सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 141, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ११३
आपल्या तोंडावर व ढुंगणावर धपडा मारू लागला. २ या बोबड्याने म्हटले, 'श्रीकृष्णास थोर थोर लोक हवेत.
त्यांची मैत्री याला आवडते. मी तर एक दैन्यवाणे गरीब पोरटे आहे.' ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या
गरिबाच्या मनातील भाव जाणून श्रीकृष्णाने त्या गरीब जीवाची समजूत काढली. ४
मृदुंग पाथ्या-अभंग
२२७ मागें पुढें पाहे सांभाळूनि दोनी ठाय ।
चुकावूनि जाय गडी राखें गडियांसि ॥ १ ॥
मुरडे दंडा दोहों तोंडे गडिया सावध करी ।
भेटतियासंगें तया हाल तुजवरी ॥ २ ॥
गडिया गडी वांटुनि देईं । ज्याचा सोडो तेचि ठायीं ॥ ३ ॥
अगळचा वळे करील काय । तुज देणें लागे डोय ॥ ४ ॥
नवां घरीं पाउला करीं । सांपडें तो तेथें धरीं ॥ ५ ॥
जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥ ६ ॥
सांपडोनि ढाईं बहु । काळ गुंतलासी ॥ ७ ॥
बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥ ८ ॥
चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय ।
गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥ ९ ॥
शब्दार्थ व टीपा :- ठाय-बाजू, हाल-डाव, डोय-डाव, टाहो-घोष, चुकांडी-झुकांडी.
अर्थ :- मागेपुढे म्हणजे प्रवृत्तीकडे व निवृत्तीकडे नीट लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या गड्यांना चुकवून तू
जा. १ प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही बाजूंच्या गड्यांना वळवून तू त्यांना सावध कर. जे कोणी तुला भेटतील त्यांचा
डाव तुझ्यावर आहे हे ध्यानात असू दे. २ प्रवृत्ती व निवृत्ती यांच्याप्रमाणे गड्याची वाटणी करून तू ज्याचा गडी
त्यासच देऊन टाक. ३ विनाकारण अधिक बळाचा उपयोग काय ? तू त्यांना डाव द्यायला हवाच. ४ नऊ ग्रहांच्या
रूपाने असणाऱ्या या नऊ गड्यांचा पाठलाग करून ते जिथे सापडतील तिथे त्यांना तू धर. ५ यांच्यावर डाव जिंकून
दुसऱ्यावरील आपली सत्ता तू घोष करून चालू ठेव. ६ या बलवान प्रवृत्तींच्या ताब्यात सापडून तू पुष्कळ काळ गुंतून
राहिला आहेस. ७ या बलवान गड्यांची फळी तू त्यांना न धरता फोड व त्यातून तू पार हो. ८ झुकांडी देऊन
जो गडी श्रीकृष्णस्वरूपी मिसळून जातो, त्याची संगत तू धर. तुकाराम महाराज म्हणतात, अजून तू या प्रवृत्तींत,
या खेळात का विनाकारण गुंतून राहिला आहेस ? ९
२२८ पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग ॥
देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥ १ ॥
जागा रे गोपाळांनो ठायीं ठायीं जागा ।
चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ २ ॥
न रिघतां ठाय आम्हा ठाया पाळतियां ।
भयाभीत यांयां तेथें काय चांचपां १ ॥ ३ ॥
तुका म्हणे हातां चढे जीयाचिये साटीं ।
मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥ ४ ॥
१ चांचपाल.
तु. गाथा...१५