सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 140, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें११२ सार्थ तुकारामगाथा
करून पाहा २ तुमचे पोट भरले असे तुम्ही बोट वर करून म्हणता ३ तुकाराम महाराज म्हणतात अशा
प्रकारचे सुख तुम्हाला तुमच्या घरी मिळणार आहे काय ? ४
२२४ अवघे अवघीकडे । दिले पाहे मजकडे ॥
अशा सबगडे । सहित थोरी लागली ॥ १ ॥
का रे धरिला अबोला । माझा वाटा देई मला ॥
सिदोरीचा केला । झाडा आता निवडे ना ॥ २ ॥
भूक लागली अनंता । का रे नेणसी जाणता ॥
भागलो वळितां । गाई सैरा ओढाळा ॥ ३ ॥
तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी ॥
घेता जाला सुखी । भीतरी वाटी आणीका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अशा-आशा, झाडा-हिशोब, सैरा-स्वैर
अर्थ - श्रीकृष्णा, तू सर्वांना सर्व काही दिलेस, आता माझ्याकडे थोडे पाहून मलाही काही दे ना माझ्या
सोंगड्यांसहित सर्वांना तुझी मोठीच आशा लागून राहिलो आहे १ श्रीकृष्णा, तू माझ्याशी अबोला का रे
धरिलास ? माझा वाटा मला ताबडतोब देऊन टाक ना मी माझ्या पापपुण्यात्मक शिदोरीचा हिशेब तुझ्याजवळ
पुरा केला आहे ना ? मग आता तू माझा निवाडा का करीत नाहीस ? २ अनंता, आता फार भूक लागली आहे रे
तू सगळा जाणता असून तुला हे का रे समजत नाही ? मी आता या इद्रियरूपी गाई पळतावळता थकून गेलो आहे
या गाई मोठ्या सैरावैरा धावणाऱ्या व ओढाळ आहेत ३ श्रीकृष्णा, मी तुझी करुणा भाकत आहे तू काल्याचा
घास माझ्या वाट्याचा मजकडे टाक ना या काल्याचा घास घेत असताना तुकाराम महाराज म्हणतात मी फार
सुखी झालो आहे, मी तो माझ्या सोबत्याना वाटून दिला ४
२२५ आम्ही गोवळीं रानटें । नव्हो जनातील धीटें ॥ १ ॥
सिदोरीचा करु काला । एक वाटितो एकाला ॥ २ ॥
खेळो आपआपणांशीं । आमचीं ती आम्हापाशीं ॥ ३ ॥
मिळालो नेणते । तुका कान्होबा भोवते ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - रानटें-रानवट
अर्थ - आम्ही आपले गाई राखणारे रानवट गुरेराखी आहोत लोकात धीटपणे कसे वागावे हे आम्हास
माहित नाही १ आम्ही सर्वांच्या शिदोऱ्याचा एकच काला करू व सर्वांना वाटू २ आम्ही एकमेकात खेळ खेळू,
जी आमचीच मंडळी आहेत ती आम्हासाच येऊन मिळतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या कान्होबाच्या
भोवती सर्व नेणते गोपाळ एकत्र झालो आहोत ४
२२६ “अवघिया दिला गोर । मजकरे पाहीना ” ॥ १ ॥
फुंदे गोपाळ डोळे चोळी । दुगा थापली हाणे तोडा ॥ २ ॥
आवडती थोर मोठे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥ ३ ॥
तुका म्हणे जाणे भाव । जीविचा देव बुझावी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गोर-गोड
अर्थ - श्रीकृष्णाच्या संगतीतील एक भोयडा गोपाळ म्हणत आहे, 'या श्रीकृष्णाने सर्वांना गोडगोड घास
दिले आणि तो माझ्याकडे पाहातसुद्धा नाही' १ असे म्हणून तो गोपाळ डोळे चोळून चोळून स्फुदून रडू लागला,