सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 257, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 257

सार्थ तुकारामगाथा २२१
निज दासाची थोर आवडी । यासुदेवासि लागली गोडी ।
मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥ ३ ॥
अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला ।
जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥ ४ ॥
तुका म्हणे रे धन्य त्याचें जीणें । जींहीं¹ घातलें वासुदेवा दान ।
त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणें गा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- नीज-निजस्वरूपाचे दान, वोयळतो-प्रसन्न होतो.
अर्थ :- आपल्या गीतांतून रामकृष्णांचे गुणवर्णन गात गात, टाळ व चिपळ्या वाजवीत, आपल्याच नादात
नाचत नाचत हा वासुदेव निजस्वरूपाचे दान घेत घेत फिरत आहे. १ सर्व जनांत व वनांत सर्वत्र एकच परमेश्वर
पसरून राहिलेला आहे. तो अनुभवण्यासाठी वासनेचा त्याग करावयास हवा. मगच वासुदेवाची संगत त्याला सुखाची
होते, तो प्रसन्न होतो, असा भाव मनात निश्चयाने असू द्यावा. २ निजस्वरूपाच्या दानाची गोडी या वासुदेवास
फार मोठी असून प्रत्येक क्षणी त्याच्या मुखात हरिनामाचा उच्चार असतो. अशा या वासुदेवाची प्राप्ती तुम्ही करून
घ्या. ३ तुम्हांस जागे करण्याचे प्रयत्न फार झाले. त्याचा शेवटही झाला. पण काही प्रयत्न यशस्वी झाला नाही,
तुम्ही झोप टाकून आधी जागे व्हा पाहू; व या वासुदेवाला दान द्या. ४ ज्याने या वासुदेवास दान दिले त्याचेच
जिणे धन्य होय असे तुकारामबुवा म्हणतात, असे दान देणारास मग जन्ममृत्यूच्या फेऱ्या पडत नाहीत. कारण त्याचा
निवास वासुदेवाच्या ठिकाणीच झालेला असतो. ५
गांवगुंड-अभंग १
४३५ आम्ही जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥ १ ॥
दुसरें तें खेळों आलें । एका बोलें तो मियां ॥ २ ॥
अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥ ३ ॥
तुका म्हणे लुटूं नाद । जितूं वाद सतीनें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पुंड-बंडखोर, जितूं-जिंकू, सतीनें-शर्थीने.
अर्थ :- आम्ही सर्व देहरूपी गावास दरारा बसविणारे गावगुंडच बनलो आहोत. सर्व बंडखोर प्राणीमात्रांना
अथवा पंचमहाभूतांनाही आमचा दरारा वाटतो. १ या एका मियाच्या बोलावण्याने दुसरे अनेक लोक गावगुंडीचा खेळ
खेळायला येऊन मिळाले. २ एकमेकांचा अंगसंबंध न येताही सर्वांना लाभ होईल असे करू. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, अशांचा भाव संपवू. त्यांच्याशी शर्थीने वाद जिंकू. ४
जोगी-अभंग १
४३६ जग जोगी जग जोगी । जागजागे² बोलती ॥ १ ॥
जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ २ ॥
अवघा क्षेत्रपाळ । पूजा³ सकळ ॥ ३ ॥
पूजापत्र कांहीं । फल पुष्प तोय ॥ ४ ॥
बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥ ५ ॥
नफा घेऊं भार । धर्म तोचि सार ॥ ६ ॥
तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- जोगी-योगी, जगदेव-जगन्नाथ.
१ जिही वासुदेवा केलें दान, २ जागे जागे ३ पूजावा.