सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 590, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 590

ठिकाणी सुख नेहमीच उचंबळून येते ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पापाजवळ तोटा व पुष्या
जवळ, सत्याजवळ फायदा अगदी शेजारी शेजारी अशाच या गोष्टी आहेत ६
१२३८ जळते संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥ १ ॥
माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळा मनीं ध्याय ॥ २ ॥
नेदी कर्म घडो । कोठें आडराणे पडो ॥ ३ ॥
तुका म्हणे मळ । राहो नेदी ताप जाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धर्मनीत-धर्माची नीती
अर्थ - आपले सर्व संचित कर्म जळून जाते अशी या धर्माची नीती आहे १ यासाठीच माझ्या या
विठोबाच्या पायाचे चिंतन सतत करीत असावे २ त्यामुळे तुमच्या हातून कधी पापकर्म घडणार नाही, की
आडरानातून सापडण्याचाही प्रसंग येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हे विठ्ठलाचे नाम
व त्याचे चिंतन याच्यामुळे तापाचा जाळ व पापाचा मळ राहूच शकत नाही ४
१२३९ संतापाशीं बहु असावे मर्यादा । फलकटाचा धदा उर फोडी ॥ १ ॥
बासर तो भुके गाढवाचे परी । उडे पाठीवरि दड तेणे ॥ २ ॥
समय नेणे ते येडें चाहाटळ । अवगुणाचा ओगळ मान पावे ॥ ३ ॥
तुका म्हणे काय वाया चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फलकटाचा धदा-हलकटपणाचा उद्योग उरफोडी-घात करील बासर-स्वैर, स्वच्छंदी
अर्थ - संताच्याजवळ जाताना नेहमी मर्यादेत वागावे, उगाच हलकटपणाचा उद्योग केला तर, त्यापासून
घात होण्याचा संभव फार असतो १ स्वैरपणाने बोलणारे आहेत त्यांचे बोलणे म्हणजे गाढवाच्या ओरडण्याप्रमाणेच
आहे याचे फळ म्हणजे शेवटी पाठीवर दंडाचे वळच उठलेले दिसतील २ ज्यास प्रसंग समजत नाही तो चावटच
समजला पाहिजे तो येडाच असतो त्यास ओंगळ अशा अवगुणाची पदवी मात्र प्राप्त होते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हे त्याचे वागणे उगाच आहे हगवण लागलेल्या पोराची पिटपिटवाणी घाण असते तसेच त्याचे वागणे
ओंगळ आहे ४
१२४० घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥ १ ॥
सर्वभावे त्याचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ २ ॥
करिशील तो करीं संताचा सांगत । आणीक ते मान नको मना ॥ ३ ॥
बैससी तरी बैस संताचे मधीं । आणीक ते बुद्धि नको मना ॥ ४ ॥
जासी तरि जाई संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथें मना ॥ ५ ॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - आणीक-दुसऱ्या सांगत-संगत सोवत धणी-तृप्ती
अर्थ - मना, तुला भेटच जर घ्यावयाची असेल तर, तू संताची घ्यावीस याखेरीज दुसऱ्या गोष्टीच तू
मनात आणू नकोस १ कारण या संताचे सर्व भांडवल म्हणजे तो एक देव झालेला असतो या देवाशिवाय ते दुसरे
बोलणे कधीच बोलत नसतात २ मना तुला संगतच जर करायची असेल तर ती संताचीच कर आणखी याखेरीज
दुसरी कोणतीच गोष्ट तुला मग करायला नको ३ तुला जर बसायचेच असेल तर तू संतांच्याच मध्य बैस या
खेरीज दुसरी कसलीच बुद्धी तुला नको ४ तुला जर गावालाच जायचे असेल, तर तू संतांच्याच गावाला जा तुझा