सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 165, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १३७
शब्दार्थ व टीपा :- यारी-संगत, प्रीती, कल्हारीं-कमळात, हृदयकमळात, क्षणी-नकारात्मक अर्थ.
अर्थ :- अधम माणसाची प्रीती पतंगाच्या रंगाप्रमाणे क्षणभंगूर असते. १ एक क्षणात ती विटून जाते.
तिची किंमत व्यर्थ होते २ याच्या हृदयकमळात सर्पाप्रमाणे विष नेहमी भरलेले असते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, असला हा अधम मला दाखवूसुद्धा नका. ४
२७७ आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥ १ ॥
आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणां या देव आणिकांसि ॥ २ ॥
शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥ ३ ॥
तुका म्हणे मज आणिक संकल्पें । अवघींच पापे घडतील ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आणिकांची-इतर देवाची, शतखंड-शंभर तुकडे, रसना-जीभ.
अर्थ :- त्या एका पांडुरंगाशिवाय इतर देवाची स्तुती आम्ही केली तर आमचेकडून ब्रह्महत्येचे पातक
घडले असे समजा. १ आम्हा विष्णुदासाचा भाव एकच असतो व आम्ही इतर देवदेवतांना देवही मानीत नाही २
या माझ्या वचनात जर अंतर पडेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील. ३ या पांडुरंगप्रीतीशिवाय दुसरे
काही भाव माझ्या मनात येतील तर माझ्या हातून जगातील सर्वच पापे घडल्यासारखे होईल असे तुकाराम महाराज
म्हणतात. ४
२७८ तान्हल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥ १ ॥
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ २ ॥
तूं तों उदारांचा राणा । माझी अल्पचि वासना ॥ ३ ॥
कृपावृष्टीं पाहे । तुका म्हणे होई साहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- धणी-तृप्ती, समाधान, उणी-कमी.
अर्थ :- गंगेच्या पाण्याचे सेवन केल्यानंतर तृषाक्रांताची इच्छा तृप्त होते तो संतुष्ट होतो, पण गंगेचे
पाणी काही कमी होत नाही. १ तेव्हा कृपेच्या सागरा, माझे मनोरथ एवढा पूर्ण करा ना. २ देवा, तुम्ही तर
उदाराचे राजे आहात व माझी मागणीही अगदी अल्प आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, केवळ कृपावृष्टीने देवा,
माझ्याकडे पाहा व मला साह्य करा ४
२७९ संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥ १ ॥
घेती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ २ ॥
अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । ताडन भेदकांची सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गाळी-घालवून देतो, शिवी, भेदक-देव व संत यांच्यात भेद करणारे.
अर्थ :- घरी यज्ञाने देवपूजा चालू असताना घरात संत आले व त्यांचा सत्कार जर घडला नाही तर तो
अधर्म आहे. १ अशा वेळी देवाला भक्तिभावाने मंत्रपुष्पे वाहिली तरी ती दगडाच्या वर्षावाप्रमाणे देवासही
वाटतील. २ दाराशी अतिथी आला असताना त्याला घालवून देतो किंवा शिवी देतो व देवाला नैवेद्य म्हणून पुरणाची
पोळी दाखवितो हाही अधर्मच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या भेदबुद्धीने केलेली सेवा ही सेवा
नसून एक प्रकारची माराची शिक्षाच नव्हे काय ? ४
२८० करणे तें देवा । हेचि एक पावे सेवा ॥ १ ॥
अवघें घडे येणें सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ २ ॥
तु गा १८