सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 197, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 197

सार्थ तुकारामगाथा १६३
कधीच मागे फिरत नाही. ५ याच्याकडे लक्ष येताच त्यांच्यांतील गैरभाव व आपपर विचार संपला त्यांना कसलाही
शोक, मोह किंवा दुःखभाव उरलेला नाही तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाने त्या सर्वांना आपल्यासारखेच
शेवटी सुखी केले. याप्रमाणे हा माझा स्वामी श्रीकृष्ण सर्वांशी मोठ्या कौतुकाने खेळत असतो. ६
३३९ अशोकाच्या वनीं सीता शोक करी ।
कांहो अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी ।
कां हो मज आणिले अवघड लंकापुरी ॥ १ ॥
सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात ।
देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।
मन उताविळ जाला दुरी पंथ ।
राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ २ ॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें ।
तीर्थ व्रत होते कवणाचें भंगीलेँ ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा बिघडिलें ।
न कळे वो संचित चरण अंतरले ॥ ३ ॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोनें ।
धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणे ।
उलंधिली आज्ञा माय काय मी जाणें ।
देखुनी सूनाट घेऊनि आलें सुनें ॥ ४ ॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये ।
एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥ ५ ॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तेंशा परी ॥
संबोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुक्यास्वामी राम लंकापुरी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- गुंफेमाजी-झोपडीत, कुडी-शरीर, त्रिजटा-सीतेच्या रक्षणासाठी रावणाने ठेवलेल्या
राक्षसींपैकी एक, नाडियले-फसविले, माय-माया, सुनाट-रिकाने, सुनें-कुत्रे, लाग-उपाय, पक्षिया-जटायूस, नंदिनी-
मुलगी, स्थिर-शांत