सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 588, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५४२ सार्थ तुकारामगाथा
यांवर ज्याचे प्रेम नाही, असा ब्राह्मण जन्माचा ब्राह्मण असला तरी तो तसा नसतो २ जन्माने ब्राह्मण तो जरी
असला तरी त्याच्याविषयी असेच म्हणावे लागेल की, यावेळी त्याच्या आईचा अंत्यजाशीच व्यवहार घडलेला
असावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या विचाराखेरीज आणखी कांही वेगळेच कुणी मानेल तर त्याच्या
मुखात त्वरित कोडाचा रोग होईल असे निश्चित समजावे ४
१२३५ ब्राह्मण तो याती अंत्यज असता । मानावा सत्यता निश्चयेंशीं ॥ १ ॥
रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवों सावळें रूप मनीं ॥ २ ॥
शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥ ३ ॥
तुका म्हणे गेल्या पडऊर्मी अंगे । सांडूनिया मग ब्रह्मचि तो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - याती-जात, पडऊर्मी-कामक्रोधादी सहा उर्मी
अर्थ - आणि तो जरी जन्माने अंत्यज असला तरी त्यास निश्चयाने व तात्त्विक दृष्टीनेही ब्राह्मण जाती-
चेच मानावे १ कुणास ? तर ज्याच्या मुखातून रामकृष्ण या नामाचा सरळ सरळ उच्चार होत आहे, ज्याच्या मनात
त्या सावळ्या विठ्ठलाच्याच रूपाचा एकसारखा आठव आहे २ शांती, क्षमा, दया इत्यादी दैवी गुणांचे अलंकार
अंगावर शोभत आहेत, व जो कोणत्याही प्रसंगी धैर्यवान आहे, तो ब्राह्मणच समजावा ३ तुकाराम महाराज म्हणतात,
ज्याच्यातून कामादी सहा उर्मी नष्ट झाल्या आहेत, तो स्वत च ब्रह्म बनला आहे, असे समजावे तोच खरा ब्राह्मण ४
विवरण - या दोन अतिशय महत्त्वाच्या अभंगात एक बंडखोर विचार तुकारामबुवांनी निर्भीडपणे मांडी
त्ला आहे त्यांच्या भक्तीमार्गात जातिभेदाची बंधने शिथिल होत असल्याचं आपण पाहिलेच आहे हीनजातीचे,
चांडालादी लोक अथवा दुराचारीही भक्तीच्या क्षेत्रात एकदा मनापासून पदार्पण केले व पश्चात्तापाची दृढभावना
निर्माण झाली की श्रेष्ठ पदवीस पोचू शकतात या संबंधीचे अनेक दाखले पुराणातूनही आहेत पण वरील दोन
अभंगात बुवांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून जन्मजात अशा ब्राह्मणत्वाचा अथवा अंत्यजत्वाचा अधिकार होता,
त्यासच धक्का दिलेला आहे ब्राह्मण हा जन्मावरून न ठरता, कर्मावरून गुणावरून त्याच्या आचारावरून समजावा
हा नवा विचार रूढ होऊ पाहत होता ज्याला हरिकीर्तनात रुची नाही व जो वैष्णवांच्या संगतीत रमत नाही तो,
कसला ब्राह्मण ? उलट एखाद्यास जन्म जरी अंत्यज यातीत आला असेल, पण त्यास श्रीहरीच्या प्रेमाची गोडी असेल
रामकृष्णहरि या नामात जर तो तल्लीन होऊन तो जर रमत असेल, तर मग त्यासच ब्राह्मण म्हणावे असे बुवांनी
स्पष्टपणे सांगितले आहे ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, हीच व्याख्या त्यांनी ब्राह्मणाची केलेली आहे कारण या
श्रीहरीचे वर्म केवळ नामसंकीर्तनातच सापडते अशीही खात्री तुकारामबुवांची होती 'ब्राह्मणा न कळे आपुले तें वर्म ।
गवसे, परब्रह्म नामें एका' असे त्यांनीच म्हटले आहे
ब्राह्मणासंबंधी एवढ कडक लिहिण्याचे कारण असे की सर्व वर्णाचे गुरु म्हणून ब्राह्मणांना मान होता वेदांचे
अध्ययन अध्यापन ही त्यांची मुख्य कामगिरी, पण मध्ययुगीन काळानंतर ब्राह्मणधर्माचाही हास होता की काय
अशी परिस्थिती निर्माण झाली व आपले उच्च आचारविचार सोडून नुसत्या कर्मकांडात रमू लागले त्यांना धनांचा,
सत्तेचा लोभ सुटला त्यांचा आचारधर्म लुप्त झाले यासंबंधी हवी तेवढी वर्णने एकनाथ, तुकाराम रामदास या
संताच्या वाङ्मयातून मिळतील केवळ जन्म ब्राह्मण जातीत झाला म्हणून श्रेष्ठता प्राप्त व्हावी अशी समाजाची
अवस्था असल्यामुळे तीव्र असंतोष मात्र पसरला निर्बुद्ध व दुराचारी ब्राह्मणास कोण वंदन करणार ? व ईश्वरप्रेमी
आणि सदाचारी अंत्यजास का दूर ठेवावे ? असे प्रश्न निर्माण होऊन जो एक नवा विचार रूढ होऊ पाहात होता
त्याचे निदर्शन करणारे हे तुकोबांचे अभंग आहेत, ब्राह्मण कुणास म्हणावे ? असाच मूलभूत प्रश्न निर्माण झाला मराठी
संतांनी या प्रश्नाची जी उत्तरे दिली आहेत त्याच सार बहिणाबाईने, 'ब्राह्मण तो एक सांगन इत्यथ । जेणें हा वेदार्थ
साठविला,' 'ब्रह्मभाव देहीं सदासर्वकाळ । ब्राह्मण केवळ तोचि एक', 'ब्रह्म जाणे तोचि बोलिजे ब्राह्मण इतकेच