सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 421, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 421

सार्थ तुकारामगाथा ३८३
अर्थ :- एका पंढरीनाथास सोडून दुसऱ्या कुणास देव म्हणावे ? १ इतरांना देव म्हणताना माझ्या चित्तास
फारच लाज वाटते. २ चांगल्या मौल्यवान हिऱ्यास सोडून गारा वेचण्यात कुणी सुख मानावे ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हरिहरांसारखे श्रेष्ठ व मुख्य देव सोडून इतर क्षुद्र देवांच्याकडे का जावे ? ४
८०० बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥ १ ॥
करिती कामिकांची सेवा । लागोन भागोन खात्या देवा ॥ २ ॥
अघवियांचा धनी । त्यासीं गेलीं विसरोनि ॥ ३ ॥
तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कामिकांची-लोभी देवाची.
अर्थ :- या पंढरीनाथाला न भजल्यामुळे पुष्कळ लोकांचे आयुष्य वायाच गेले आहे. १ लोकांना मागून
खाणाऱ्या लोभी देवांची पूजा करण्यात हे अडाणी लोक गुंतलेले दिसतात. २ आणि सर्व विश्वाचा धनी जो विठ्ठल
त्यास मात्र विसरून गेली आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे शेवटी हे लोक यमाच्याच हातात
सापडणार. ४
८०१ असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥ १ ॥
रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ २ ॥
काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥ ३ ॥
तुका म्हणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरुनियां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा.
अर्थ :- आम्ही विष्णुदास मात्र कशाचीही इच्छा करीत नसतो. १ मग हे दुष्ट लोक आमची निंदा
नेहमी का बरे करतात ? २ असू द्या. त्यांना त्यात समाधान असेल तर राहतील आपल्याच ठिकाणी ३ तुकाराम
महाराज म्हणतात, देवा, तुझी सेवा हाच एक आमचा नित्याचा धंदा आहे. त्यात कमी पडणार नाही. ४
८०२ नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणाची ॥ १ ॥
कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ २ ॥
असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥ ३ ॥
तुका म्हणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा.
अर्थ - आम्ही या श्रीहरीचे जे दास आहोत ते कशाचीही इच्छा करीत नसतो. १ तरीसुद्धा हे दुष्ट, नष्ट
लोक आमची निंदा नेहमी का करतात, हे काही समजत नाही. २ असू द्या. त्यांची मने भलत्याच ठिकाणी असली
तर असू द्या. आम्ही आमच्या ठिकाणी समाधानी राहू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी एकनिष्ठ सेवा
करणे हाच माझा धंदा झाला आहे. ४
८०३ पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला । येथें मी विठ्ठला काय बोलों१ ॥ १ ॥
कांद्यांचा लाणार चोजवी कस्तुरी । आपुलें२ भिकारी अर्थ नेणे ॥ २ ॥
न फळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥ ३ ॥
तुझ्या पायांविण दुजें नेणें कांहीं । तूंचि सर्वठायीं एक मज ॥ ४ ॥
तुका म्हणे खोळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादफांशीं ॥ ५ ॥
१ करू, २ आपण.