाचे भय काय ?' 'मायबाप तुमचे आमचे एकच हाय !'
'ऐक ऐसे बोलू नको' 'निर्गुणापासून अवघे झालों'
'निर्गुण तुला काय ठावें' 'आत्मरूपीं शोधून पाहावें'
'आत्मस्वरूप आम्हां कळेना' 'नाहीं तरी संतांशीं शरण जाना
१२३६ एक करिती गुरु गुरु । भोवता भारु शिष्यांचा ॥ १ ॥
पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ २ ॥
परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥ ३ ॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- भारु-समुदाय, पुंस-शेपूट, पेंडखान-पेंडीचे खाणे, निर्भर-निःकाळजी.
अर्थ :- कित्येक आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करून स्वतः गुरु गुरु म्हणवून घेऊन धन्य
होतात. १ पण त्यांना मनुष्य म्हणावे काय? ती माणसे असली तरी शेपूट नसलेली अशी चार पायांची कुत्रीच
आहेत, असे समजावे. २ परस्त्रीगमन व मद्यपान हेच जनावराचे पेंडीचे खाणे त्यांनी पसंत केलेले असते. ३
तुकाराम महाराज म्हणतात, अधोगतीला जाण्याविषयी यांचे चित्त निष्काळजी असते. ते हटकून अधोगतीला
जातातच. ४
१२३७ एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥ १ ॥
पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ २ ॥
कांहीं दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥ ३ ॥
असत्य जे वाणी । तेथें पापाचीच खाणी ॥ ४ ॥
सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥ ५ ॥
तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभहानी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- लाभहानी-फायदा व तोटा.
अर्थ :- एखाद्या पुरुषास दोन बायका आहेत, असे जर असेल तर, त्याच्या घरात पापाचे स्थान आहे, असे
मानावे. १ पापाचा शोध ज्याला घ्यावयाचा असेल, त्यास दुसरीकडे मग जाणे नको. त्याच्याच घरी जावे व
पापाचे दर्शन घ्यावे. २ याविषयी दुसरा काही विचारच करण्याची जरूरी नाही. ३ जो नेहमीच खोटे बोलतो,
त्याची वाणीही पाप निर्माण करणारी खाणच आहे असे समजावे. ४ जो तोंडाने नेहमी सत्य बोलतो, त्याच्या