सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 198, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१६४ सार्थ तुकारामगाथा
झाला ? ३ त्या सुवर्णमृगाच्या तेजाच्या आशेनेच मला फसविले त्याच आशेत गुंतून मी रघुनाथास त्याच्यामागे धाडले
आणि लक्ष्मण भावजींची मी आज्ञा मोडली व रेषेबाहेर आले मी त्या राक्षसाची माया कशी ओळखणार ? झोपडी
रिकामी पाहून त्या रावणरूपी कुत्र्याने मला येथे बळजबरीने आणले की ग ४ आता या संकटातून सुटण्यासाठी
त्या रघुनाथाच्या नामाशिवाय दुसरा काही मार्ग अथवा उपाय दिसत नाही. त्या दुष्ट रावणाने त्या जटायू पक्ष्याच्या
अंगावर पाय देऊन त्याचे पक्ष उपटले व त्यास मारले सभोवती पाण्याने वेढलेल्या स्थितीत त्या बिचाऱ्याचे काहीच
चालले नाही' ५ अशा प्रकारे ती जनकराजाची मुलगी दुःखाने व्याकुळ झाली आपल्या मेळाव्यातून एकटारो
हरिणी चुकावी तशी तिची अवस्था झाली समोरची त्रिजटा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, व तुकाराम
महाराज म्हणतात, की राम लौकरच लंकेस येऊन तिची सुटका करील असे तिने सांगितले ६
३४० वीट नेघे ऐसे रांधा । जेणे बाधा उपजे ना ॥ १ ॥
तरीच ते गोड राहे । निरे पाहे स्वयंभ ॥ २ ॥
आणिका गुणा पोटीं ठाव । दासी भाव आपुला ॥ ३ ॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नेघे-येणार नाही, निरे-शुद्ध
अर्थ :- ज्याचे भरपूर सेवन केले तरी जे बाधणार नाही असे अन्न शिजवून तयार करा याच्या सेवनाने
कसलीच बाधा येणार नाही १ तरच ते गोड राहील नाही तरी ते मुळातच शुद्ध आहे रांधवून बिघडवू नका २
जे शुद्ध मुळातच आहे त्यात इतर गुणाचा शिरकाव होत असताना आपला अवगुण मात्र दिसू नये ३ तुकाराम
महाराज म्हणतात, जे जातीने खरे शुद्ध असतात ते कधी मागे परत फिरत नाहींत ४
३४१ नव्हतो सावचित । तेणे अंतरले हित ॥ १ ॥
पडिला नामाचा विसर । वाढविला सवंसार ॥ २ ॥
लटिक्याचे पुरीं । बाहोनिया गेलो दुरी ॥ ३ ॥
तुका म्हणे नाव । आम्हा सापडला भाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सावचित-सावध, लटके-खोटे
अर्थ - प्रभुनामाविषयी मी या संसारात सावध चित्ताने राहिलो नाही म्हणून माझ्या खऱ्या हितास मी
अंतरलो १ त्याच्या नावाचा विसर पडून हा माझा संसार मी वाढविला २ खरवर दिसणाऱ्या पण खोट्या अस
णाऱ्या या मायिक पसाऱ्याच्या पुरात मी वाहून गेलो ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण आता ही हरिभक्तीची
नाव मला तरून जाण्यास सापडली आहे ४
३४२ अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि का हे पाक घरोघरीं ॥ १ ॥
आपुलाले तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ २ ॥
देखोनि जीवन जरि जाय तान । तरि का साठवण घरोघरीं ॥ ३ ॥
देखोनिया छाया सुख न पवीजे । जव न बेसीजे तया तळीं ॥ ४ ॥
हित' तरी होय गाता आईकता । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥ ५ ॥
तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा -परिमळें-सुवासाने, जीवन-पाणी, तान-तहान, न पवीजे-मिळत नाही, आणिपेची-ज्ञानाची.
१ गुल