सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 420, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 420

३८२ सार्थ तुकारामगाथा
७९७ हरिहर सांडुनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥ १ ॥
ऐका त्याची विटंबणा । देवपणा भक्ताची ॥ २ ॥
अंगीं कवडे घाली गळा । परडी कळाहीन हातीं ॥ ३ ॥
गळा गाठा हिंडे दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ ४ ॥
माया सेंदुर दात खाती । जंगट हातीं सटवीचे ॥ ५ ॥
पूजिती विकट दोंद । पशु सोंड गजाची ॥ ६ ॥
ऐसा छंदें चुकली वाटा । भाव खोटा भजन ॥ ७ ॥
तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ते ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - सांडुनि-सोडून, गाठा-खंडोबाच्या भक्ताच्या गळ्यातील रुप्याची हासळी, जंगट-
वाद्य किंवा थाळी दोंद-डेरपोट
अर्थ - हे शक्तोचे वा देवीचे उपासक हरि व हर हे मुख्य देव सोडून इतरच क्षुल्लक देवांना भजतात १
पण अशा भक्तांची कशी विटंबना होते ती ऐका व त्याच्या देवाचीही फजिती नीट ऐका २ हे भक्त गळ्यात
कवड्याची माळ घालतात, हातामध्ये भिक्षेसाठी परडी घेतलेली असल्यामुळे हे कळाहीन दिसतात ३ याच्या
गळ्यात रुप्याची हासळी असते व हे दारोदारी हिंडतात हे लोक मनुष्य असून कुत्रीच वाटतात ४ याचे देव कसे
असतात ? तर त्याच्या माथ्यावर शेंदूर फासलेला असतो ते क्रोधाने कराकरा दात खात असतात आणि त्याच्या
हातात सटवीचे जंगट वाद्य असते ५ ज्या देवाचे पोट मोठे व ज्यास हत्तीची सोड आहे त्याची हे लोक वरवर
पूजा करतात ६ अशा विविध प्रकारच्या खोट्या मार्गांनी याची खरी वाट चुकलेली असते यांचे भजन व याचा
भाव याही बाबी खोट्याच असतात ७ तुकाराम महाराज म्हणतात, कारण हे लोक शिवाला किंवा विष्णूला सोडून
इतर क्षुल्लक देवांनाच भजतात ८
७९८ कायासाठीं जाले ज्ञान । तेणे जन नाडिले ॥ १ ॥
काम क्रोध बुचबुची । भुके पुची व्यालींची ॥ २ ॥
पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्याते ॥ ३ ॥
तुका म्हणे कंचे ब्रह्म । अवघा भ्रम विषयाचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नाडिले-फसविले
अर्थ - शरीराची उपासना करणाऱ्यांना कसले आले आहे ज्ञान ? स्वत कांदे खातात व मग ब्रह्मज्ञानाचा
खोटा आविर्भाव आणून लोकांना फसविततात १ याच्या अंगी कामक्रोध भरपूर भरलेले असून व्यालेल्या कुत्रीप्रमाणे
ते ज्ञानाची व्यर्थ बडबड करतात २ हे लोक पूजेसाठी लोकाजवळ द्रव्य मागतात व काही तरी भेदावादाचा उपदेश
करतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्याजवळ कसले आले आहे ब्रह्मज्ञान? येथे विषयाचाच सर्व भ्रम आहे ४
७९९ सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥ १ ॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकातें देव म्हणता ॥ २ ॥
सांडूनिया हिरा । कोणे वेचाव्या त्या गारा ॥ ३ ॥
तुका म्हणे हरिहर । ऐसी सांडूनिया धुर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आणिकातें-इतरांना, धुर-श्रेष्ठ