सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 201, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 201

हे दोन दिवस मात्र विसरू नका या मार्गाने चालला तर दया, क्षमा, इत्यादी वृत्ती तुमचे घर शोधीत येतील ३
ऐहिक भोग व पारलौकिक मुक्ती याची काळजीच तुम्ही करू नये. तुम्ही स्वतःमध्ये दैन्य व दरिद्रता कधीच धारण
करू नये तुकाराम महाराज म्हणतात, एक हा पांडुरंग प्रसन्न झाल्यावर, या दात्याच्या आश्रयाने तुम्हास कसलीच
चिंता उरणार नाही ४

३४७ जें कां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥ १ ॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ २ ॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥ ३ ॥
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरीं जो हृदयीं ॥ ४ ॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥ ५ ॥
तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा .-रंजले-त्रासले, आपंगिता-सांभाळणारा

अर्थ – जे लोक या संसारतापाने त्रासलेले आहेत, गांजलेले आहेत त्याना जो आपले म्हणून जवळ करतो, १
तोच खरा साधू म्हणून ओळखावा इतकेच नव्हे तर त्याच्या ठिकाणीच देव आहे असे समजावे २ लोणी जसे
अंतर्बाह्य मऊ असते त्याप्रमाणेच सज्जनाचे चित्त कोवळे असते ३ ज्यांना कोणीही ममतेने सांभाळणारा नाही
त्यांना जो पोटाशी धरून आश्रय देतो, ४ जो आपल्या स्वतःच्या मुलावर जी माया करतो तीच दासदासींवरही
करीत असतो, तोच साधू समजावा ५ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी किती सांगू ? तो प्रत्यक्ष भगवंताचीच
मूर्ती समजावा ६

विवरण - तुकाराम महाराजाचा हा अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय असा अभंग आहे दीन, दुःखी पीडित,
रंजल्यागांजलेले जे कुणी आहेत त्याना उदार अंतःकरणाने जवळ करावे, त्यांच्यावर दया करावी, स्वतःच्या
मुलाबाळांप्रमाणे त्यांसीही आपणूक करावी हा एक थोर विचार बुवांनी येथे सांगितला आहे साधुत्वाची, देवत्वाची
खूणही त्यांनी याच संदर्भात सांगितली आहे दीनदुः खितांना जवळ करणारा जो साधुपुरुष तोच प्रत्यक्ष भगवंत होय हा
एक मोठा विचार भागवत संप्रदायातील मानावा लागेल अगदी सोप्या, सरळ, साध्या व हृदयाचा ठाव घेणाऱ्या
भाषेत बुवांनी साधुत्वाचे लक्षण सांगितले आहे सर्व धर्माचे हेच सार आहे नुसता आत्मोद्धार उपयोगी पडत नाही
या आत्मोद्धाराचेच एक अंग म्हणजे जनसेवा 'आई चिंता करितों विश्वाची' असे समर्थ रामदास लहानपणीच
म्हणाले होते पुढे साऱ्या हिंदुस्थानाचे भ्रमण केल्यावर लोकांची दुःस्थिती पाहून त्यांनी उद्गार काढल 'कैसी
वाचतील जनें ?' या लोकांच्या संसाराचे, परमार्थाचे होणार तरी काय ? असा एक प्रश्न साधुसंतांच्या मनात निर्माण
होतोच 'चित्तेनें उर फाटतो' अशा भाषेत समर्थांनी या चिंतेची धार व्यक्त केली आहे
धनिनांना बुद्धिमंतांना कुणीही जवळ करील, पण दीनदरिद्री व संसारतापाने पोळलेल्या जीवांना कोण
आसरा देणार ? त्यांच्यावर मायेचे पांघरूण कोण घालणार ? त्यांना जवळ करून सन्मार्ग कोण दाखविणार ? जो
दुसऱ्याची पीडा जाणून ती दूर करतो तोच खरा वैष्णव होय असे गुजराथचे थोर संत नरसी मेहता यांनी म्हटले
आहे संतांचा अवतार यासाठीच असतो दुरितांचे तिमिर नष्ट व्हाव, दुष्टांची दुष्ट बुद्धी नाहीशी व्हावी जगात
पापताप दूर व्हावेत, विश्वातील अंधार दूर व्हावा, बद्ध मुक्त व्हावेत, बुडालेले वर यावेत, दुःखितांची संकटे दूर
व्हावीत यासाठी संतांचे अवतार होत 'संतीं बोधिलौँ सोडीत । बुडालीं काढीत । साकडें फेडीत । आर्तांचिया '
साधुसंत नावरूप असतात असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे तुकारामबुवाही याच उपकारासाठी उरले होते त्यांना
स्वतःस आत्मसुखाचा लाभ झाला तर या भक्तिरभाचे सेवन इतराना व्हावे अशी त्यांची इच्छा होतीच 'आपण
ठेवूनि जेववी लोका । सतर्पण करी तुका' अशी त्यांची भूमिका होती दीनदरिद्री व दुःखी जीवाचे दुःख ओळखून
वागणे, त्याचा दुःखभार हलका करणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाहीच असे समजावे