सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 108, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें८० सार्थ तुकारामगाथा
तू बोल. ४ माझ्यापुढे शपथ घेताना पोरा मी तूरणाचा माझ व्हायला हवा. ५ तू माझ्याबरोबर येशील तर मी
तुला प्रपंचादिक मुलांसाठी परत घरी जाऊ देणार नाही. ६ आमच्या या अद्वैताच्या रंगात दुजेपणाचा भाव टिक-
णारच नाही. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा माझ्याबरोबर प्रतिज्ञा केली म्हणजे श्रीहरी जीवदशेचा नाश
करून सर्वच सुखमय करून सोडतो. ८
१५५ हुमामा रे पोरा हुमामा रे। हुमामा घालितां ठकले पोर ।
करी येरझार चौऱ्याशीची ॥ १ ॥
पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतले ॥
देखोनि गडी तें विसरले । डाईं पडिले आपणची ॥ २ ॥
दुसऱ्या पहारा महा आनंदें । हुमामा घाली छंदछंदें ।
दिस वाढे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥ ३ ॥
तिसऱ्या पहारा घेतला बार । अहंपणें पाय न राहे स्थिर ।
सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥ ४ ॥
चौथ्या पहारा हुमामा । घालिसी कांपविसी हातपाय ।
सुऱ्यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडसील डाईं ॥ ५ ॥
हुमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई ।
यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गाई ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- ठकले-फसले, पहारा-वेळेस, सुऱ्या पाटिलाचा-मूर्ख या पाटलाचा
अर्थ :- पोरा, हुमामा खेळ खेळ रे. हुमामा हुमामा म्हणताना व खेळताना हे पोर फसून गेले आहे
चौऱ्यांशी लक्ष योनींच्या फंदात सापडले. १ गर्भावस्थेच्या पहिल्या अवस्थेत मोठा रंग आलेला होता, त्यावेळी पोरा,
तू सोहं सोह-तो मी आहे तो मी आहे, असा छंद घेतलास, पण संसारातील इतर गडी पाहून तू हा छंद विसरलास
या डावात आपण होऊन सापडलास २ दुसऱ्या बालपणाच्या वेळी तू मोठया आनंदात होतास, स्वच्छंदाने हुमामाचा
खेळ खेळत राहिलास. जसजशी वाढ होऊ लागली तसतसे तुला बरे वाटले, पण पोरा, पुढे काय आहे हे तुला
काय माहित ? ३ तिसऱ्या तारुण्याच्या अवस्थेत याने मी वेगळा, निराळा असा देहबुद्धीच्या अहंपणाचा ध्यास
घेतला. त्यामुळे याचा पाय स्थिर राहीना, तो सारखी संसाराची उठाठेव करू लागला. त्याने नाना विषयाचा सोस
केल्यामुळे तो या डावात पुरता सापडला; हे खरेच समजावे. ४ मग चौथ्या अवस्थेत वृद्धपणा आल्यावर त्याचा
हुमामा निराळाच सुरू होतो त्याचे हातपाय कापू लागतात सूर्याजी पाटलाचा पोर यम त्याच्या तावडीत सापड-
ण्याची वेळ जवळ आलेली असते. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देहादी प्रपंचाशी हुमामा खेळताना मी भीत
असतो. मी या सर्व गड्याचा सबंध सोडून गोकुळातील यादवाचा तो एक मूल जो विठोबा त्यालाच मित्र करून
त्याच्या गाई मी वळण्याचे, चारण्याचे काम करतो. ६
गाई-अभंग १
१५६ आम्हां घरी एक गाय दुभता हे। पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥ १ ॥
वान ते सांयळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ २ ॥
वत्स नाहीं माय भलत्या सवे जाय । कुर्याळी तो लाहे भावभरणा ॥ ३ ॥
चहूं थारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥ ४ ॥
तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥ ५ ॥