सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 256, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 256

२२० सार्थ तुकारामगाथा
वस्तूचे दान मिळविण्यासाठी वासुदेव सर्वांना एकदा जाणीव देत आहे नीट ईश्वरविषयक भाव चित्तात धरून राहा
संसाराचे ओझे शिरावर येऊ नका हाताची सर्व कामे सोडून याचा भाव मनात धारण करा ४ मी वासुदेव सर्वत्र
भरून राहिलेला आहे असा सर्व चांगल्या भक्ताच्या मनात भाव असतो जे महानुभाव असे कृपाळू संत आहेत तेही
असेच जाणतात त्याच्या ठिकाणी वेगळेपणाची जाणीव कधीच नसते ५ ज्यांना वासुदेवाचा विसर पडत नाही
त्याचेच दान शूरत्वाचे व उदारतेचे मानावे त्याची कीर्ती सर्वत्र वाढोस लागेल, चराचरात पसरून राहील अशा या
दानशूर साधुसंतांना तुकाराम महाराज म्हणतात, माझा नमस्कार असो ६
४३३ बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आत निजेलें ।
कैसे घरात घरकुल केले । नेणो आधार ना उजेडले गा ॥ १ ॥
वासुदेव करितो फेरा । वाडियात बाहेर द्वारा ।
कोणी कांहीं तरी दान¹ करा । जाब नेदा तरी जातो सामोरा² गा ॥ २ ॥
हातीं टाळ दिंडी मुखीं³ गाणे । गजर होतो बहु मोठघाने ।
नाही निवडिली थोरल्हाने । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥ ३ ॥
मी वासुदेव तत्त्वता । कळो येईल विचारिता ।
आहे ठाउका सभाग्या संता । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥ ४ ॥
काय जागाचि निजलासी । सुने जागेोन दारापासी ।
तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥ ५ ॥
ऐसे जागविले अवघे जन । होतें सचित तींही केले दान ।
तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टोपा - जाब-उत्तर, नेदा-दिला नाही भेणे-भयाने, सुने-कुत्र
अर्थ - जे मुखाने बोलू नये अशा ज्ञानाच्या गोष्टी जे मुखाने एकसारख्या करतात ते बाहेरून जागे असले
तरी आत झोपलेलेच आहेत त्यांनी आपल्या घरातच छोटेसे घरकुल केले आहे, त्यात अंधार आहे की उजेड आहे हे
काही नीट समजत नाही १ हा वासुदेव रोजच्या फेऱ्या या देहरूपी वाड्याच्या आत, दारात बाहेर सर्वत्र
करीत असतो त्याला कुणी काही तरी दान करून थोडे पुण्य सपादन करा ना तुम्ही काही उत्तर न द्याल तर मी
आपला माघारा जाईन २ मी हातात टाळ व वीणा घेऊन, मुखाने ईश्वराचे नाम गात आह नामाचा हा गजर
मी मोठघाने करीत आहे तो ऐकण्यासाठी लहानथोर अशी निवड केलेली नाही दान देण्याच्या भयाने कुणी झोपून
जाऊ नका ३ मी तर निश्चयाने वासुदेवच आहे तुम्ही थोडा विचार केलात तर तुम्हासही हे सहज समजून येईल
भाग्यवान संतांना हा प्रकार माहित आहे हे असे दान मागणारा माझ्याशिवाय दुसरा आणखी कोणी नाही ४
उगाच काय भ्रमात निजून राहिलात ? दाराशी मात्र राखणेसाठी कुत्रे जागेवोत ठेविले आहे ते तुमच्या हितासाठी
घसापस करून भुकत आहे आणि तुम्ही वासुदेवाला भेटत नाही ५ अशा प्रकारे या वासुदेवाने सर्व लोकांना जागे
केले आहे पण ज्यांचे पूर्वकर्म चांगले होते त्यांनीच दान केले आहे आणि वासुदेवाला विसरून जाणारे मात्र दुबळच
आहेत ६
४३४ रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळया वाजवीत ।
छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥ १ ॥
जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव ।
मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसू द्यावा भाव गा ॥ २ ॥
१ दान पुण्य करा २ माघारा, ३ मुखी नाम गाण