सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 109, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ८१
शब्दार्थ व टीपा - दुभताहे-दूध देणारी आहे, न समाये-मावत नाही, थान-वर्ण, रग, वसुंधरा-पृथ्वी,
भलत्या-कुणाही, जोगविते-पोसते
अर्थ - आमच्या घरी एक दुभती गाय असून तिचा पान्हा सर्व त्रिभुवनांत मावत नाही १ तिचा रंग
काळसर असून तिचे नाव धोधर असे आहे ती पृथ्वी व चौदा भुवनात चरत असते, हिंडत असते २ तिला स्वतःला
वासरु नसल्याने ती कोणाही भक्ताबरोबर जाते जो तिला प्रेमाने कुरवाळतो त्याला ती कृपेचे दूध भरपूर देते ३
या गाईच्या चार स्तनांतून चार धारांनी कृपेचे दूध भरपूर मिळते याच दुधावर सनकादिक ऋषिमुनी व सिद्धलोक
संतुष्ट झाले आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात अशा ठिकाणी माझी एवढीशी भूक काही विशेप नाही, कारण
ही अदभुत धेनू तीनही लोकांची जोपासना करणारी आहे ५
कांडण-अभंग २
१५७ सिद्ध करूनिया ठेविले कांडण । मज सागातीण शुद्ध बुद्धि गे ॥ १ ॥
आठव हा घरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं शेवटिचा गे ॥ २ ॥
सम तुकें घाव घालीं वो साजणी ॥ मी तुजमिळणी जय मिळे ॥ ३ ॥
एक कक्षी पाखडी दुसरी निवडी । नि शेष तिसडी ओज करी ॥ ४ ॥
सरले कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचे ॥ ५ ॥
उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥ ६ ॥
तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तातडी मूळ केले ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - सम तुके-समानपणाची
अर्थ - आत्मा-अनात्माभावाचे कांडण मी तयार करून ठेविले आहे कांडण करण्यासारख्याच या गोष्टी
आहेत माझी विवेकबुद्धी हीच या कामी माझी मैत्रीण आहे तिच्या साहाय्याने मी हे कांडण करीत आहे १ ही
आठवण मनात धरूनच अग्रे, मला रात्रीच्या शेवटच्या प्रहरी म्हणजे पहाटेसच तू जागे कर २ हे मैत्रिणी, तू सर्वत्र
समत्वबुद्धी धरूनच या कांडणासाठी घाव घाल तर तुझी व माझी जुळणी एकरूपाची होईल ३ या शुद्धबुद्धीने मी
माझ्या वृत्तीने किंवा देहात्मभावाचे कांडण करताना एकदा पाखडीन, एकदा निवडीन, एकदा सडून काढीन, मग
मात्र बुद्धी तेजस्वी होईल ४ एवढे झाले की मग कांडण संपेल नंतर स्वयंपाक तयार होईल खीर व साखर याची
मिळणी आत्मज्ञान व सुखानुभूती याच्या स्वरूपात होईल ५ आणि या अलौकिक प्रसंगी उद्धव व अक्रूर हे श्रीकृष्ण
सखे व प्रत्यक्ष नारायण भोजनास येणार आहेत ६ तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या माहेरच्या माणसांची
मोठीच आवड असल्यामुळेच तातडीने ते सगळेजण मला बोलवावयाला आले आहेत ७
१५८ सावधों कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥ १ ॥
मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सावरोनि थिरों घाव घालीं ॥ २ ॥
वाजती काकणे अनूहात गजरे । छंद माहियेरे गाऊ गीति ॥ ३ ॥
कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तो ॥ ४ ॥
तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - सावडीं-सावध थिरों-स्थिर बुद्धीन, अनुहात-अखंड ध्वनी
अर्थ - नारायणाची ओवी गात गात आता तू हे कांडण आबर व आता यातील भुसा कोणता, व आत्मा-
नुभूतीचे सार कोणते याचा निवाडा करू १ तू आता मुसळ असेच वरचे वर धर व नीट मन, बुद्धी, इद्रियादी
वृत्ती यांना आवरून स्थिर चित्ताने घाव घाल २ त्यावेळी तुला अनुभव येईल की सोहच्या अनुभूतीचा ध्वनी तुझ्या
वृत्तिरूप काकणातूनच तुला ऐकू येईल याच स्वरानी माहेरच्या आईबापाना आपण गाणे गाऊ ३ जोपर्यंत या
तु गाथा ११