सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 422, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३८४ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - दुमाला-पाठ, चोजवी-इच्छा करितो.
अर्थ - देवा, या नास्तिकांनी तर माझी एकसारखी पाठ पुरविली आहे विठ्ठला, मी त्याच्या विषयी
काय बोलू ? १ कांदे खाऊन समाधान मानणाऱ्यास कस्तुरीची इच्छा झाली तर तिचा काय उपयोग ? स्वत
भिकारी असल्यामुळे त्याला तिची किंमत समजणारच नाही २ मला जो गोष्ट समजत नाही, तीच गोष्ट पुन पुन
त्रास देऊन लोक विचारतात, माझ्या चरणाशी लागतात व आग्रह करतात सांगितल्याशिवाय पाय काही सोडीत
नाहीत ३ देवा, मी त्यांना काय सांगावे ? तुझ्या पायावाचून मी काहीच जाणोत नाही सर्व ठिकाणी तूच एक मला
दिसतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा लोकाच्या ताडाला खोळ पडो असल्या या भाडखोर लोकांशी
मी किती बोलावे ? ५
८०४ कलियुगीं कवित्व करिती पाषाड । कुशळ हे भाड बहु जाले ॥ १ ॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजाची आवडी । मुखें बडबडी¹ कोरडाचि ॥ २ ॥
दंभ करी सोग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥ ३ ॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥ ४ ॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - पाषाड-पाखंडी, नास्तिक, दारा-स्त्री
अर्थ - या कलियुगात कवित्व करणारे पुष्कळ नास्तिक लोक झाले असून ते केवळ भांडण करण्यातच
कुशल आहेत १ त्याच्या मनात द्रव्य व स्त्री याची आणि पुष्कळ प्रजा आपणास व्हावी एवढीच आवड असते
त्याच्या मुखातून कोरडी बडबड उगाच सारखी चालू असते. २ लोकांनी आपणास मानावे म्हणून उगाचच दंभ
अथवा सोंग करतात, मुखाने त्यागाच्या गोष्टी बोलतात, पण त्याच्या मनात तशी भावना नसते ३ वेदाच्या
आज्ञेप्रमाणे वागून हे आपले स्वहित साधीत नाहीत व देहाविषयीच्या प्रीतीपासून अलिप्तही होत नाहीत ४
तुकाराम महाराज म्हणतात, असे हे कविलोक पुढे यमाची शिक्षा सहन करतील कारण वाणीने बोलल्याप्रमाणे
कर्म याचे नसते ५
८०५ विषयाचे सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥ १ ॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ २ ॥
असिपत्री तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥ ३ ॥
तप्तभूमीवरि लोळविती² पाहीं । अग्निस्तंभ बाहीं कवळविती ॥ ४ ॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आता याती गर्भवास ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - किंकर-सेवक, असिपत्रीं-तरवारीच्या पात्यावर, धारेवर, इंगळ-अग्नी, विस्तव,
बाही-बाहूनी, हातानी
अर्थ - या लोकांना माणसाच्या जन्मी येऊन नाना विषयाचे सुख घेताना मोठे गोड वाटते पण पुढे फार
मोठे असे यमाकडून शासन होणार असले हे ध्यानात हये १ यमाच्या हाती सापडल्यावर मग त्या पापी माणसांस
मारतात, तोडतात, झोडपतात यमाचे सेवक मोठ्या निष्ठुरतेने त्याचे कित्येक वर्षे हाल हाल करतात २ त्याला
हे तरवारीच्या धारेवर धरतात, वृक्षांमधील श्रेष्ठ असणाऱ्या खैराच्या लाललाल विस्वावर चालायला लावतात,
ज्यातून ज्वाला निघत आहेत अशा तेलात किंवा पाकात टाकतात ३ तापलेल्या भूमीवर लोळवितात अग्नीच्या
तप्त खांबास दोन्ही हातानी मिठी मारायला लावतात ४ हे त्याचे हाल पाहून तुकाराम महाराज म्हणतात, मी
काकुळतीस येत आहे आता मला हे गर्भवास नकोत ५
१ मुखी बडबडी भलतेचि, २ घालविती पायीं