सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 202, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१६८ सार्थ तुकारामगाथा
३४८ याजसाठीं भक्ति । जगां रुढवाव्या¹ ख्याति ॥ १ ॥
नाहीं तरी फोटें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ २ ॥
गौरव यासाठीं । स्वामिसेवेची कसोटी ॥ ३ ॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- रुढवाव्या-वाढविण्यासाठी, ख्याती-प्रसिद्धी.
अर्थ:- दुःखी कष्टी जीवांना तारण्यासाठीच या भक्तीच्या प्रसिद्धीची वाढ व्हावयास हवी. १ नाही तर
दुसऱ्यापणाने बोलावे असे ईश्वर व जीव यांत द्वैत आहे कुठे ? २ केवळ भक्तीचा गौरव व्हावा म्हणून हा
स्वामी, हा सेवक असा वरवरचा दुजाभाव आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवभक्ताचे नाते हाच एक खरा
अलंकार या लोकात आहे ४
३४९ अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥ १ ॥
जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ २ ॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥ ३ ॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- याति-जात
अर्थ:- देवा, जी वाणी अमंगल आहे ती माझ्या कानावर सुद्धा येऊ नये. १ जो हरीच्या कथेला दूषण
देतो त्याला क्षय रोगाची व्यथा लागली आहे असे समजावे २ मग तो श्रेष्ठ वर्णाचा ब्राह्मण असला तरी तो पापी,
चाडाळच समजावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यास स्वतःचे आईबाप आवडत नाहीत, नकोसे झाले आहेत,
तो पापीच समजावा. ४
३५० कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥ १ ॥
वाचें नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ २ ॥
कैसा निरयगांवा । जाऊं न पवे दिसावा ॥ ३ ॥
तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सिंदळीचा-जारिणीच्या पोटचा, नुच्चारी-उच्चारीत नाही, निरयगाव-नरक, लंड-
नास्तिक.
अर्थ:- जो पुढे दिल्याप्रमाणे श्रीहरीचे नाव घेत नाही तो जारिणीच्या पोटचाच नव्हे काय ? १ तो
कधीही वाणीने गोविंदाचे नाव घेत नाही. सतत दुसऱ्याची निंदा करतो २ तो नरकाच्या गावी जाऊनच विसावा
घेणार नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या नास्तिकास चांगलाच दंड होणार असतो. ४
३५१ आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥ १ ॥
करवी आणिकाचे घात । खोडी काढूनि पडित ॥ २ ॥
श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसा । शटबेचि ना पांचा दिसां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- ठाव-पत्ता, खोडी-दोष, भटवणे-दाघणे
अर्थ - ज्याला शुद्ध आचरणाचा पत्ताच नाही ; व ज्याच्या स्वतःच्या अंगी भक्तिभाव नाही, १ असा
हा पंडित दुसऱ्याचा दोष काढून त्याचा घात करतात किंवा करवितात २ एखादे कुत्रे मिष्टान्नात शिवून भ्रष्ट
करते, तसे वागणे या दुष्टाचे असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुष्ट माणसांस इतके आयुष्य तरी
१ वाढवावा