सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 107, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 107

सार्थ तुकारामगाथा ७९
हुंबरी-अभंग १
१५३ तुझीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ १ ॥
सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥ २ ॥
चेंडुयासवें घातली उडो । नाथिला काळिया देउनि बुडी ॥ ३ ॥
अशुद्ध पीता करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥ ४ ॥
रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥ ५ ॥
जाणों तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥ ६ ॥
याशीं खेळतां नाश थोरू । तुक्यास्वामी सारंगधरू ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- हुंबरी-तोडाने एका प्रकारपा आवाज करून खेळावयापा खेळ, साही-सहा शास्त्रे,
अठरा-अठरा पुराणे, चारी-चार वेद, शेष-नाग, नाथिला-कपटी केला, अशुद्ध-रक्त, माउशी-पूतना मावशी,
मामा-कस, सारंग-एव' धनुष्य.
अर्थ :- देवा, तुझ्याशी हुंबरीचा खेळ कोण रे खेळू शकणार ? तुझे सामर्थ्य वर्णन करताना चार वेद, सहा
शास्त्रे व अठरा पुराणेही थकली. १ हरी, एवढा सहस्र मुखाचा शेषनाग, तोही तुझे वर्णन करताना शिणून गेला. २
गोकुळात यमुनेच्या तीरावर चेंडूफळीचा खेळ खेळत असताना चेंडु यमुनेच्या डोहात पडला, तेव्हा तूच यमुनेत उडी
घेतलीस व तेथील दुष्ट कालिया नागाचा पराभव केलास. ३ तुला मारण्यासाठी स्तनाना विष लावून ती पूतना
मावशी आली असताना तू तिचे रक्त प्राशन करून तिला मारलेस. तुला कशी करुणा अगदी येत नाही रे ? ४
रामावताराच्या वेळी तू त्या रावणाचे घर बुडविलेस, त्याची बायकामुले मारून टाकलीस. ५ तू किती कठिण
हृदयाचा आहेस हे आम्हास माहित आहे. या अवतारात तू आपल्या कंस मामालाही ठार मारलेस. ६ तुकाराम
महाराज म्हणतात, सारंग नावाचे धनुष्य धारण करणाऱ्या या ईश्वराशी खेळ खेळताना असाच मोठा नाश होतो.
कधी देहाहम्बुद्धीच्या वृत्तीचा नायनाट होतो. ७
हमामा-अभंग २
१५४ मझीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥ १ ॥
पोरा हमामा रे हमामा रे ॥ २ ॥
मझीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥ ३ ॥
तरीच मझीं बोल । पोरा जिव्हाळघाची ओल ॥ ४ ॥
मझीं घेता भास । जीवा मीतूपणा नास ॥ ५ ॥
मज सर्वै खरा । पण जाऊं नेदी घरा ॥ ६ ॥
आमुचिये रंगीं । तुजें तगे ना ये संगीं ॥ ७ ॥
तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥ ८ ॥