सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 52, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 52

२६ सार्थ तुकारामगाथा
ज्याचें त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥ ३ ॥
तुका म्हणे काळें चेपियेला गळा । मी मी वेळोवेळां करीतसे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- भावी-भावना धरते, मानते, भूतें-पंचेंद्रिये व पंचविषय, वचलें-विस्मरण झाले.
अर्थ :- जे आहे ते सर्व श्रीकृष्णाला अर्पण करावे, कृष्णाच्याच सत्तेने व प्रेरणेने सर्व क्रिया होतात असे
मानावे. हे ज्याना कळत नाही ते मात्र अज्ञानामुळे सर्व कर्मे मीच केली अशी विपरीत भावना मनात धरतात. १
त्यामुळेच त्याच्यामागे पचेंद्रिये व पचविषय याची भुते लागतात. यात ते गुरफटून राहतात. २ आपल्याकडून होणारे
सर्व कर्मे त्या परमेश्वराकडूनच होतात व ही त्यालाच अर्पण करायची असतात, याची आठवण न राहिल्यामुळे फसगत
होते व विविध विषयाच्या तावडीत सापडण्यास अवसर मिळतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचा
म्हणजे देहबुद्धी धारण करून पचविषयात रममाण होणाऱ्या माणसाचा गळा काळ एकसारखा चेपीत असतो, तरी
हा मी मी, माझे माझे असेच अज्ञानाने म्हणत असतो ४
५५ महारासि सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
तपा प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ २ ॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥ २ ॥
ज्याचा सग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- कोपे-रागावतो, नातळे-जवळ करु नये
अर्थ - या अभगाचे अर्थ दोन प्रकारानी लाविता येतात. एक आध्यात्मिक अर्थ, दुसरा लौकिक. पहिला
अर्थ असा - क्रोध हा महार मानला आहे. याला म्हणजे क्रोधरुप महाराला जो शिवतो तो ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणास
राग आला तर तो महार या पदवीस जातो. १ या क्रोधयुक्त ब्राह्मणाने देहान्त प्रायश्चित्त जरी घेतले तरी तो शुद्ध
होणार नाही. २ या क्रोधरूपी चाडाळास कधीही जवळ करु नये, कारण त्याच्या अंतरगात विटाळ असतो. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, ज्याचा सग ज्याच्या मनात तशी जात त्याची होते क्रोधरूप महारास त्याने मनात स्थान
दिल्यास तोही महारच होईल ४
दुसरा लौकिक अर्थ असा की, महारास शिवल्यावर जो ब्राह्मण संतापतो तो खरा ब्राह्मणच नव्हे. १
अशा संतापी ब्राह्मणास, दुसऱ्यास अस्पृश्य मानणाऱ्या ब्राह्मणास देहत्यागाचे प्रायश्चित्तही कमीच होईल. २ हा
मनुष्य चांडाळास जवळ करीत नाही, कारण त्याच्या अंतरंगातच विटाळ असतो, म्हणून त्यास तो चांडाळ वाटतो. ३
हा महार, हा चांडाळ असाच ध्यास एकसारखा त्याच्या चित्तात असल्यामुळे तो त्याच जातीचा होतो. जसे चिंतन
तसे त्याला फळ मिळते ४
विवरण :- तुकोरामबुवाच्या वेळेच्या आधीपासून हिंदू धर्मात कर्मकाडाचे, बाह्य उपचाराचे माहात्म्य फार
माजले होते पण एक जात उच्च, एक नीच असा फरक सताच्या दृष्टीत नसल्याचे दिसून येते जातिबाह्य, हीन जातीचा,
अस्पृश्य, चाडाळ, पापकर्मी यांच्या उद्धाराची मोय भागवतधर्मीय संतानी केली. 'म्हणोनि कुळ उत्तम नोहावें ।
जाती अंत्यजही व्हावें । परि वैष्ह्णवांचे नांवें । पशूचेही लाभो' अशी ग्वाही ज्ञानदेवानी दिली दगडाप्रमाणे पाप-
योनीतील मूर्ख असले तरी एकदा त्याची दृष्टी भगवंताकडे लागली की मग काही उणीव पडू नये 'जाति कुळवर्ण।
हे आघवेचि गा अकारण' अशी घोषणा करून ज्ञानेश्वरानीच या क्रातिकार्यास सुरुवात केली जन्मजात जातिभेद
परमेश्वराच्या दरबारात नाहीचा अशी नवी विचारसरणी रूढ झाली 'जाति व्यर्थित पडें विपुले' असा निर्णय
ज्ञानेश्वरानी दिला आहे भगवद्गीतेने दिलेल्या सवलतीवर भाष्य करिताना ज्ञानेश्वरानी म्हटले आहे 'यापरी
पापयोनिही अर्जुना । का वैश्य शूद्र अगंना । मातें भजता सदना माझिया येती' निदान भक्तीच्या प्रातातील जातिभेद
कमी होत राहून मानवाळी प्रत्येक जमातीत एक एक गत्पुरुष निर्माण झाला. महार जातीत चोखामेळा निर्माण
होऊन या नवविचारांना एक प्रकारचा विजयच झाला बोन्धा, कर्ममेळा इत्यादी अस्पृश्य सताच्या अभंगातील